AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चंद्रपूर लोकसभा निकाल 2024 : मतदान वाढले, फायदा कुणाला? प्रतिभा धानोरकर यांची आघाडी तर मंत्री सुधीर मुनगंटीवार पिछाडीवर

Chandrapur Lok Sabha Election Results 2024 News in Marathi : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात भाजप नेते, मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि माजी दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर अशी तुल्यबळ लढत होत आहे.

चंद्रपूर लोकसभा निकाल 2024 : मतदान वाढले, फायदा कुणाला? प्रतिभा धानोरकर यांची आघाडी तर मंत्री सुधीर मुनगंटीवार पिछाडीवर
CHANDRAPUR LOKSABHA ELECTION RESULT 2024Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Mahesh Pawar
Mahesh Pawar | Updated on: Jun 04, 2024 | 9:14 AM
Share

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात चुरशीची लढत होताना दिसत आहे. पहिल्या फेरीत  मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना धक्का बसला आहे. कॉंग्रसच्या उमेदवार आमदार प्रतिभा धानोरकर यांनी मतमोजणीत मागे टाकले आहे.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात (Chandrapur Lok Sabha Constituency) भाजपचे राज्यातील नेते, मंत्री सुधीर मुनगंटीवार (Candidate of BJP Sudhir Mungantiwar) आणि माजी दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर (Candidate of Congress Pratibha Dhanorkar) अशी तुल्यबळ लढत होत आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत बाळू धानोरकर यांच्या रूपाने कॉंग्रेसचा एकमेव खासदार निवडून आला होता. मात्र, त्यांचे अकाली निधन झाले. त्यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. 2024 च्या निवडणुकीत कॉंग्रेसने त्यांच्या पत्नी प्रतिभा यांना उमेदवारी दिली आहे. तर, भाजपने मंत्री सुधीर सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी दिली. यावेळच्या लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर लोकसभेच्या मतदानात जवळपास 3 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या वाढलेल्या मतदानाचा फायदा कुणाला होणार याचा निर्णय अवघ्या काही तासात स्पष्ट होणार आहे.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभांपैकी बल्लारपूर (सुधीर मुनगंटीवार), वणी (संजीवरेड्डी बोदकुरवार), आर्णी (संदीप धुर्वे) या तीन मतदारसंघात भाजपचे वर्चस्व आहे. तर, वरोरा (प्रतिभा धानोरकर) आणि राजुरा (सुभाष धोटे) या दोन मतदारसंघात काँग्रेस आमदार आहेत. तर, चंद्रपूर विधानसभा किशोर जोरगेवार या अपक्ष आमदारांच्या ताब्यात आहे.

2004, 2009 आणि 2014 अशी सलग तीन वेळा ही जागा भाजपच्या ताब्यात होती. हंसराज अहिर हे येथील खासदार होते. 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसचे सुरेश (बाळू) धानोरकर यांनी त्यांचा पराभव केला.

निवडणूक निकालाशी संबंधित बातम्या वाचा :

लोकसभा निवडणूक निकाल 2024 LIVE मतमोजणी अपडेट्स

लोकसभा निकाल 2024 चे फुल कव्हरेज

लोकसभा मतदारसंघनिहाय निकाल 2024, एका क्लिकवर

Follow Us
वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद - बजरंग सोनवणे
Bajrang Sonawane : वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद; बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप
1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
Amravati : अमरावतीत दुष्काळाचा कहर; 1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना...
Chandrshekhar Bawankule : 50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड अन्...
उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी
NCP Sharad Pawar on CJP : उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी जाहीर केला पाठिंबा
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
Sanjay Raut on Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा! पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र
लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं एवढ्या कोटींना विकलं
Lalbaugcha Raja Auction : लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं तब्बल एवढ्या कोटींना विकलं! बाप्पाचा आशीर्वाद मानून भक्तानेच खरेदी केलं
मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? तब्बल एवढ्या कोटींच्या....
Manoj Jarange ED : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? आर्थिक व्यवहारांची गोपनीय चौकशी सुरू; तब्बल एवढ्या कोटींच्या व्यवहारांचा दावा
हे जैनांचं नाही, आगरी-कोळी, मराठी बांधवांचं शहर; मनसेचा कोणाला टोला?
MNS On Narendra Mehata : मीरा-भाईंदरच्या ओळखीवरून राजकीय रणकंदन! हे जैनांचं नाही, आगरी-कोळी आणि मराठी बांधवांचं शहर; मनसेचा नेमका कोणाला टोला?
मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने...
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने खळबळ; संजय राऊतांनी थेट...