तामिळनाडूत कामराज, आसाममध्ये गोगोई आणि बंगालमध्ये प्रणवदा; वाचा, काँग्रेस नेत्यांना भाजपने कसे केले हायजॅक!

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. (how did bjp hijack congress leaders in five states assembly election)

तामिळनाडूत कामराज, आसाममध्ये गोगोई आणि बंगालमध्ये प्रणवदा; वाचा, काँग्रेस नेत्यांना भाजपने कसे केले हायजॅक!
congress leader
भीमराव गवळी

|

Mar 23, 2021 | 10:05 PM

नवी दिल्ली: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. त्यातही पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू आणि आसाममध्ये सर्वच राजकीय पक्षाने जोर लावला आहे. भाजपने तर काँग्रेसच्याच बड्या नेत्यांना हायजॅक करून काँग्रेसच्या नाकीनऊ आणले आहेत. भाजपने तामिळनाडूत काँग्रेसचे दिवंगत नेते कामराज, पश्चिम बंगालमध्ये दिवंगत काँग्रेस नेते प्रणव मुखर्जी आणि आसाममध्ये दिवंगत काँग्रेस नेते तरुण गोगोई यांचे सभेमध्ये मोठमोठे कटआऊट लावून मते मागण्यास सुरुवात केली आहे. भाजपच्या या खेळीमुळे काँग्रेसची मात्र पुरती दमछाक होत आहे. (how did bjp hijack congress leaders in five states assembly election)

तामिळनाडूत काय घडतंय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच कोईम्बतूरला आले होते. त्यांनी या ठिकाणी एका रॅलीला संबोधित केलं. यावेळी तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि एआयडीएमकेचे नेते दिवंगत एमजीआर आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री के. कामराज यांचे कटआऊट लावण्यात आले होते. मोदींच्या कटआऊट्स पेक्षाही या नेत्यांचेही कटआऊट्स मोठे होते. तामिळनाडूच्या राजकारणात या दोन नेत्यांपेक्षा कुणाचंही स्थान मोठं नाही. त्यांची जागा कुणीच घेऊ शकत नाही, हेच भाजपला यातून सूचवायचं होतं. कामराज हे काँग्रेस पक्षाचे किंगमेकर होते. माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधी यांना पंतप्रधान बनविण्याचं श्रेय कामराज यांना जातं. भाजपने काँग्रेसच्या या नेत्यांचे कटआट्स लावण्याची खेळी खेळली असली तरी त्याचा किती फायदा होईल हे निवडणूक निकालानंतरच कळेल.

भाजपच्या या खेळीला मात्र डीएमके नेते स्टालिन यांनी उधळून लावण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपकडे कोणताही नेताही नाही. त्यामुळेच त्यांनी दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांचे कटआऊट्स आपल्या रॅलीत लावले आहेत, अशी टीका केली. तर भाजपचा मित्र पक्ष असलेल्या एआयडीएमकेने एमजी रामचंद्रन यांचा फोटो एका व्हिडीओ टीजरमध्ये वापरल्याबद्दल भाजपकडे नाराजी व्यक्त केली आहे. दोन्ही पक्षांची आघाडी असली तरी भाजप स्वतंत्र प्रचार करत असताना ते एमजीआर यांचा फोटो वापरू शकत नाही, असं एआयडीएमकेचं म्हणणं आहे.

आसामची खेळी काय?

आसामची कहानी तर आणखीनच रंजक आहे. भाजने गेल्या विधानसभा निवडणुकीत ज्या नेत्याला विरोध केला, त्यांच्यावर आरोप केले, आता त्याच नेत्याचा जयजयकार करत आहे. माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचे काही महिन्यांपूर्वीच निधन झालं. गोगोई हे अहोम समुदायातून येतात. गोगोईंचा सन्मान हा आसामी जनतेसाठी त्यांच्या अस्मितेचा सन्मान आहे. भाजपने हे आधीच ओळखलं होतं. त्यामुळे त्यांनी गोगोई यांना मरणोपरांत पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवलं होतं. काँग्रेसने बदरुद्दीन अजमल यांच्या पक्षाची आघाडी केली आहे. त्यामुळे भाजपने गोगोईंना आसामी संस्कृती आणि सभ्यतेचे रक्षक म्हणून घोषित केलं आहे. गोगोईंनी जिवंत असेपर्यंत अजमल यांना कधीच भाव दिला नाही. आता केवळ भाजपच आसामच्या संस्कृतीची रक्षा करू शकते, असं म्हणत भाजपने काँग्रेसच्या नाकीनऊ आणले आहेत.

दीदी विरुद्ध दादा

पश्चिम बंगालमध्ये तर भाजपने अजब खेळी खेळली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वत:ला बंगालची मुलगी असल्याचा नारा दिला आहे. तर भाजपने माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना प्रचाराच्या केंद्र स्थानी आणलं आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत प्रणव मुखर्जी उभे होते. तेव्हा त्यांना पाठिंबा देण्याची दीदींची इच्छा नव्हती. जेव्हा शुभेंदू अधिकारी यांच्यासह 11 लोकांनी प्रणवदांना मतदान करण्याची मागणी केली तेव्हा दीदी पाठिंबा देण्यास तयार झाल्या, असं भाजप नेते दिनेश त्रिवेदी जाहीर सभांमधून सांगत आहेत. प्रणवदांना पाठिंबा द्यावा असं दीदींना वाटत नव्हतं. सोमनाथ चॅटर्जी किंवा एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावासाठी दीदींचा आग्रह होता, असंही त्रिवेदी यांनी म्हटलं आहे. (how did bjp hijack congress leaders in five states assembly election)

आयारामांना पायघड्या

भाजप नेहमी आयात केलेल्या नेतृत्वाला पुढे करत असते. एकेकाळी त्यांनी जॉर्ज फर्नांडिस आणि शरद यादव यांना आपला हिरो बनवलं आणि वेळ येताच त्यांना दूरही केलं. आता विचारधारा वगैरे असा काही प्रकार राहिलेला नाही. उदित राज यांनी भाजपला अनेकदा शिव्या घातल्या. रामविलास पासवान भाजपला नेहमी विरोध करायचे, पण संधीसाधू राजकारणामुळे त्यांना भाजपकडे जावं लागलं. विचारांशी तडजोड करावी लागली. त्याचप्रकारे भाजपनेही आपल्या विरोधी विचारांच्या लोकांना जवळ करून आपल्या फायद्यासाठी त्यांचा वापर केला. त्यामुळे त्यात वावगं काही नाही, असं ज्येष्ठ पत्रकार बाबा विजयेंद्र यांनी सांगितलं. (how did bjp hijack congress leaders in five states assembly election)

संबंधित बातम्या:

बंगालमध्ये सत्ता येताच भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात टाकणार; अमित शहांची गर्जना

काँग्रेस नेते संघ-भाजपशीही हातमिळवणी करू शकतात; राष्ट्रवादीच्या चाकोंचा दावा

पाच किलो मोफत तांदूळ देणार, पाच लाख घरे बांधणार; काँग्रेस आघाडीचा ‘पिपल्स मेनिफेस्टो’ जारी

(how did bjp hijack congress leaders in five states assembly election)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें