AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Goa Election: गोव्यात भाजपला टेन्शन, पणजीतून उत्पल पर्रिकर मग अपक्ष म्हणून लढणार? राऊत म्हणतात, जनता त्यांच्या पाठिशी

गोव्याची राजधानी पणजीमधून विधानसभा लढण्याची तयारी असल्याची चर्चा अखंड गोव्यात आहे. कारण यंदाची निवडणुक लढण्याचं मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी फायनल केलं आहे. त्यामुळे मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांचे पुत्र फक्त भाजपच्या निर्णयाची वाट पाहत आहे. भाजपचा निर्णय लवकरचं झाल्यास उत्पल पर्रीकर पणजीतून निवडणुक लढवतील.

Goa Election: गोव्यात भाजपला टेन्शन, पणजीतून उत्पल पर्रिकर मग अपक्ष म्हणून लढणार? राऊत म्हणतात, जनता त्यांच्या पाठिशी
गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर
| Edited By: | Updated on: Jan 15, 2022 | 12:58 PM
Share

गोवा – निवडणुकांच्या तारखा जशा जवळ येतात, तशी राजकीय वातावरण पुर्णपणे बदलताना दिसतं. मुळात यामध्ये अनेकांना घरचा नारळ दिला जातो, तर अनेकांचा पक्षप्रवेश होतो. यामुळे बंडखोरीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत. सध्या गोव्यात असचं वातावरण पाहायला मिळत आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांना भाजपने विधानसभेसाठी जवळजवळ तिकीट नाकारल्याचं जाहीर झालं आहे. त्यामुळे नाराज उत्पल पर्रीकर अपक्ष म्हणुन उभे राहण्याची अधिक शक्यता व्यक्त केली जात आहे. आपला पक्ष केवळ एखाद्या नेत्याचा मुलगा आहे म्हणून तिकीट देत नाही. तर त्यासाठी त्याच्या कामाची दखल घेतली जाते असं वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnvis) यांनी केल्यामुळे नाराज माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (manohar parikar) यांचे पुत्र उत्पल पर्रीकर (utpal parikar) हे अपक्ष म्हणून निवडणुक लढण्याची चर्चा गोव्यात आहे.

गोव्यात 40 विधानसभा क्षेत्रासाठी 14 तारखेला निवडणुका होणार आहेत. सध्याची राजकीय परिस्थीती अशी निर्माण झाली आहे की, उत्पल पर्रीकर यांना अपक्ष म्हणून उभे राहिल्याशिवाय पर्याय नसल्याचे बोलले जात आहे. उत्पल पर्रीकर यांनी आपल्या वडिलांच्या राजकीय वारशावर आपला दावा नेहमी मांडला आहे. पण त्यांना अद्याप यश मिळालेले नाही असंच म्हणावं लागेल. विशेष म्हणजे भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर भाजपकडून कोणतीही भूमिका मांडलेली नाही.

गोव्याची राजधानी पणजीमधून विधानसभा लढण्याची तयारी असल्याची चर्चा अखंड गोव्यात आहे. कारण यंदाची निवडणुक लढण्याचं मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी फायनल केलं आहे. त्यामुळे मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांचे पुत्र फक्त भाजपच्या निर्णयाची वाट पाहत आहे. भाजपचा निर्णय लवकरचं झाल्यास उत्पल पर्रीकर पणजीतून निवडणुक लढवतील.

उत्पल पर्रीकर यांनी पणजीत आपल्या प्रभागात जाऊन प्रचार करण्यास सुरूवात सुध्दा केली आहे. 2019 ला निधन मनोहर पर्रीकर यांचं निधन झाल्यानंतर भाजपकडून सिद्धार्थ श्रीपाद कुंकलिएन्कर यांना त्या जागेवर तिकीट दिलं होतं. त्यावेळी तिथं झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या बाबुश मोनसेरेट यांचा विजय झाला होता. त्यावेळी बाबूश मोनसेरेट यांच्यासह 10 काँग्रेस आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. एवढेच नाही तर बाबूश यांची पत्नी जेनिफर यांना सरकारमधील महत्त्वाचे महसूल खाते भाजपकडून देण्यात आले.

पण सध्या भाजपसाठी एक पेज निर्माण झाला आहे, समजा बाबूश मोनसेरेट यांच्या जागेवर उत्पल पर्रीकर यांना तिकीट दिल्यास भाजपला मोठा तोटा सहन करावा लागेल असं चिन्ह आहे. कारण बाबूश हे पणजीचे आमदार आहेत आणि त्याची पत्नी तळेगाव येथे सध्या आमदार आहे. त्यामुळे निर्माण झालेला पेज भाजप कसे सोडवते याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.

उत्पल पर्रीकर यांच्या मताशी मी पूर्ण सहमत आहे. भाजपने नैतिकता, संस्कार, संस्कृती, साधन सुचितेच्या गप्पा मारू नये. उत्पल पर्रीकर यांचे योगदान काय ? हे विचारण्यापेक्षा गोव्यात ग्रेट गंब्लार, ठग्स ऑफ गोवा हे उमेदवार घेऊन तुम्ही निवडणुका लढवू इच्छिता का ? मला फार वाईट वाटते की देवेंद्र फडणवीस यांचे गोव्यात येऊन जे अधःपतन झालंय ते फार विचित्र आहे असं मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलेय तसेच मनोहर पर्रीकर यांच्याविषयी आमच्या मनात सदभावना आहेत. गोव्यासारख्या लहान राज्यातून एक राजकारणी देशाचे संरक्षण मंत्री झाले. त्यांनी सैन्य दलाला नेतृत्व दिले. गोव्यात भाजप रूजवला, वाढवला आणि सत्तेत आणला. आणि त्यांचे चिरंजीव उत्पल सुद्धा समाजकारणात काम करताहेत, राजकारणात काम करायची इच्छा आहे. भाजपने मन मोठे करून उमेदवारी त्यांना उमेदवारी द्यायला काहीच हरकत नाही असं बोलून उत्पल पर्रीकरांना संजय राऊत यांनी पाठींबा दर्शविला.

Goa Election | तुम्ही गुन्हेगारांना तिकीट देता, मग मला का नाही ? उत्पल पर्रिकर यांचा फडणवीसांना सवाल

Goa Election : राष्ट्रवादीचं ठरलं गोव्यात स्वबळावर लढणार, प्रफुल पटेलांनी उत्तर प्रदेशसह मणिपूरचा प्लॅन सांगितला\

Goa Assembly Election 2022 | नेते महाराष्ट्रातले, स्पर्धा गोव्याची! जुगलबंदी रंगली फडणवीस विरुद्ध राऊत वक्तव्यांची

चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...