429 गाड्या, 268 कोटींची संपत्ती, आसामच्या रणसंग्रामातील सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?

आसाम विधानसभा निवडणुकीसाठी तीन टप्प्यात मतदान पार पडत आहे. Manaranjan Brahma Assam polls

429 गाड्या, 268 कोटींची संपत्ती, आसामच्या रणसंग्रामातील सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
मनारंजन ब्रह्मा

गुवाहटी: आसाम विधानसभा निवडणुकीसाठी तीन टप्प्यात मतदान पार पडत आहे. भाजप आणि काँग्रेसनं स्थानिक पक्षांची मदत घेत निवडणुकीत ताकद लावलीय. आसाममधील स्थानिक यूनायटेड पीपल्स पार्टी लिबरल (UPPL)चे उमेदवार मनारंजन ब्रम्हा हे सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत. ब्रम्हा हे आसामच्या निवडणुकीतील सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. ब्रम्हा यांनी 268 कोटींची संपत्ती जाहीर केली आहे. यामध्ये त्यांच्याकडे 429 गाड्या देखील आहेत. (Manaranjan Brahma is richest candidate in Assam polls have 429 vehicles with 268 crore)

ब्रह्मा यांच्या नावावर 20 बँक अकाऊंट

मनारंजन ब्रह्मा हे आसाममधील कोक्राझार (पश्चिम) विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. निवडणूक शपथपत्रात त्यांनी 268 कोटींची संपत्ती जाहीर केली आहे. यामध्ये त्यांच्याकडे 429 गाड्या असून 320 बँक खात्यांचा समावेश देखील आहे. ब्रह्मा यांच्याकडे 257 कोटींची जंगम आणि 11 कोटींची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्या निवडणूक शपथपत्रानुसार त्यांच्यावर 78 कोटी रुपयांचं कर्ज आहे. 2019-20 या आर्थिक वर्षात 57 कोटींचं उत्पन्न मिळाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. यामध्ये त्यांच्या पत्नी आणि मुलाच्या उत्पन्नाचा देखील समावेश आहे.

मोफत वीज, 5 लाख रोजगार, महिलांना 2 हजार रुपये; आसाममध्ये राहुल गांधींचा आश्वासनांचा पाऊस

ब्रह्मा यांच्यावर दोन गुन्हे

निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार ब्रह्मा यांच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत. कलम 403 नुसार फसवणूक आणि मालमत्तेसंदर्भात गुन्हे दाखल झालेले आहेत.

आसाममध्ये तीन टप्प्यात मतदान

आसाममध्ये 126 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. ही निवडणूक तीन टप्प्यात पार पडत असून पहिल्या टप्प्यामध्ये 47 जागांसाठी 27 मार्चला मतदान झालं आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये 39 जागांसाठी 1 एप्रिल आणि तिसऱ्या टप्प्यासाठी 6 एप्रिलला 40 जागांसाठी मतदान पार पडणार आहे. तिसऱ्या टप्प्यातमध्ये सबेंद्रा बासुमतरी हे सर्वात कमी उत्पन्न असणारे उमेदवार आहेत. त्यांच्या नावावर फर्क 2 हजार रुपये आहेत.

आसामच्या निवडणुकीतून CAA मुद्दा गायब?; वाचा, विरोधकांची खेळी आणि सत्ताधाऱ्यांचे डावपेच

संबंधित बातम्या:

ग्रामपंचायतीच्या रणधुमाळीत आहात? तर अमरावतीची ही बातमी तुमच्यासाठी इशारा!

लग्न करणाऱ्यांना सरकार देत आहे सोनं, लग्नाच्या आधी असं करा अप्लाय

(Manaranjan Brahma is richest candidate in Assam polls have 429 vehicles with 268 crore)