AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Loksabha Election Exit Poll 2024 : मुस्लिम मतदारांची साथ कोणाला? एक्झिट पोलचा चक्रावून टाकणारा आकडा

Loksabha Election Exit Poll 2024 : यंदाच्या लोकसभा निवडणूक 2024 मध्ये मुस्लिम मतदारांची भूमिका सुद्धा महत्त्वाची राहणार आहे. मुस्लिम मतदारांचा कल कुठल्या बाजूला आहे, ते एक्झिट पोलमधून समोर आलय. उद्या 4 जून रोजी लोकसभा निवडणूक 2024 चे निकाल जाहीर होतील.

Loksabha Election Exit Poll 2024 : मुस्लिम मतदारांची साथ कोणाला? एक्झिट पोलचा चक्रावून टाकणारा आकडा
Muslim Voters
| Updated on: Jun 03, 2024 | 10:53 AM
Share

लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होईल. मात्र, त्याआधी शनिवारी संध्याकाळी सातव्या टप्प्याच मतदान झाल्यानंतर अनेक वृत्त वाहिन्यांवर एक्झिट पोल आले. सर्वच एक्झिट पोलमधून भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी पुन्हा सत्तेवर येणार असा अंदाज वर्तवला आहे. एनडीला मोठा विजय मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एक्झिट पोलनुसार, एनडीएला मिळणाऱ्या मुस्लिम मतांमध्ये सुद्धा घट झाली आहे. भाजपाच्या अनेक नेत्यांनी मुस्लिम समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केली आहेत, तेच भाजपाच्या मुस्लिम मतांमध्ये घट होण्यामागच कारण आहे. 2019 लोकसभा निवडणुकीत एनडीएला 9 टक्के मुस्लिम मत मिळाली होती. तेच 2024 मध्ये हे प्रमाण कमी होऊन 6 टक्क्यावर येऊ शकतं.

इंडिया टुडे एक्सिस माय इंडिया एग्जिट पोलच्या आकड्यांनुसार इंडिया आघाडीच्या मुस्लिम मतांमध्ये मोठी वाढ होणार आहे. मागच्यावर्षी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा त्यानंतर भारत जोडो न्याय यात्रा केली. संविधान वाचवण्याच अपील केलं. त्यामुळे इंडिया आघाडीने मुस्लिम मतदारांचा विश्वास जिंकला. इंडिया आघाडीच्या मुस्लिम मतांमध्ये जवळपास 24 टक्के वाढ बघायला मिळू शकते. 2019 मध्ये हेच प्रमाण 52 टक्के होतं, ते यावेळी 76 टक्क्यांपर्यंत जाऊ शकतं.

उत्तर प्रदेशात मुस्लिम मतदार कुठे वळला?

एक्झिट पोलच्या आकड्यांनुसार यावेळी इंडिया आघाडीला उत्तर प्रदेशात 38 टक्के जास्त मुस्लिम मत मिळतील. यात बीएसपीच 34 टक्के मुस्लिम वोट इंडिया आघाडीकडे वळलय. एक्झिट पोलनुसार, बहुजन समाज पार्टीच्या मायावतीला खास फायदा होणार नाहीय. उत्तर प्रदेशात एनडीएला 6 टक्के मुस्लिम मत गमवावी लागू शकतात.

अन्य राज्यात मुस्लिम मतांची स्थिती काय?

बिहारमध्ये सुद्धा हाच ट्रेंड पहायला मिळतोय. इंडिया आघाडीला बिहारमध्ये अतिरिक्त 16 टक्के मुस्लिम मत मिळू शकतात. यात 5 टक्के एनडीएची आणि 11 टक्के अन्य पक्षांची वोटबँक आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमुल काँग्रेसला 2 टक्के मतांच नुकसान होईल. एनडीए आणि इंडिया आघाडीला एक-एक टक्के मत मिळतील. झारखंडमध्ये एनडीएची 4 आणि अन्य पक्षांची 2 टक्के मुस्लिम मत इंडिया आघाडीला मिळतील.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा