UGC NET परीक्षेचा अर्ज कसा भरावा? फीस किती? जाणून घ्या

यूजीसी नेटच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांची ही बातमी महत्त्वाची आहे. कारण, आता डिसेंबरमध्ये होणारी यूजीसी नेटच्या परीक्षेचा कालावधी जवळ येत आहे. नव्या नियमांनुसार नेट परीक्षेत ज्या उमेदवारांचे पर्सेंटाइल जास्त असेल, त्यांना श्रेणी 1 मध्ये ठेवण्यात येणार आहे. हे उमेदवार सहाय्यक प्राध्यापक, जेआरएफ आणि पीएचडीसाठी पात्र मानले जातील. दरम्यान, यूजीसी नेट परीक्षेची लेटेस्ट अपडेट खाली जाणून घ्या.

UGC NET परीक्षेचा अर्ज कसा भरावा? फीस किती? जाणून घ्या
UGC NET Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 06, 2024 | 8:41 PM

यूजीसी नेटची परीक्षा 83 विविध विषयांसाठी वर्षातून दोनवेळा घेतली जाते. पहिले सत्र जूनमध्ये तर दुसरे सत्र डिसेंबरमध्ये होते. नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे घेण्यात आलेल्या यूजीसी नेट 2024 जून सत्र परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. आता उमेदवार डिसेंबर सत्रासाठी यूसीजी नेट नोटिफिकेशनची वाट पाहत आहेत. या सत्राची तारीख कधीही जाहीर होऊ शकते.

डिसेंबर सत्र परीक्षेसाठी यूजीसी नेटची अधिसूचना गेल्या वर्षी 30 सप्टेंबर रोजी जारी करण्यात आले होते. ही परीक्षा राष्ट्रीय स्तरावर घेतली जाते. ugcnet.nta.ac.in अधिकृत संकेतस्थळावर अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार असून त्यावर नोंदणीही करावी लागणार आहे.

यूजीसी नेट पात्रता निकष काय?

यूजीसी नेट 2024 डिसेंबर परीक्षेला बसण्यासाठी सामान्य उमेदवाराकडे 55 टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. तर ओबीसी, एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी हा निकष 50 टक्के निश्चित करण्यात आला आहे. जून विभागाची नेट परीक्षा 18 जून रोजी होणार होती, परंतु टेलिग्रामवरील पेपर लीकमुळे ती 19 जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आली. 21 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत नव्याने परीक्षा घेण्यात आली.

यूजीसी नेट परीक्षेचे अर्ज शुल्क किती?

सर्वसाधारण आणि ओबीसी उमेदवारांसाठी 1150 रुपये तर एससी, एसटी आणि दिव्यांग प्रवर्गासाठी 600 रुपये अर्ज शुल्क आहे. उमेदवार नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा यूपीआयचा वापर करून ऑनलाइन पद्धतीने नोंदणी शुल्क जमा करू शकतात.

यूजीसी नेट डिसेंबर 2024 अधिसूचना कधी येणार?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, यूजीसी नेट 2024 डिसेंबर अधिसूचना या महिन्यात कोणत्याही तारखेला जारी केली जाऊ शकते. यूजीसी आणि एनटीएकडून अधिसूचना जारी करण्याची कोणतीही अधिकृत तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

नेट पात्र उमेदवार तीन श्रेणींसाठी पात्र

नव्या नियमांनुसार नेट परीक्षेत पर्सेंटाइल जास्त असलेले श्रेणी 1 मध्ये ठेवण्यात येणार आहे. हे उमेदवार सहाय्यक प्राध्यापक, जेआरएफ आणि पीएचडीसाठी पात्र मानले जातील. अधिक पर्सेंटाइल असलेल्या उमेदवारांना पीएचडी प्रवेशासाठी केवळ मुलाखतीला उपस्थित राहावे लागेल.

नेट पात्र उमेदवार श्रेणी 2

मध्यम पर्सेंटाइल असलेल्या उमेदवारांना श्रेणी 2 मध्ये ठेवण्यात येणार असून, त्यांना सहाय्यक प्राध्यापक आणि पीएचडीप्रवेशासाठी पात्र मानले जाईल.

नेट पात्र उमेदवार श्रेणी 3

नेट परीक्षेत सर्वात कमी पर्सेंटाइल मिळविणाऱ्या उमेदवारांचा क्रमांक येतो. त्यांना श्रेणी 3 मध्ये ठेवण्यात येणार असून ते केवळ पीएचडी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पात्र असतील.

पीएचडी प्रवेश गुणवत्ता यादी

नेट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या नेट पर्सेंटाइलला 70 टक्के, तर मुलाखतीला 30 टक्के वेटेज देण्यात येणार आहे. कॅटेगरी 2 आणि कॅटेगरी 3 या दोन्ही कॅटेगरीतील नेट स्कोअर केवळ एका वर्षासाठी वैध असेल.

'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.