Election Result 2022 Live: पंजाब जिंकणाऱ्या केजरीवालांविरोधात मोदींनी रणशिंग फुंकलं? मी विश्वास देतो की…

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी पंजाब जिंकलं आहे. त्यामुळे देशभरातून केजरीवाल यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात रणशिंग फुंकलं आहे. पंजाब हे सीमावर्ती राज्य आहे.

Election Result 2022 Live: पंजाब जिंकणाऱ्या केजरीवालांविरोधात मोदींनी रणशिंग फुंकलं? मी विश्वास देतो की...
पंजाब जिंकणाऱ्या केजरीवालांविरोधात मोदींनी रणशिंग फुंकलं? मी विश्वास देतो की...Image Credit source: bjp twitter
Follow us
| Updated on: Mar 10, 2022 | 8:56 PM

नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल (arvind kejriwal) यांनी पंजाब जिंकलं आहे. त्यामुळे देशभरातून केजरीवाल यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात रणशिंग फुंकलं आहे. पंजाब (punjab) हे सीमावर्ती राज्य आहे. त्यामुळे भाजपचे (bjp) कार्यकर्ते जीवाची बाजी लावून पंजाबला फुटीतरतावादी राजकारणापासून सतर्क ठेवण्याचं काम करतील. येणाऱ्या पाच वर्षात भाजपचं कार्यकर्ते ही जबाबदारी पूर्ण ताकदीनिशी पूर्ण पाडतील अशी ग्वाही देतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. त्यामुळे येणाऱ्या काळात पंजाबमधील आम आदमी पार्टीचं सरकार भाजपच्या रडारवर असणार असल्याचे संकेत मिळत आहेत. चार राज्यातील विजयानंतर कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे स्पष्ट संकेत दिले.

आपचे नेते अरविंद केजरीवाल यांच्यावर फुटीरतावादी आणि दहशतवादी म्हणून विरोधकांनी टीका केली होती. त्याचा केजरीवाल यांनी वारंवार उल्लेख करत विरोधकांवर हल्ला चढवला होता. पंजाबमध्ये बहुमताचं सरकार आल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी आज जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी या गोष्टीचा उल्लेख केला. काही लोकांनी मला आतंकवादी म्हणून हिणवलं. पण पंजाबच्या जनतेने मला साथ दिली. माझ्यावर विश्वास टाकला असं केजरीवाल म्हणाले होते. तोच धागा पकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केजरीवाल यांच्यावर नाव न घेता शरसंधान साधलं.

मी आज पंजाबमधील भाजपच्या कार्यकर्त्यांचीही विशेष प्रशंसा करेल. कठिण काळातही भाजपच्या कार्यकर्त्याने पंजाबमध्ये भाजपचा झेंडा बुलंद केला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भाजपचे कार्यकर्ते पंजाबमध्ये भाजपच्या मजबुतीला, देशाच्या मजबुतीला अढळ स्थान प्राप्त करून देतील असा मला विश्वास आहे. पंजाबमध्ये भाजप एक शक्ती म्हणून उदयास येत आहे हे मी पाहत आहे. सीमावर्ती राज्य असल्याने पंजाबला फुटीतरतावादी राजकारणापासून सतर्क ठेवण्याचं काम भाजपचे कार्यकर्ते प्राणाची बाजी लावून करतील . येणाऱ्या पाच वर्षात भाजपचं कार्यकर्ते ही जबाबदारी पूर्ण ताकदीनिशी पूर्ण पाडेल अशी ग्वाही देतो, असं मोदी म्हणाले.

भारत वाचला कारण…

गेल्या शंभर वर्षातील सर्वात मोठ्या महामारीशी लोक लढत आहेत. कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच ही निवडणूक होत आहे. अशी महामारी मानव जातीने शंभर वर्षात पाहिली नाही. हे कमी होते की काय युद्धानेही जगाची चिंता वाढवली आहे. त्यामुळे जगभराची सप्लाय चेन तुटली आहे. दोन वर्षापासून सप्लाय चेन बंद होती. आता युद्धाने ती अधिकच उद्ध्वस्त केली आहे. त्यामुळे या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी भारताने मोठे पावलं उचलले आहेत. जे निर्णय घेतले त्यामुळे भाजपला पुढे जाण्यास मदत झाली. भारत वाचला कारण आपली धोरणं जनतेशी निगडीत होते. आपले प्रयत्न निष्ठेने अविरत सुरू होते, असं मोदींनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

PM Modi Address Live : मोठ्या विजयानंतर पंतप्रधान मोदी लाईव्ह, भाजपची जोरदार घोषणाबाजी

Punjab Election results 2022 : शरद पवारांच्या घरी काम करणाऱ्यांची मतं “आप”ला, असं का घडलं?

Uttar Pradesh Election Result 2022 : ‘उत्तर प्रदेशातील प्रचंड विजयाचं श्रेय पंतप्रधान मोदी, कार्यकर्ते आणि जनतेला’, योगी आदित्यनाथांची पहिली प्रतिक्रिया

'...तोपर्यंत मुख्यमंत्री पदावर...,' केजरीवाल यांनी काय केली घोषणा
'...तोपर्यंत मुख्यमंत्री पदावर...,' केजरीवाल यांनी काय केली घोषणा.
मला पंतप्रधान पदाची ऑफर होती, परंतू...काय म्हणाले गडकरी
मला पंतप्रधान पदाची ऑफर होती, परंतू...काय म्हणाले गडकरी.
लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले की...
लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले की....
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?.
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?.
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ.
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?.
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल.
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका.
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!.