Punjab Poll: पंजाब विधानसभेच्या निवडणुकीची तारीख बदलली, 14 ऐवजी 20 फेब्रुवारीला होणार मतदान; कारण काय?

Punjab Poll: पंजाब विधानसभेच्या निवडणुकीची तारीख बदलली, 14 ऐवजी 20 फेब्रुवारीला होणार मतदान; कारण काय?
Assembly-Election

पंजाब विधानसभेसाठी आता 14 फेब्रुवारी ऐवजी 20 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: भीमराव गवळी

Jan 17, 2022 | 2:50 PM

नवी दिल्ली: पंजाब विधानसभेसाठी आता 14 फेब्रुवारी ऐवजी 20 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी चार दिवसाने मतदान पुढे ढकलण्याची विनंती निवडणूक आयोगाला केली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

संत रविदास जयंती असल्याने निवडणूक पुढे ढकलावी अशी मागणी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्यासह विविध राजकीय पक्षांनी केली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री चन्नी, भाजप आणि पंजाब लोक काँग्रेस पक्षाच्या पत्रावर चर्चा करण्यात आली. सर्वांनीच 16 तारखेला गुरु रविदास जयंती असल्याने मतदानाची तारीख चार दिवसाने पुढे ढकलण्याची मागणी केली होती. बहुजन समाज पार्टीने सर्वात आधी ही मागणी उचलून धरली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेत निवडणुकांच्या तारखा बदलल्या आहेत. त्यामुळे आता पंजाबमध्ये 14 फेब्रुवारी ऐवजी 20 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.

राजकीय नेत्यांना कशाची भीती?

येत्या 16 फेब्रुवारी रोजी रविदास जयंतीचा पावन पर्व आहे. त्यामुळे राज्यातील एक मोठा वर्ग आधीच वाराणासीत जाऊ शकतो. त्यामुळे मतदान घेतलं तर एक मोठा वर्ग मतदानापासून वंचित राहू शकतो. म्हणून मतदान चार दिवसांनी पुढे ढकलावं अशी मागणी सर्वच राजकीय पक्षांनी केली होती.

लोकसंख्या किती?

पंजाबमध्ये रविदासिया आणि रामदासी शीखांसहीत अनुसूचित जातीची 32 टक्के लोकसंख्या आहे. यातील मोठा वर्ग हा संत रविदासांना मानणारा आहे. त्यामुळे हा वर्ग वाराणासीत रविदासांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी जात असतो. त्यानंतर रविदासांशी संबंधित तिर्थक्षेत्रांनाही हे श्रद्धाळू भेट देत असतात. त्यामुळे जयंतीच्या दोन दिवस आधी मतदान झाल्यास त्याचा मतदानावर परिणाम होऊ शकतो. आधीच राज्यातील अनेक लोक लोगबाग काशी यात्रेलाही गेले आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांना मतदान कमी होण्याची भीती वाटत होती. म्हणूनच या राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाला पत्रं लिहून निवडणूक पुढे ढकलण्याची विनंती केली होती.

संबंधित बातम्या:

Punjab | काँग्रेसला पंजाबमध्ये मोठा धक्का! हरजोत कमलनंतर काँग्रेसचे आणखी 5 ज्येष्ठ नेते भाजपात दाखल

Punjab Assembly Election 2022 : मुख्यमंत्रिपदासाठी कुणाला पसंती? पहिल्या स्थानी चन्नी, सिद्धू कितव्या?

Election Commission of India : 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार, निवडणूक आयोगाची दुपारी पत्रकार परिषद

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें