Goa Elections 2022 : आधी गोवा दलबदलुंसाठी ओळखलं जायचं, निवडणुकीच्या तोंडावर गडकरींकडून घोषणांचा पाऊस

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हेही गोव्यात प्रचाराला पोहोचले आहेत. त्यांनीही गोव्यासाठी काही मोठ्या घोषणा आणि प्लॅन साांगितले आहेत.

Goa Elections 2022 : आधी गोवा दलबदलुंसाठी ओळखलं जायचं, निवडणुकीच्या तोंडावर गडकरींकडून घोषणांचा पाऊस
गडकरींच्या गोव्यात मोठ्या घोषणा
Follow us
| Updated on: Feb 08, 2022 | 3:47 PM

पणजी : गोव्यात सध्या निवडणुकांच्या (Goa Elections 2022) तोंडावर जाहीरनामे आणि आश्वासनांचा पाऊस पडतोय. भाजपच्या जाहीरनाम्यातही गोव्यासाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हेही गोव्यात प्रचाराला पोहोचले आहेत. त्यांनीही गोव्यासाठी काही मोठ्या घोषणा आणि प्लॅन साांगितले आहेत. मनोहर पर्रिकर (Manohar Parrikar) यांनी गोव्याला व्हिजन दिलं. पर्यावरण, रोजगार, आयटी क्षेत्राला पर्रिकरांनी दिशा दिली. तेच प्रमोद सावंत पुढे नेत आहेत असे म्हणत गडकरींनी डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली. तसेच गोव्यात केलेल्या कामाचा पाढाही वाचून दाखवला. राष्ट्रीय महामार्गासाठी मोठा निधी दिला. येणाऱ्या काळात गोव्याला 25 हजार कोटी दिले आहेत. 12 हजार कोटी सागरमाला अतंर्गत गोव्यासाठी पैसे दिलेत. तसेच गोव्याला पुढील पाच वर्षात एकूण 40 हजार कोटी दिलेत, असे गडकरी म्हणाले आहेत. यामुळे गोव्यातील सर्व रस्ते राष्ट्रीय महामार्ग बनलेले असतील, गोव्यात क्रांतिकारक बदल होतील, तसेच नवीन रोजगाराची निर्माती असेही त्यांनी सांगितलं.

भाजपने स्थिर सरकार दिले

आधी गोवा हे दलबदलूसाठी प्रसिद्ध झालं होतं, गेल्या दहा वर्षाचं स्थिर सरकार भाजपने दिले. गोव्याच्या घरात भाजप पोहचली, गोव्याच्या जनतेनी प्रेम केलं. मुख्यमंत्री प्रमोद सावंतानी चांगल काम केलं, अशा शब्दात त्यांनी सावंत यांचं भरघोस कौतुक केले आाहे. पुन्हा गोव्यात स्थिर सरकार आणि विकासाभिमुख सरकार गोव्याची जनता देणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. गोव्यातल्या प्रत्येक माणसाला घर मिळेलं, मोहल्ला क्लिनिंग उघडण्याची आवश्यकता नाही. मोदींच्या योजनाचा चांगला वापर गोव्यात झाला आहे, असेही गडकरी म्हणाले.

इलेक्ट्रीक व्हेहिकलची किंमत घटेल

येणाऱ्या काळात दोन वर्षात इलेक्ट्रीक व्हिईकलची किंमत इतर व्हेहिकल सारखी होईल. गोव्यात सर्व बस इलेक्ट्रिक बस येतील, गोवा खऱ्या अर्थांने प्रदुषण मुक्त होणार आहे. 80 रुपयात पेट्रोल देवू असं कॉग्रेसने सांगितलं मात्र यानंतर फोर व्हिलर टू व्हिलवरला फेक्स इंजिन येणार आहे. याचा अर्थ असा 80 रुपये पेट्रोल द्यावेच लागणार नाही, असा टोलाही त्यांनी काँग्रेसला लगावला आहे. 62 रुपयात बायोइथेनॉल देण्यात येईल, ग्रीन इंधन आहे, गोव्यात पेट्रोल घेण्याची वेळ येणार नाही. जुन्या बसेस सीएनजीवर कन्वर्ट करण्याचा जाहिरनाम्यात म्हटलं गेलंय. गोव्यात चार्जिग स्टेशनला अनुदान देखील मिळेल. ग्रीन हायड्रोजनवर चालणारी गाडी माझ्याकडे आली आहे, असे म्हणत गोव्यात गडकरींनी घोषणांचा आणि आश्वासनांचा पाऊस पाडला आहे. त्याचा मतदानावर किती परिणाम होतोय हे निवडणुकीनंतरच कळेल.

Goa Elections 2022 : ज्येष्ठांना दरमहा 3 हजाराची पेन्शन, तरुणांना रोजगार भत्ता नव्हे रोजगार, गोयंकरांसाठी भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?

Video | ‘जय श्री राम’ला विद्यार्थीनीचं अल्ला हूँ अकबरनं प्रत्युत्तर! वाद आणखीन पेटला, नेमकं काय घडलं?

कार पार्क करताना तरुणीचा अंदाज चुकला, दुसऱ्या मजल्यावरुन पडून गाडी पलटी, खाली उभी कार तर सपाटच

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.