देव बाजारचा भाजीपाला नाही रे… प्रसिद्ध उत्तर भारतीय गायिका मैथिली ठाकूरची मुंबईच्या प्रचारात उडी, म्हणाली मी उत्तर भारतीय…
बिहारच्या आमदार, भाजप स्टार प्रचारक आणि गायिका मैथिली ठाकूर मुंबईत दाखल झाल्या आहेत. त्यांनी मुंबईतील रोड शोमध्ये सहभाग घेतला. या रोड शोमध्ये त्यांनी गायिलेल्या गाण्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.

सध्या राज्यात महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. उमेदवार रस्त्यावर उतरुन प्रचार करताना दिसत आहेत. महानगरपालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. अवघ्या चार दिवसांवर असलेल्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रचारासाठी बिहारच्या आमदार, भाजप स्टार प्रचारक आणि गायिका मैथिली ठाकूर मुंबईत दाखल झाल्या आहेत. तसेच त्यांनी गायलेल्या मराठी गाण्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे.
मैथिली ठाकूर या मुंबईतील दहिसर वॉर्ड क्रमांक १ मध्ये रोड शो करत आहेत. या रोड शो दरम्यान, त्यांनी मराठीत गाणे गायले आहे. या गाण्याची सध्या सर्वत्र वाह वाह होताना दिसत आहे. तसेच या गाण्याच्या माध्यमातून त्यांनी मराठी मतदारांना आकर्षित करण्याचे आवाहन केले. त्यांनी आम्हाला युपी, बिहार आणि मराठी वेगळे आहेत तसे वेगळे करायचे नाही. आम्हाला विकासासाठी एकत्र काम करायचे आहे असे म्हटले आहे.
दिला खास संदेश
प्रचारादरम्यान मैथिली ठाकूर म्हणाल्या की, आपल्याला लोकांना एकत्र करून विकासाच्या मार्गावर वाटचाल करावी लागेल आणि आपल्याला कोणत्याही अडथळ्याशिवाय पुढे जावे लागेल. हाच संदेश मी घेऊन आली आहे. मराठीच्या मुद्द्यावर मैथिली ठाकूर म्हणाल्या की अरे भाऊ तुम्ही असं काय बोलतात. मी पण उत्तर भारतीय मराठी आहे.
ठाकरे बंधूंच्या युतीबाबत काय म्हणाल्या?
कालच एकनाथ शिंदे म्हणाले की, हा भाग झोपडपट्टी म्हणून घोषित केला जाईल. यामुळे लोकांचा विकास होईल. मुंबई हे माझे दुसरे घर आहे, मी येत राहीन आणि जात राहीन. भाजप ही जागा खूप चांगल्या पद्धतीने जिंकणार आहे आणि लोकांना बदल हवा आहे, भाजपचा महापौर निवडून येईल असे मैथिली ठाकूर म्हणाल्या.
कोण आहेत मैथिली ठाकूर?
2025 च्या बिहार विधानसभा निवडणुकीत मैथिली ठाकूर या निवडून आल्या. अलीनगर विधानसभा मतदारसंघातून भाजपने लोकप्रिय लोकगायिका मैथिली ठाकूर यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी अनुभवी नेते विनोद मिश्रा यांचा पराभव केला. राजकारणात एण्ट्री करण्यापूर्वी मैथिली ठाकूर या एक लोकप्रिय गायिका आहेत. रिअॅलिटी शोजमधून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. त्यांचे शो हे जगभरात होताना दिसतात. आता त्या महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबईत आल्या आहेत.
