BMC Election 2026 Voting: उद्याचा निकाल… देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान; शाई पुसण्याच्या प्रकारावर सूचक विधान
BMC Election 2026 Voting: राज्यात आज सकाळापासून महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, मतदान केल्यानंतर बोटाला लावली जाणारी शाई पुसली जात असल्याचे समोर आले आहे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महानगरपालिका निवडणूक जाहिर झाल्यानंतर विरोधी पक्षांकडून सातत्याने निवडणूक आयोगाच्या कारभारावर शंका उपस्थित केली जात आहे. आज सकाळ पासून सुरु असलेल्या मतदानानंतर बोटावर लावली जाणारी शाई पुसली जात असल्याच्या धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत यंदा मतदान करणाऱ्या नागरिकांच्या बोटावर शाईऐवजी मार्करने खूण केली जात आहे. पण ही मार्करने केली जाणारी खूण पुसली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री?
Municipal Election 2026
Maharashtra Municipal Election 2026 : जळगाव मतदान केंद्रावर तणावाचे वातावरण
Maharashtra Election 2026 : पिंपरी चिंचवड महापालिकेत 16.03 टक्के मतदान
BMC Election 2026 Voting : उद्धव ठाकरेंनी काय मागणी केली?
BMC Election 2026 Voting : निवडणूक याद्यांचा गोंधळ आहेच - उद्धव ठाकरे
Maharashtra Election Poll Percentage : चंद्रपूर महापालिकेत मतदानाची टक्केवारी किती ?
Maharashtra Election Voting Percentage : जळगाव महानगरपालिका निवडणुकीत मतदानाची टक्केवारी किती ?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आई आणि पत्नीसोबत नागपूरमध्ये मतदान करण्यासाठी गेले आहेत. तेथे मतदान केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान, मुख्यमंत्र्यांना बोटावर लावली जाणारी शाई नसून मार्कर आहे आणि ते पुसले जात आहे याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी, असं आहे की, पहिल्यांदा तर या सर्व गोष्टी निवडणूक आयोग ठरवतं आणि यापूर्वीही अनेक वेळा मार्कर पेन वापरण्यात आले आहे. तथापी जर कोणाचा काही आक्षेप असेल तर निवडणूक आयोगाने या संदर्भात लक्ष द्यावे. मात्र, मला असं वाटतय काही लोक उद्याचा निकाल प्रिएम्प्ट करुन निकाल आल्यानंतर कशाला दोष द्यायचा याची तयारी करत आहेत हे मात्र स्पष्ट दिसत आहे असे म्हटले आहे.
राज्य निवडणूक आयोगाकडून यंदा मतदानासाठी शाईऐवजी मार्करचे किट उपलब्ध करुन देण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. हा मार्कर 2012 पासून प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वापरला जात असल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने शेवटच्या क्षणी घेतलेले काही निर्णय वादग्रस्त ठरत आहेत. निवडणूक आयोगाने आता एक PADU नावाचं नवीन मशीन आणलं आहे. प्रिंटींग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट (PADU) मशीन असं त्याचे नाव आहे. मुंबईतील काही वॉर्डमध्ये ईव्हीएमला बॅकअप म्हणून हे यंत्र वापरले जाणार आहे. निवडणूक आयोगाने शेवटच्या क्षणी याबाबत माहिती दिल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. यापूर्वी कधीही PADU मशीन वापरण्यात आले नव्हते. मग निवडणूक आयोगाने आताच हे मशीन का वापरले, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला होता.
यंदाच्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून मतदान प्रक्रियेत शाईऐवजी मार्करचे किट उपलब्ध करून देण्यात आले आहेत, अशी माहिती महापालिका प्रशासनाने स्पष्ट केली आहे. निवडणूक आयोगाच्या मते, हा मार्कर २०१२ पासूनच विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये वापरला जात आहे. तसेच, निवडणूक आयोगाने शेवटच्या क्षणी घेतलेले काही निर्णय वादाचा विषय ठरत आहेत. यातील एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे PADU (Printing Auxiliary Display Unit – प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट) नावाचे नवीन यंत्र आणणे. हे यंत्र ईव्हीएमला बॅकअप म्हणून काम करणार असून, मुंबईतील काही ठिकाणी मतमोजणीवेळी तांत्रिक अडचण आल्यास मतसंख्या प्रदर्शित करण्यासाठी त्याचा वापर केला जाणार आहे.
विरोधकांनी या यंत्राबाबत शेवटच्या क्षणी माहिती दिल्याचा आरोप केला आहे. यापूर्वी कधीही PADU मशीनचा वापर झालेला नाही. त्यामुळे हे यंत्र आता अचानक का आणले, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. निवडणूक आयोग आणि प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, हे यंत्र फक्त अत्यंत अपवादात्मक परिस्थितीतच (तांत्रिक बिघाड झाल्यास) वापरले जाईल आणि सामान्य प्रक्रियेत त्याचा वापर होणार नाही. मुंबईसाठी एकूण १४० अशी PADU यंत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.