मोठी बातमी ! अजित पवारांचा एकनाथ शिंदेंना दणका, हुकमी एक्का राष्ट्रवादीत सामील
Dhule Election : धुळ्यात अजित पवार यांनी आपले महायुतीतील सहकारी एकनाथ शिंदे यांनी मोठा धक्का दिला आहे. एका महत्त्वाच्या नेत्याने राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

राज्यातील 29 महानगर पालिकांच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे. ही निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता अनेक नेते पक्षांतर करताना दिसत आहे. महाविकास आघाडीतील नेते महायुतीत प्रवेश करत आहेत, तर महायुतीतील काही नेते आपल्याच मित्र पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीपूर्वी अनेक प्रमुख पक्षांची चिंता वाढली आहे. आता धुळ्यात अजित पवार यांनी आपले महायुतीतील सहकारी एकनाथ शिंदे यांनी मोठा धक्का दिला आहे. एका महत्त्वाच्या नेत्याने राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे धुळ्यातील राजकीय समीकरण बदलले आहे. हा नेता कोण आहे? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
शिवसेनेला मोठा धक्का
धुळे महानगर पालिकेसाठी 15 जानेवारीला मतदान पार पडणार आहे, तर 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीची तयारी सुरू असताना आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे महानगर प्रमुख संजय गुजराती यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुंबईत हा पक्षप्रवेश पार पडला. संजय गुजराती यांच्यासह शिवसेनेचे माजी नगरसेवक चंद्रशेखर दुसाने यांनीदेखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे पक्षांतर झाल्याने धुळ्याच्या राजकारणात नवीन ट्विस्ट निर्माण झाला आहे.
राष्ट्रवादीची ताकद वाढली
संजय गुजराती यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे आगामी निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. तर एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसला आहे. आगामी निवडणुकीत याचा फटका एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला आता नवीन महानगर प्रमुख शोधावा लागणार आहे. त्यामुळे शिवसेनेची चिंता वाढली आहे.
धुळे महानगर पालिकेचा निवडणूक कार्यक्रम
- अर्ज दाखल करण्याची तारीख : 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर
- अर्जांची छाननी : 31 डिसेंबर
- उमेदवारी माघार घेण्याची तारीख : 2 जानेवारी
- चिन्ह वाटप व अंतिम यादी जाहीर होण्याची तारीख : 3 जानेवारी
- मतदान : 15 जानेवारी
- निकाल : 16 जानेवारी
