AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Utpal Parrikar | मनोहर पर्रिकरांच्या ‘बंडखोर’ मुलाला पराभवाची धूळ, भाजपचे बाबुश मोन्सरात आहेत तरी कोण?

पणजीतून भाजपनं बाबुश मॉन्सेरात यांना उमेदवार दिली. बाबुश मॉन्सेरात यांचा राजकीय प्रवास हा फारच रंजक आहे. काँग्रेसमधून बाबुश यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली.

Utpal Parrikar | मनोहर पर्रिकरांच्या 'बंडखोर' मुलाला पराभवाची धूळ, भाजपचे बाबुश मोन्सरात आहेत तरी कोण?
उत्पल पर्रिकर यांना पराभवाचा धक्काImage Credit source: टीव्ही9
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Mar 10, 2022 | 12:23 PM
Share

पणजी : गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रिकर (Utpal Manohar Parrikar) यांना पराभवाचा धक्का बसला आहे. पणजी मतदारसंघातून भाजपचे उमेदवार बाबुश मोन्सरात (Babush Atanasio Monserrate) विजयी झाले. त्यामुळे अपक्ष मैदानात उतरलेल्या उत्पल पर्रिकरांना पराभवाचा झटका बसला. पर्रिकरांसारख्या दिग्गज नेत्याने फक्त गोव्याचं मुख्यमंत्रिपदच भूषवलं नाही, तर केंद्रातील मोदी सरकारमध्ये संरक्षण मंत्रालयाची धुरा सांभाळली. त्या पर्रिकरांच्या पश्चात, त्यांच्या मुलाला डावलून भाजपने बाबुश मोन्सरात यांना तिकीट दिलं होतं. भाजपचा हा निर्णय योग्य ठरल्याचं दिसत आहे. पणजी वगळून दुसरीकडून उमेदवारी देण्याच्या ऑफर त्यांना मिळाल्या. पण पणजीतून लढण्यावर उत्पल ठाम होते.  पणजीत उत्पल पर्रिकर यांना डावून ज्यांना उमेदवारी देण्यात आली, त्यांनी एकेकाळी पणजी पोलिस स्थानकावर हल्लाही केला होता. त्यामुळे पणजीबाबत (Panaji) आग्रही असलेल्या उत्पल यांना डावलण्यामागे भाजपची नेमकी काय स्ट्रॅटर्जी आहे? असा प्रश्न उपस्थित झाला होता. पण ही धोरणं यशस्वी ठरल्याचं चित्र आहे.

बाबुश यांच्याबाबत इंटरेस्टिंग गोष्टी

पणजीतून भाजपनं बाबुश मॉन्सेरात यांना उमेदवार दिली. बाबुश मॉन्सेरात यांचा राजकीय प्रवास हा फारच रंजक आहे. काँग्रेसमधून बाबुश यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी काँग्रेस सोडून यूगो पक्षात प्रवेश केला होता. यूगो पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणूक लढली आणि जिंकली देखील होती.

तीन वेगवेगळ्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची आणि जिंकण्याची किमया बाबुश यांनी करुन दाखवली आहे. ताळगाव, पणजी आणि सांताक्रूझ या मतदारसंघातून बाबुश यांनी विधानसभा निवडणूक जिंकून दाखवलेली आहे. त्यामुळे पणजी आणि आजूबाजूच्या मतदारसंघात त्यांची लोकप्रियता किती प्रचंड आहे, याची कल्पना करता येऊ शकेल.

अशावेळी इतक्या तगड्या उमेदावाराला डावलून उत्पल यांना पणजीतून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता फारच कमी असणार, असं मत अनेक राजकीय जाणकारांनी व्यक्त होतं. जे कालांतरानं खरंही झाल्याचं सगळ्यांनीच पाहिलं.

उत्पल यांचे आरोप खरे ठरले!

पणजीतून उमेदवारी मिळत नाही म्हटल्यानंतर उत्पल यांनी भाजपला सुनावलं होतं. गुन्हेगारी पात्रता असलेल्यांना तिकीट दिलं जात असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. या टीकेमागची पार्श्वभूमी नेमकी काय आहे, याचीही चर्चा रंगली आहे.

बाबुश मॉन्सेरात आणि पणजीचा पोलिस स्थानकावरील हल्ला

2008 साली झालेल्या पणजी पोलिस स्थानकावरील हल्ल्यानंतर पणजीचे बाबुश मॉन्सेरात चांगलेच चर्चेत आले होते. दरम्यान, बलात्कारासारख्या गंभीर आरोपांमुळे त्यांनी तुरुंगवासही भोगलेला आहे. इतकंच काय तर ताळगाव आयटी हबविरोधात त्यांनी तीव्र आंदोलनही केलं होतं.

संबंधित बातम्या :

गोवा विधानसभा निवडणुकांचा पहिला निकाल, विश्वजीत राणे विजयी

गोव्यात शिवसेना-राष्ट्रवादीचं काय झालं? ‘नोटा’पेक्षाही कमी मतं?

Follow Us
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती