AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Modi 3.0 : राजनाथ सिंह, अमित शाह यांच्यासह मोदी मंत्रिमंडळात ‘या’ नव्या चेहऱ्यांना संधी, कोणत्या राज्यातून कुणाला लॉटरी ?

नरेंद्र मोदी हे आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान, आत्तापर्यंत अनेक खासदारांना मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी फोन आले आहेत. तेलुगु देसम पक्षाचे (टीडीपी) दोन नेते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान, आजच्या शपथविधी समारंभासाठी आज अनेक राष्ट्रांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. भारताने आपल्या शेजारील देश आणि हिंदी महासागर क्षेत्रातील नेत्यांना विशेष अतिथी म्हणून आमंत्रित केले आहे.

Modi 3.0 : राजनाथ सिंह, अमित शाह यांच्यासह मोदी मंत्रिमंडळात 'या' नव्या चेहऱ्यांना संधी, कोणत्या राज्यातून कुणाला लॉटरी ?
माजी राष्ट्रपतींना दरमहा दीड लाख रुपये पेन्शन, सरकारी घर, दोन मोफत लँडलाइन फोन, एक मोबाइल फोन आणि पाच वैयक्तिक कर्मचारी आदी सुविधाही मिळते.
| Updated on: Jun 09, 2024 | 12:02 PM
Share

नरेंद्र मोदी आज सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. नरेंद्र मोदी यांनी सकाळी राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली आणि अटलबिहारी वाजपेयी यांना आदरांजली वाहिली आणि वॉर मेमोरिअलवर जाऊन शहिदांना श्रद्धांजली वाहिली. दरम्यान, एनडीएच्या अनेक खासदारांना मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी बोलावण्यात आले आहे. तेलुगु देसम पक्षाचे (टीडीपी) दोन नेते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. आज संध्याकाळी ७ वाजता हा शपथविधी सोहळा होणार असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना शपथ देतील. राष्ट्रपती भवनात हा सोहळा होणार असून या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आज अनेक राष्ट्रांचे प्रमुख राजधानीत पोहोचले आहेत.

थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 7 जनकल्याण मार्गावरील निवासस्थानी चहापान कार्यक्रम होणार आहे. जे खासदार मंत्री होणार आहे त्यांना या चहापानाच्या कार्यक्रमासाठी आमंत्रण देण्यात आलं आहे.

हे नेते बनणार मंत्री

मनसुखभाई मांडविया यांना फोन करून बोलावण्यात आले आहे.

राव इंद्रजीत सिंह यांनाही पंतप्रधान कार्यालयातून फोन आला.

किरण रिजिजू यांनाही चहासाठी निमंत्रण देण्यात आलं आहे.

अश्विनी वैष्णव यांना पुन्हा मंत्री करण्यात येणार आहे. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चहापानावर चर्चा करण्यासाठी बोलावण्यात आले आहे.

रामदास आठवले यांनाही चहापानाचे निमंत्रण देण्यात आले आहे.

भाजप खासदार रक्षा खडसे यांचाही फोन आला आहे. सूत्रांनी ही माहिती दिली आहे. महाराष्ट्रातील रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या खासदार रक्षा खडसे तिसऱ्यांदा विजयी झाल्या.

अपना दलाच्या अनुप्रिया पटेल यांनाही फोन आला आहे. मिर्झापूरमधून त्या सलग तिसऱ्यांदा खासदार झाल्या.

दिल्लीचे खासदार कमलजीत सेहरावत यांना फोन आला आहे.

पश्चिम बंगालमधून शंतनू ठाकूर यांना चहासाठी बोलावण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी अन्नामलाई यांना चहासाठी बोलावले आहे.ते तामिळनाडूतील भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत.

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि कर्नालचे खासदार मनोहर लाल खट्टर यांना पंतप्रधानांच्या निवासस्थानी चहापानासाठी येण्याचा फोन आला.

शिवसेनेचे (शिंदे गट) प्रतापराव जाधव यांना मंत्री करण्यात येणार आहे. शिंदे सेनेतून एकच मंत्री बनणार आहे.

भाजप नेते पियुष गोयल आणि ज्योतिरादित्य यांनाही फोन करण्यात आले आहेत.

एचडी कुमारस्वामी यांनाही चहापानासाठी बोलावण्यात आले.

जम्मू-काश्मीरमधील उधमपूर मतदारसंघातील भाजप खासदार जितेंद्र सिंह यांनाही फोन आला.

सर्वानंद सोनोवाल यांनाही फोन आल्याची माहिती समोर आली आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनाही फोन आला आहे.

चिराग पासवान यांनाही फोन आला. पंतप्रधान मोदी चहापानावेळी नव्या मंत्र्यांची भेट घेणार आहेत.

भाजप नेते अर्जुन मेघवाल यांना पाचारण करण्यात आले आहे.

आरएलडी प्रमुख जयंत चौधरी यांनाही फोन करण्यात आला आहे.

टीडीपी नेते जय गाला यांनी ट्विट केले की, टीडीपी कोट्यातील दोन खासदार मंत्री म्हणून शपथ घेतील. राम मोहन नायडू यांना कॅबिनेट मंत्री, तर चंद्रशेखर पेम्मासानी राज्यमंत्री बनतील. त्याचवेळी जीतनराम मांझी यांना मोदी मंत्रिमंडळात स्थान मिळणार हे निश्चित मानले जात आहे. त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती.

रामनाथ ठाकूर यांना शपथविधीसाठी बोलावण्यात आले आहे. रामनाथ ठाकूर यांनी फोनवर सांगितले की, त्यांना भाजप अध्यक्षांचा फोन आला होता आणि पीएमओकडून चहापानासाठी बोलावण्यात आले होते. रामनाथ ठाकूर यांचे वडील कै. कर्पूरी ठाकूर यांना यावर्षी केंद्र सरकारने भारतरत्न देऊन सन्मानित केले. रामनाथ ठाकूर हे राज्यसभेचे खासदार आहेत. नितीश यांच्या अत्यंत जवळचे आणि विश्वासू आहेत. बिहारमध्ये लालू यादव आणि मुख्यमंत्री नितीश यांच्या सरकारमध्येही त्यांनी काम केलं आहे.

मोदींच्या शपथविधीसाठी परदेशी पाहुणे

अनेक परदेशी पाहुणे हे पंतप्रधान मोदींच्या शपथविधीचे साक्षीदार असल. भारताने आपल्या शेजारील देश आणि हिंदी महासागर क्षेत्रातील नेत्यांना विशेष अतिथी म्हणून आमंत्रित केले आहे. या भव्य शपथविधी सोहळ्यात श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे, मालदीवचे राष्ट्रपती डॉ. मोहम्मद मुइज्जू, सेशेल्सचे उपाध्यक्ष अहमद अफिफ, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल ‘प्रचंड’ आणि भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे उपस्थित राहतील.

शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहिल्यानंतर हे विशेष पाहुणे संध्याकाळी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आयोजित केलेल्या मेजवानीलाही उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान मोदींची या राष्ट्रप्रमुखांशी द्विपक्षीय चर्चाही होण्याची शक्यता आहे.

.

राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन.
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा.
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.