मनोहर पर्रीकरांच्या मुलाला या पक्षाची ऑफर; पण त्याची इच्छा असेल तर यावे

गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांना जवळजवल डावललं गेल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे त्याने पणजीमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवायचं फायनल केल्याची चर्चा जोरात सुरू आहे.

मनोहर पर्रीकरांच्या मुलाला या पक्षाची ऑफर; पण त्याची इच्छा असेल तर यावे
आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल

गोवा – गोव्यात (goa) राजकारणाकडे संपुर्ण देशाचे लक्ष लागले आहे. कारण तिथे कोणत्याही पक्षाला आत्तापर्यंत बहुमत सिध्द करता आलेलं नाही. त्यामुळे बहुमताच्या जवळ जाण-या पक्षाला इतर पक्षांची मदत ही घ्यावीच लागते. त्यामुळे अनेक पक्षांना तिथं उमेदवार निवडून आणताना खूप संघर्ष करावा लागतो. भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnvis) यांनी गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (manohar parrikar) यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले, भाजप हा असा पक्ष आहे की, तो काम पाहतो. तिथं काम करणा-यालाचं संधी दिली जाते.

गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांना जवळजवल डावललं गेल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे त्याने पणजीमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवायचं फायनल केल्याची चर्चा जोरात सुरू आहे. अनेक पक्षांकडून उत्पल पर्रीकर यांना डावलल्यामुळे भाजपवर टीका करण्यात येत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उत्पल पर्रीकर यांची इच्छा असेल तर तो आमच्या पक्षात येऊ शकतो असं वक्तव्य केल्याने गोव्यात नव्या चर्चेला सुरूवात झाली आहे.

आज अरविंद केजरीवाल हे गोव्यात आहेत, त्यांनी गोव्यातील अनेक मान्यवरांच्या भेटी घेतल्या आहेत, त्याचबरोबर गोव्यातील अनेक राजकीय घडमोडीवर ते बोलत आहेत. त्यांना ज्यावेळी उत्पल पर्रीकर यांच्याबाबत झालेली घटना समजली. तेव्हा त्यांनी उत्पल पर्रीकर यांची इच्छा असेलतर ते आमच्या पक्षात येऊ शकतात असं म्हणाले आहेत.

उत्पल पर्रीकर यांनी पणजीत आपल्या प्रभागात जाऊन प्रचार करण्यास सुरूवात सुध्दा केली आहे. 2019 ला निधन मनोहर पर्रीकर यांचं निधन झाल्यानंतर भाजपकडून सिद्धार्थ श्रीपाद कुंकलिएन्कर यांना त्या जागेवर तिकीट दिलं होतं. त्यावेळी तिथं झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या बाबुश मोनसेरेट यांचा विजय झाला होता. त्यावेळी बाबूश मोनसेरेट यांच्यासह 10 काँग्रेस आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. एवढेच नाही तर बाबूश यांची पत्नी जेनिफर यांना सरकारमधील महत्त्वाचे महसूल खाते भाजपकडून देण्यात आले.

जनतेचा आम्हाला उस्फुर्त प्रतिसाद आहे. लोकांना ह्यावेळी बदल हवाय. काँग्रेस आणि भाजपने इथे काही केलं नाही. युवकांकडे रोजगार नाही ही मोठी समस्यां आहे. आम्ही सत्तेत आलो तर रोजगार देऊ तसेच लोकांना एक इमानदार पर्याय हवाय. विद्यमान सरकार मध्ये खूप भ्रष्टाचार आहे अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी केली. आजही गोव्यात फक्त पक्षांतरांच्या बातम्याच दिसत आहेत. लोक इकडून तिकडे तिकडून इकडे असे पक्ष बदलत असल्याचं चित्र आहे.

आम्हाला जर जनतेनं संधी दिली तर रोजगार, मोफत वीज, 18 वर्षांच्या वरील महिलांना दरमहा एक हजार रुपये मिळतील, गृह आधार योजनेत 3 हजार मिळतील, 24 तास वीज, चांगले रस्ते, स्वच्छ पाणी मोफत मिळेल. दिल्लीत दिलेल्या सर्व सुविधा तुम्हाला मिळतील असे आश्वासन केजरीवाल यांनी जनतेला दिले आहे.

VIDEO: फडणवीसांना गोव्याची हवा लागली, त्यांचं अध:पतन झालंय; संजय राऊतांची खोचक टीका

VIDEO: काँग्रेसला गोव्यात 40 पैकी 45 जागा मिळतील, महाविकास आघाडीचा प्रयोग फसल्यानंतर राऊतांचा सणसणीत टोला

Goa Assembly Election 2022 | नेते महाराष्ट्रातले, स्पर्धा गोव्याची! जुगलबंदी रंगली फडणवीस विरुद्ध राऊत वक्तव्यांची


Published On - 5:27 pm, Sat, 15 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI