
महाराष्ट्राच्या राजकारणात दोन वर्षांपूर्वी जून महिन्यात भूकंप घडवून शिवसेना ( Shivsena ) फोडल्यानंतर एकनाथ शिंदे देशभरात स्टार झाले. देशभरातील चर्चित व्यक्तीमत्व बनलेले एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या समावेशाने एनडीएला निदान महाराष्ट्रात तरी लोकसभा निवडणूकांत फारसा चमत्कार करता आलेला नाही. दुसरीकडे या अपयशाची जबाबदारी म्हणून महाराष्ट्र भाजपाचे सर्वेसर्वा देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला उपमुख्यमंत्री पदातून मुक्त करा अशी मागणी केली आहे. लोकसभा निवडणूकांत केवळ सात खासदार आणून देखील एकनाथ शिंदे हेच भाजपाच्या मिशन विधानसभेचे तुरुपाचे एक्के बनलेले आहेत. एकनाथ शिंदे यांनी त्यांचा ठाणे-कल्याण गड कायम राखल्याने तसेच कोकण, रायगड आणि संभाजीनगरातील विजय शिंदे सेनेचे टॉनिक ठरले आहे. एकनाथ शिंदे यांना सोबत घेतल्यानंतर महाराष्ट्रात शिवसेनेचे फारसे नुकसान झालेले नाही. परंतू शिवसेना उद्धव ठाकरे गटाने लढविलेल्या जागा आणि त्यांना जिंकलेल्या जागा अतिशय कमी आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाने 9 जागा जिंकल्या. तर शिंदे...