UPSC Success Story: वडील झाले वेगळे आईने वाढवले, रात्रीचा अभ्यास करुन पोरीने घेतली झेप, कोण आहेत AIR -6 सृष्टी डबास ?
आई आणि वडिल वेगळे झाले आणि त्यामुळे आईने एकट्याने आपल्याला वाढविले, त्यामुळे आईवरील अन्यायामुळे केवळ आईलाच नव्हे अन्याय होणाऱ्यांना सर्वांनाच न्याय देण्यासाठी सरकारी नोकरी असतानाही आपण आयएएस होण्याचा निर्णय घेतल्याचे सृष्टी डबास यांनी म्हटले आहे.

जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही तरी मोठे करुन दाखवायचे असेल तर मार्ग देखील प्रशस्त बनतो. दृढ निश्चय आणि कठोर मेहनतीची तयारी असेल तर सर्व अडचणी देखील पार करता येतात. युपीएससीच्या परीक्षेत उज्वल यश मिळविणाऱ्या सृष्टी डबास यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांनी दिवसाची नोकरी आणि रात्रीचा अभ्यास करुन विना कोचिंग युपीएससीच्या परीक्षेत देशात ६ वा रँक मिळविला आहे. सृष्टी डबास यांचा कहाणी अनेकांना प्रेरणादायी आहे.
सृष्टी डबास या दिल्लीच्या रहिवासी आहेत. त्यांचा जन्म १३ ऑक्टोबर १९९८ रोजी झाला. त्यांनी सिव्हील सेवा मुख्य परीक्षा २०२३ मध्ये देशात सहावा रँक मिळविला आहे. त्यांना लेखी परीक्षेत एकूण ८६२ गुण आणि पर्सोनोलिटी टेस्टमध्ये १८६ वा रँक मिळविला आहे.त्यांना एकूण १०४८ गुण मिळाले आहेत.
आईचा संघर्ष प्रेरणा ठरला
सृष्टी डबास यांनी एका मुलाखती सांगितले की त्यांचे आई-वडील त्यांच्या जन्मानंतर वेगळे झाले होते. त्यामुळे त्यांच्या आईला जीवनात खुप मोठा संघर्ष करावा लागला. तिला आईने एकट्याने वाढवून मोठे केले. आईचा संघर्ष पाहून आपण जिद्दीने पेटल्याचे त्या म्हणतात. केवळ आईच काय देशातील अनेक अन्याय पीडीतांना न्याय देण्यासाठी आपण या सिव्हील सेवा परीक्षेला बसण्याचा निर्णय घेतल्याचे त्या सांगतात.




नोकरी – अभ्यासात संतुलन करणे अवघड होते
भारतीय रिझर्व्ह बँकेत नोकरी करीत असताना त्यांना अभ्यासासाठी वेळ मिळायचा नाही. त्यामुळे दिवसा नोकरी केल्यानंतर रात्रीचा अभ्यास करायला सुरुवात केली. UPSC ची तयारी आणि नोकरीत संतुलन करणे अवघड होते. परंतू आरबीआयची लायब्ररी त्यांच्या उपयोगी आली. सरकारी नोकरी असूनही केवल सिव्हीस सर्व्हीसमध्ये जाण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली.
आयएएसची तयारी करणाऱ्या सल्ला
UPSC Exam प्रिपरेशन मेटेरीयलला स्वतंत्र राखून त्यांनी युपीएससी आयएएसची तयारी करणाऱ्या उमेदवारांना सल्ला दिला आहे की विविध वृत्तपत्रे वाचत जा. केवळ कोचिंग नोट्सवर विसंबून न जाता. विविध विषयांची पुस्तके वाचा असा सल्ला सृष्टी डबास यांनी दिला आहे.