AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बच्चू कडू उमेदवार विधानसभा निवडणूक निकाल 2024

बच्चू कडू उमेदवार विधानसभा निवडणूक निकाल 2024
Achalpur PJPPJP
Lost 65247 Votes

बच्चू कडू हे अचलपूर विधानसभा मतदारसंघातून लढत आहेत. बच्चू कडू यांनी संभाजी छत्रपती आणि राजू शेट्टी यांच्याशी मिळून तिसरी आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीने आपले उमेदवारही दिले आहेत. त्यामुळे या आघाडीचा काय निकाल लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिवाय बच्चू कडू हे अचलपूरमध्ये पुन्हा एकदा चमत्कार घडवणार का? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

बच्चू कडू यांनी 1999 साली विधानसभेची पहिली निवडणूक अपक्ष म्हणून लढवली. त्यावेळी त्यांचा 1300 मतांनी पराभव झाला होता. त्यांच्या पहिल्या निवडणुकीवेळी त्यांच्या अनेक मित्रांनी घरातील दागिने मोडले. पत्नीचे मंगळसूत्र सुध्दा गहाण ठेवले आणि निधी उभा केला. बच्चू कडू आजही या मित्रांचा अभिमानाने उल्लेख करतात.

2004 साली त्यांनी परत अपक्ष म्हणून आमदारकी लढवली आणि ते निवडून आले. त्यानंतर सलग तीन वेळा ते अपक्ष आमदार म्हणून निवडून आले आहेत. तीन वेळा आमदार असणाऱ्या बच्चू कडूंकडे आजही स्वःताचे घर नाही. ते आजही भाड्याच्या घरात ते राहतात. त्यांची पत्नी शिक्षिका आहे. आमदारांच्या पगारवाढीला विरोध करणारे ते राज्यातील एकमेव आमदार आहेत.

आमदार झाल्यानंतर बच्चू कडू यांनी ‘प्रहार जनशक्ती पक्षा’ या संघटनेची स्थापना केली. अपंग, शेतकरी आणि गरिबांच्या न्याय हक्कासाठी झगडणे हे या संघटनेचे मुख्य उद्दिष्ट्ये आहे. अपंगांच्या प्रत्येक प्रश्नावर ते अधिक आक्रमक होतात. अगदी अधिकाऱ्यांना मारहाण करण्यापर्यंत ते आक्रमक होऊन जातात.

निवडणूक बातम्या 2024
अजित पवारांचा एकनाथ शिंदेंना दणका, हुकमी एक्का राष्ट्रवादीत सामील
अजित पवारांचा एकनाथ शिंदेंना दणका, हुकमी एक्का राष्ट्रवादीत सामील
मोठी बातमी! भाजप शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत
मोठी बातमी! भाजप शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत
काँग्रेसला खिंडार... माजी आमदाराने तडकाफडकी पक्ष सोडला; थेट...
काँग्रेसला खिंडार... माजी आमदाराने तडकाफडकी पक्ष सोडला; थेट...
शिंदे यांच्या दोन आमदारांच्या दोन तऱ्हा, युती कोणासोबत करणार?
शिंदे यांच्या दोन आमदारांच्या दोन तऱ्हा, युती कोणासोबत करणार?
तिकीट द्या नाहीतर जीवाचं काहीतरी करून घेईन, भाजप कार्यकर्त्याची धमकी
तिकीट द्या नाहीतर जीवाचं काहीतरी करून घेईन, भाजप कार्यकर्त्याची धमकी
हर्षवर्धन सपकाळ यांचे निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
हर्षवर्धन सपकाळ यांचे निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
माणिकराव कोकाटेंना पोलिसांनीच लपवलं... बड्या नेत्याचा खळबळजनक आरोप
माणिकराव कोकाटेंना पोलिसांनीच लपवलं... बड्या नेत्याचा खळबळजनक आरोप
राज्यात काँग्रेसमध्ये भूकंप, भाजपमध्ये होणार मोठा पक्षप्रवेश
राज्यात काँग्रेसमध्ये भूकंप, भाजपमध्ये होणार मोठा पक्षप्रवेश
ज्या घोषणेची उत्सुकता... ठाकरे बंधूंच्या युतीबाबत काय म्हणाले राऊत ?
ज्या घोषणेची उत्सुकता... ठाकरे बंधूंच्या युतीबाबत काय म्हणाले राऊत ?
निवडणूक व्हिडिओ