Pune Election Result 2026 : अजित पवारांना स्वप्नातही वाटलं नव्हतं! पुण्यात दादांचा गेम? भाजपची जोरदार मुसंडी
Pune Election Result 2026 : पुण्यात महानगरपालिकेतील आतापर्यंतची समोर आलेले आकडे पाहाता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसल्याचे चित्र आहे. काय आहे आकडेवारी एकदा जाणून घ्या...

नववर्षानंतर पहिल्यांदाच पुणे शहरवासीयांना आपला कौल देण्याची संधी मिळाली आहे. तब्बल नऊ वर्षांनंतर होणाऱ्या या निवडणुकीत शहरातील ४१ प्रभागांमधून एकूण १६५ नगरसेवक निवडले जाणार आहेत. या निवडणुकीत चौरंगी सामना रंगला होता. महायुतीतील तीन पक्ष वेगळे लढत असल्याने स्पर्धा तीव्र झाली होती. याचा सर्वात मोठा फटका अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला बसत असल्याचे दिसत आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची केवळ 3 जागांवर आघाडी पाहायला मिळत आहे.
काय आहे पुण्यातील चित्र?
Municipal Election 2026
Mumbai Municipal Election Results 2026 : अमरावतीमध्ये भाजला मोठा धक्का...
Pune Nagarsevak Election Results 2026 : पुण्यात प्रशांत जगताप यांचा विजय आईचा पराभव...
Maharashtra Municipal Election Results 2026 : वसई विरार महापालिकेत शिंदेंच्या शिवसेनेची निराशाजनक कामगिरी...
Mumbai Election Results Live 2026 : एकनाथ शिंदे यांना मुंबईत सर्वात मोठा झटका, खासदाराची मुलगी हरली
Sangli Election Results 2026 : सांगली - महापालिका निवडणूक निकाल
Ichalkaranji Election Results 2026 : इचलकरंजीमध्ये ठाकरेंनी उघडलं खातं
पुणे महापालिका निवडणुकीचे मतमोजणीचे सुरुवातीचे कल समोर आले आहेत. भारतीय जनता पक्षाने (भाजप) जोरदार मुसंडी मारली आहे. एकूण 165 जागांपैकी भाजप 47 जागांवर आघाडीवर आहे. दुसरीकडे, अजित पवार गटाला मोठा धक्का बसला असून, त्यांचे फक्त 3 उमेदवार आघाडीवर असल्याची माहिती आहे. तसेच काँग्रेसची दोन जागांवर आघाडी पाहायला मिळत आहे.
रुपाली पाटील ठोंबरे यांना मोठा धक्का
काही प्रमुख प्रभागांमध्ये भाजपचे उमेदवार स्पष्ट आघाडीवर आहेत. उदाहरणार्थ, कसबा प्रभागात भाजप आघाडीवर आहे. तसेच कुणाल टिळक, स्वरदा बापट, स्वप्नाली पंडित आणि राघवेंद्र मानकर यांसारख्या भाजपच्या प्रमुख उमेदवारांनी पहिल्या फेरीत आघाडी मिळवली आहे. याउलट, रुपाली पाटील ठोंबरे पिछाडीवर असल्याचे दिसत आहे.
दुसरीकडे, नुकतेच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले माजी महापौर प्रशांत जगताप हे वानवडी प्रभागातून निवडणूक लढवत असून, सुरुवातीच्या कलांमध्ये ते मागे पडलेले दिसत आहेत. गेल्या १५ वर्षांपासून वानवडीतून निवडून येणारे जगताप यांनी राष्ट्रवादीतील (शरद पवार गट) मतभेदांमुळे काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची साथ सोडली होती. त्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश करून त्यांनी महापालिकेचे तिकीट मिळवले होते.
