पंजाबमध्ये आपच्या उमेदवाराचा राजीनामा, राघव चड्डा यांच्यावर गंभीर आरोप; मतदानाची तारिख बदलली

आशु बांगर यांनी आम आदमी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर तेथील आपचे पंजाबचे सह-प्रभारी राघव चढ्ढा यांच्यावर मोठा आरोप केला आहे.

पंजाबमध्ये आपच्या उमेदवाराचा राजीनामा, राघव चड्डा यांच्यावर गंभीर आरोप; मतदानाची तारिख बदलली
Follow us
| Updated on: Jan 17, 2022 | 3:25 PM

पंजाब – पंजाबमध्ये विधानसभेची निवडणुक (Punjab Assembly Election) जाहीर झाल्यापासून काँग्रेस आणि आप (aap) या दोन्ही पक्षात मोठी लढाई होईल, असं म्हटलं जात आहे. कारण सद्याची तिथली राजकीय स्थिती निवणुकांच्या तारखामुळे बदलत आहे. तसेच काँग्रेसकडून अनेक उमेदवारांना उमेदवारी जाहीर न झाल्यामुळे नाराज उमेदवार इतर पक्षात सामील झाले आहेत. आज आपच्या आशु बांगड (Ashu Banger) यांनी आपला रामराम केल्याचं वृत्त आहे. त्यांना एका पक्षाकडून तिकीट मिळाल्यामुळे राजीनामा दिल्याची चर्चा पंजाबमध्ये आहे. पंजाबमधील निवडणुकीची तारिख बदलली असून 20 फेब्रुवारीला मतदान होणार आहे.

आशु बांगर यांनी आम आदमी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर तेथील आपचे पंजाबचे सह-प्रभारी राघव चढ्ढा यांच्यावर मोठा आरोप केला आहे. त्यामध्ये ते म्हणतात की आत्तापर्यंत मी आपची प्रामाणिकपणे समाजिक सेवा केली आहे. राघव चढ्ढा यांच्यानंतर तिथे कोणताही मोठा नेता नाही, तसेच तेथील अनेक नेत्यांचा आवाज चढ्ढा यांच्याकडून वारंवार दाबल जात आहे.

पंजाबमध्ये आपचा एकचं नेता आहे, तो म्हणजे राघव चढ्ढा, जो पंजाबमधून सर्व राज्यांसाठी आपले विधान करतो. पंजाबमध्ये माझ्यासारख्या अनेक नेत्यांनी आपले सर्वस्व पणाला लावले. परंतु प्रत्येकवेळी पदरी निराशा आली. पंजाबमध्ये आम आदमी पार्टी ही एक कंपनी आहे. तो पक्ष कधीचं असू शकत नाही. मी अनेक गोष्टींच्या दबावाखाली होतो, आज राजीनामा दिल्यानंतर मला फ्री असल्यासारखं वाटतं आहे. या सगळ्या अन्यायाचा मी एक पुरावा आहे. तसेच तम्ही आमच्या सुचनेनुसार काम केले नाहीतर रद्द करण्यात येईल असं फर्मान माझ्या विरोधात काढण्यात आलं होतं. त्यामुळे मी माझ्या पदाचा राजीनामा देत असल्याचे आशु बांगर यांनी सांगितले.

फिरोजपूर मधील एका पत्रकाराशी ज्यावेळी आशु बांगर यांनी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी पंजाबच्या आपच्या नेतृत्वाकडून मला नेहमी अपमानित करण्यात आलं आहे. तसेच निवडणुकीत अधिक खर्च करू नका अशी तंबीही देण्यात आली होती. बांगर यांची ही पहिली निवडणुक असून त्यांना अनेक अटी घातल्यामुळे पक्ष सोडला आहे. मी इतर कोणत्याही पक्षातून निवडणुक लढवेन, पण आप मधून निवडणुक लढणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

 काँग्रेसला पंजाबमध्ये मोठा धक्का! हरजोत कमलनंतर काँग्रेसचे आणखी 5 ज्येष्ठ नेते भाजपात दाखल

Punjab Assembly Election 2022 : मुख्यमंत्रिपदासाठी कुणाला पसंती? पहिल्या स्थानी चन्नी, सिद्धू कितव्या?

Election Commission of India : 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार, निवडणूक आयोगाची दुपारी पत्रकार परिषद

Non Stop LIVE Update
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.