AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Goa Assembly Elections 2022 : उत्पल पर्रिकरांसाठी शिवसेनेची फिल्डिंग, उमेदवारी अर्ज मागे घेणार; भाजपचा गेम होणार?

गोव्यातील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज गोव्यात उमेदवारांच्या प्रचारासाठी येत आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेने मोठी घोषणा करून भाजपची डोकेदुखी वाढवली आहे.

Goa Assembly Elections 2022 : उत्पल पर्रिकरांसाठी शिवसेनेची फिल्डिंग, उमेदवारी अर्ज मागे घेणार; भाजपचा गेम होणार?
उत्पल पर्रिकरांसाठी शिवसेनेची फिल्डिंग, उमेदवारी अर्ज मागे घेणार; भाजपचा गेम होणार?
| Edited By: | Updated on: Jan 30, 2022 | 3:15 PM
Share

पणजी: गोव्यातील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज गोव्यात उमेदवारांच्या प्रचारासाठी येत आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेने मोठी घोषणा करून भाजपची डोकेदुखी वाढवली आहे. भाजपचे बंडखोर नेते उत्पल पर्रिकर यांना शिवसेनेने पाठिंबा जाहीर केला आहे. पर्रिकरांसाठी आमचा उमदेवार त्याचा अर्ज मागे घेईल. तसेच शिवसेना उत्पल पर्रिकरांचा प्रचार करेल, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. शिवसेनेच्या या खेळीमुळे भाजपची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेने पर्रिकर यांना पाठिंबा दिल्याने पणजीची लढत अधिकच रंगतदार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्रिकर या मतदारसंघातून विजयी होतात की भाजप ही जागा राखण्यात यश मिळवते याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली. उत्पल पर्रिकरांनी अर्ज भरला आहे. त्यांचा अर्ज वैद्य ठरला आहे. त्यामुळे आमचा उमेदवार शैलेंद्र वेलिंगकर उमेदवारी अर्ज मागे घेईल. आमचे कार्यकर्ते मुंबईतून येतील तेही पर्रिकर यांचा प्रचार करतील, असं राऊत म्हणाले.

शहांकडे भरपूर वेळ

यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही टीका केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे उत्तर प्रदेशात आणि गोव्यात घरोघरी प्रचार करत आहेत. चांगली गोष्ट आहे. त्यांच्याकडे भरपूर वेळ आहे. चांगलं आहे. ही त्यांची पक्षाशी निष्ठा आहे. देशासमोर अनेक प्रश्न असताना ते घरोघरी जात आहेत, असा टोला राऊत यांनी लगावला.

तर वायनऱ्या सोमय्यांच्या नावावर करू

यावेळी वायनरीच्या मुद्द्यावरून त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली. आमची एखादी वायनरी असेल तर ती त्यांनी ताब्यात घ्यावी. त्यांनी चालवावी. एखाद्या कुटुंबातील व्यक्ती काही व्यवसाय करत असेल तर तो काय गुन्हा आहे का? कुणीही असेल… कुणी व्यवसाय करत असेल… कुणी काम करत असेल… बँकांना लुबाडणं, चोऱ्यामाऱ्या करणं यापेक्षा कष्ट करणं, काम करणं, श्रम करणं कधीही चांगलं. भाजपचे थोतांडी लोकं काहीही म्हणत होते. मला कुणी तरी ते सांगितलं. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा मला फोन होता, तेही हसत होते. आमच्या कुटुंबाच्या काही वायनऱ्या असतील तर सोमय्या यांच्या नावावर करून द्यायला तयार आहे, असं त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

प्रधान सल्लागारानेच सहयोगी पक्षाच्या प्रतिष्ठेची लक्तरे उडविली; मुख्यमंत्री उत्तर देणार काय?, चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल

शिवसेना-भाजप एकत्र येणं शक्य नाही, युतीच्या गप्पांना पूर्णविराम मिळाला; संजय राऊतांनी रोखठोक ठणकावले

संजय राऊतांची वाईन व्यवसायात गुंतवणूक, बड्या उद्योजकाशी पार्टनरशीप; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.