Devendra Fadnavis | उत्पल पर्रिकरांचा पराभव, भाजपचा विजय, तरीही फडणवीसांना आनंद का नाही?

उत्पल पराभूत झाल्याचा आनंद व्यक्त करु शकत नाही, कारण ते आमच्या कुटुंबाचा भाग आहेत. भविष्यात काय करायचं ते ठरवू. त्यांनी (उत्पल) योग्य निर्णय घेतला असता तर ते आज आमदार झाले असते, असं वक्तव्य फडणवीसांनी केलं.

Devendra Fadnavis | उत्पल पर्रिकरांचा पराभव, भाजपचा विजय, तरीही फडणवीसांना आनंद का नाही?
उत्पल पर्रीकरांबाबत मोठं वक्तव्यImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 10, 2022 | 4:23 PM

पणजी : गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रिकर (Utpal Manohar Parrikar) यांना पराभवाचा धक्का बसला आहे. पणजी मतदारसंघातून भाजपचे उमेदवार बाबुश मोन्सरात (Babush Atanasio Monserrate) विजयी झाले. त्यामुळे भाजपविरोधात बंड पुकारत अपक्ष मैदानात उतरलेल्या उत्पल पर्रिकरांना पराभवाचा झटका बसला. मात्र उत्पल पराभूत झाल्याचा आनंद व्यक्त करु शकत नाही, अशी प्रतिक्रिया गोवा विधानसभा निवडणुकांचे भाजप प्रभारी आणि महाराष्ट्रातील विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केली आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

उत्पल पराभूत झाल्याचा आनंद व्यक्त करु शकत नाही, कारण ते आमच्या कुटुंबाचा भाग आहेत. भविष्यात काय करायचं ते ठरवू. त्यांनी (उत्पल) योग्य निर्णय घेतला असता तर ते आज आमदार झाले असते, असं वक्तव्य फडणवीसांनी केलं. तीन अपक्ष आमदारांचा भाजपला पाठिंबा आहे. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षालाही सोबत घेण्याची आमची तयारी आहे. गोव्यातील भाजपचा विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गोव्याच्या जनतेमुळे झाल्याचंही त्यांनी सांगितलं. पहिल्याच दिवशी मी सांगितलं होतं, की शिवसेनेची लढाई नोटाशी आहे. आमच्या मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात त्यांनी मोठी सभा घेतली, तिथे त्यांच्या उमेदवाराला 97 मतं मिळाली, शंभरीही गाठली नाही, असं फडणवीस म्हणाले.

उत्पल पर्रिकरांना डावलून तिकीट

पर्रिकरांसारख्या दिग्गज नेत्याने फक्त गोव्याचं मुख्यमंत्रिपदच भूषवलं नाही, तर केंद्रातील मोदी सरकारमध्ये संरक्षण मंत्रालयाची धुरा सांभाळली. त्या पर्रिकरांच्या पश्चात, त्यांच्या मुलाला डावलून भाजपने बाबुश मोन्सरात यांना तिकीट दिलं होतं. भाजपचा हा निर्णय योग्य ठरल्याचं दिसत आहे. पणजी वगळून दुसरीकडून उमेदवारी देण्याच्या ऑफर त्यांना मिळाल्या. पण पणजीतून लढण्यावर उत्पल ठाम होते.  पणजीत उत्पल पर्रिकर यांना डावून ज्यांना उमेदवारी देण्यात आली, त्यांनी एकेकाळी पणजी पोलिस स्थानकावर हल्लाही केला होता. त्यामुळे पणजीबाबत आग्रही असलेल्या उत्पल यांना डावलण्यामागे भाजपची नेमकी काय स्ट्रॅटर्जी आहे? असा प्रश्न उपस्थित झाला होता.

बाबुश यांच्याबाबत इंटरेस्टिंग गोष्टी

पणजीतून भाजपनं बाबुश मॉन्सेरात यांना उमेदवार दिली. बाबुश मॉन्सेरात यांचा राजकीय प्रवास हा फारच रंजक आहे. काँग्रेसमधून बाबुश यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी काँग्रेस सोडून यूगो पक्षात प्रवेश केला होता. यूगो पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणूक लढली आणि जिंकली देखील होती.

तीन वेगवेगळ्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची आणि जिंकण्याची किमया बाबुश यांनी करुन दाखवली आहे. ताळगाव, पणजी आणि सांताक्रूझ या मतदारसंघातून बाबुश यांनी विधानसभा निवडणूक जिंकून दाखवलेली आहे. त्यामुळे पणजी आणि आजूबाजूच्या मतदारसंघात त्यांची लोकप्रियता किती प्रचंड आहे, याची कल्पना करता येऊ शकेल.

अशावेळी इतक्या तगड्या उमेदावाराला डावलून उत्पल यांना पणजीतून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता फारच कमी असणार, असं मत अनेक राजकीय जाणकारांनी व्यक्त होतं. जे कालांतरानं खरंही झाल्याचं सगळ्यांनीच पाहिलं.

उत्पल यांचे आरोप खरे ठरले!

पणजीतून उमेदवारी मिळत नाही म्हटल्यानंतर उत्पल यांनी भाजपला सुनावलं होतं. गुन्हेगारी पात्रता असलेल्यांना तिकीट दिलं जात असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. या टीकेमागची पार्श्वभूमी नेमकी काय आहे, याचीही चर्चा रंगली आहे.

बाबुश मॉन्सेरात आणि पणजीचा पोलिस स्थानकावरील हल्ला

2008 साली झालेल्या पणजी पोलिस स्थानकावरील हल्ल्यानंतर पणजीचे बाबुश मॉन्सेरात चांगलेच चर्चेत आले होते. दरम्यान, बलात्कारासारख्या गंभीर आरोपांमुळे त्यांनी तुरुंगवासही भोगलेला आहे. इतकंच काय तर ताळगाव आयटी हबविरोधात त्यांनी तीव्र आंदोलनही केलं होतं.

संबंधित बातम्या :

गोव्याचे मुख्यमंत्री हरता-हरता जिंकले, दोन्ही ‘आयाराम’ उपमुख्यमंत्री पडले

गोव्यात शिवसेना-राष्ट्रवादीचं काय झालं? ‘नोटा’पेक्षाही कमी मतं?

कोणाला 49, कोणाला 55, सर्वाधिक 342, गोव्यात शिवसेना उमेदवारांना किती मतं?

Non Stop LIVE Update
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'.
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत.