Bihar Election Results 2025: टायगर अभी जिंदा है! या 11 कारणांमुळे NDAचा महाविजय, झटपट जाणून घ्या

Nitish Kumar JDU Big Leap: भाजपची शांतेत महिला क्रांतीची जादू बिहारमध्ये पण चालली. बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीश कुमार सरकार येत आहे. गेल्या 20 वर्षांपासूनची त्याची राजकीय पकड ढिल्ली झाली नसल्याचे दिसून आले. या महाविजयाची ही आहेत मोठी कारणं...

Bihar Election Results 2025: टायगर अभी जिंदा है! या 11 कारणांमुळे NDAचा महाविजय, झटपट जाणून घ्या
नितीश कुमार, भाजप, महाआघाडी
| Updated on: Nov 14, 2025 | 12:05 PM

Bihar Election Results 2025: ‘बिहार में बहार है, फिर नीतीश सरकार हैं’, असा नारा देण्यात आला होता. बिहारमध्ये नितीश कुमार यांची जादू कायम असल्याचे दिसून आले. भाजपने शांतेत महिला क्रांती अनेक राज्यात केली, तिची जादू बिहारमध्ये पण दिसून आली. पण सर्वात अविश्वसनीय कल हे नितीश कुमार यांच्या जनता दल(संयुक्त) पक्षाचे आहे. बिहारमधून नितीश कुमारांचा सुपडासाफ होईल असे वाटत असतानाच नितीश कुमार यांनी सर्वात मोठी मुसंडी मारली. गेल्या 20 वर्षांपासूनची त्यांची सत्तेवरची आणि जनताच्या मनावरील पकड तसूभरही कमी झाले नसल्याचे या कलावरून तरी समोर येत आहे. विरोधकांनाच नाही तर भाजपला सुद्धा नितीश कुमार यांचा जलवा दिसल्याची प्रतिक्रिया बिहारी जनतेतून उमटत आहेत.

भारतीय निवडणूक आयोगानुसार, Bihar Election 2025 मधील पहिल्या टप्प्यात एकूण 65.08 टक्के मतदारांमध्ये 61.56 टक्के पुरुष तर 69.04 टक्के महिला मतदार होत्या. तर दुसऱ्या टप्प्यात एकूण 69.20 टक्के मतदारांमध्ये 64.41 टक्के पुरुष तर 74.56 टक्के महिलांचा समावेश होता. तर दुसऱ्या टप्प्यात 10.15 टक्के महिलांनी पुरुषांच्या तुलनेत जास्त मतदान केले. जे कल समोर येत आहे, त्यात एनडीएचे सरकार बहुमताने येणार असल्याचे दिसते. तर महाराष्ट्राप्रमाणेच विरोधकांना, विरोधी पक्ष नेतेपद पण मिळेल की नाही अशी अवस्था आहे.

NDA पुन्हा सत्तेत येण्यासाठीची मुख्य कारणं

1. 50 टक्के पंचायत आरक्षणाचा मास्टर स्ट्रोक

नितीश कुमार यांचा हा पहिला मास्टरस्ट्रोक मानण्यात येतो. महिलांना पंचायत समिती आणि नगर पालिकांमध्ये थेट 50 टक्क्यांचे आरक्षण निश्चित करण्यात आले. आज जवळपास 1.35 लाख महिला सरपंच, नगरसेवक आणि नगराध्यक्ष सत्तेच्या केंद्रस्थानी आले आहे. महिला आता केवळ घराबाहेर नाही तर सत्तेच्या केंद्र स्थानी आणल्या गेल्या. महिलांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मिळाले. त्याचा परिणाम सद्या दिसत आहे.

2. मोफत सायकल योजना भारी पडली

मुलींची शाळेतील गळती थांबवण्यासाठी मोफत सायकल योजना आणण्यात आली. या योजनेमुळे मुलींची शाळेतील गळती 40 टक्क्यांहून 18 टक्क्यांपर्यंत घसरली. या योजनेत दरवर्षी 14 लाखांहून अधिक सायकली वितरीत करण्यात आल्या. एका सायकलने केवळ शिक्षणच नाही तर मुलींना आत्मविश्वासही दिला.

3. दारुबंदीचा 2016 मधील निर्णय परिणामकारक

2016 मध्ये बिहारमध्ये दारुबंदी करण्यात आली होती. या एका निर्णयाचे मोठे परिणाम गेल्या नऊ वर्षांत दिसून आले. घरगुती हिंसाचारात 35 टक्के कमी आली. महिलांच्या बचतीत 22 टक्क्यांची वृद्धी आली. नैतिकच नाही तर महिलांची सुरक्षा आणि आर्थिक स्वातंत्र्याच्या दृष्टीने नितीश कुमारांचा हा मास्टरस्ट्रोक पुन्हा कामी आला.

4. जीविका दीदी नेटवर्क

10 लाखांहून अधिक स्वंय सहायता समूहाशी 1.2 कोटी महिला जोडल्या गेल्या. या दीदी केवळ कर्ज घेत नाही तर NDA चे डोअर टू डोअर कॅम्पेन चालवतात. 2025 मध्ये महिला संवाद अभियानात या दीदींनी 2 कोटी घरांपर्यंत नितीश कुमार यांचा संदेश पोहचवला.

5. मुख्यमंत्री महिला रोजगार कर्ज योजना

प्रत्येक पात्र महिलेला 10 हजार रुपये रोख सहकार्य देण्यात आले. सोबत 2 लाखांपर्यंत विना हमी कर्ज देण्यात येऊ लागले. 2024-25 मध्ये 18 लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळाला. ही योजना केवळ पैसेच नाही, तर स्वंयरोजगारासाठी महत्त्वपूर्ण ठरली. निवडणुकीपूर्वी 1.21 कोटी महिलांच्या खात्यात 10 हजार रुपये जमा झाले. ही निवडणूक जिंकण्याची चावी ठरली.

6. मुख्यमंत्री कन्या योजना

मुख्यमंत्री कन्या उत्थान योजना पण गेमचेंजर ठरली. मुलीच्या जन्मापासून ते पदवीपर्यंत 54,100 रुपयांची मदत देण्यात आली. 1. कोटी मुलींना त्याचा लाभ झाला. ही योजना केवळ आर्थिकच नाही, तर स्त्री-पुरुष समानतेसाठी महत्त्वपूर्ण ठरली. महाआघाडीने 30 हजार रुपये वार्षिक मदतीचे आश्वासन दिल्यावरही नितीश कुमार यांच्या योजनांवर महिलांनी विश्वास दाखवला.

7. विद्यार्थिनी पोषाख योजना

प्रत्येक वर्षी 1.40 कोटी विद्यार्थिनींना पोषाखासाठी भत्ता देण्यात आला. ही रक्कम तशी छोटी आहे, पण त्यामुळे सरकारवरील विश्वास वाढला. सरकारविषयी विद्यार्थिनींमध्ये आणि कुटुंबियांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले.

8. जंगलराजविरोधात सुशासन

पंतप्रधान मोदी यांच्यासह एनडीएच्या अनेक नेत्यांनी जंगलराजविरोधात सुशासन हा मुद्दा प्रचारात आणला. त्याच्यावर जोर दिला. 2005 पुर्वी राज्यात रात्री 8 वाजेनंतर रस्ते सुनसान असतं. पण आता 22-24 तासात वीज असते. 26,000 किमीचे रस्ते आहेत. पोलीस स्टेशनमध्ये महिला कक्ष आहे. त्यामुळे महिला भीती न बाळगता घराबाहेर पडत असल्याचा दावा एनडीएने केली.

9. महिला संवाद अभियान

निवडणुकीच्या 2 महिन्या अगोदर संवाद अभियान राबविण्यात आले. सव्वा लाख जीविका दीदी प्रत्येक कुटुंबाकडे गेल्या. सरकारी योजना आणि त्यासाठी सरकारचा पाठिंबा यावर त्यांनी जोर दिला. त्याचे मतात परिवर्तन झाल्याचे सध्याच्या कलावरून दिसून येते. महिलांना रोख रक्कम देणाऱ्या योजनांचा देशातील 10 राज्यात सत्ताधाऱ्यांना मोठा फायदा झाल्याचे दिसून आले आहे.

10. महिला मतदारांची निर्णायक भूमिका

2020: महिला 59.69 टक्के, पुरुष 54.1 टक्के

2025: महिला 71.8 टक्के तर पुरुष 62.98 टक्के

म्हणजे या निवडणुकीत जवळपास 70 लाख अधिक महिलांनी मतदानाचा अधिकार बजावला. महिला मतदारांची या निर्णायक भूमिकेने चित्र पालटल्याचे दिसून येते.

11. महिलांचा योजनेत थेट समावेश

बिहारमधील महिला लाभाच्या योजना केवळ पैसे देऊन मोकळ्या होत नाहीत. तर महिला या योजनेत हिरारीने त्यांचा सहभाग नोंदवतात. या जीविका दीदी बैठक घेतात. सायकल वितरणाचा निर्णय घेतात. त्याची माहिती नोंदवतात. गावातील दारुबंदी आणि दारुड्यांवर लक्ष ठेवतात. जुलै 2025 मध्ये महिलांना सरकारी नोकरीत 35 टक्के आरक्षण आणि महिला योजनांमुळे नितीश कुमार लोकप्रिय ठरले आहेत.