Punjab polls: सोनू सूदची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढणार, मुख्यमंत्री चन्नी आणि सिद्धूंचीही उमेदवारी जाहीर

पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने पहिली यादी जाहीर केली आहे. एकूण 80 उमेदवारांच्या या यादीत राज्याचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनना पुन्हा एकदा चमकौर साहिबमधून उमेदवारी देण्यात आली आहे.

Punjab polls: सोनू सूदची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढणार, मुख्यमंत्री चन्नी आणि सिद्धूंचीही उमेदवारी जाहीर
Navjot Singh Sidhu

चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने पहिली यादी जाहीर केली आहे. एकूण 80 उमेदवारांच्या या यादीत राज्याचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनना पुन्हा एकदा चमकौर साहिबमधून उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांना अमृतसर पूर्वमधून तर अभिनेता सोनू सूद याची बहीण मालविका सूद यांना मोगा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी काँग्रेसमध्ये सामील झालेले वादग्रस्त पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हे मानसामधून निवडणूक लढणार आहेत. काँग्रेसचे राज्यसभा सदस्य प्रताप सिंह बाजवा हे गुरुदासपूरच्या कादियांमधून निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड हे निवडणूक लढणार नाहीत. त्यांचे पुतणे संदीप जाखड यांना अबोहरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंग रंधावा हे डेरा बाबा नानक विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत.

फक्त नऊ महिलांना उमेदवारी

काँग्रेसने 86 पैकी केवळ 9 जागांवर महिलांना तिकीट देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे महिलांना 40 टक्के सीट देण्याचं आश्वासन काँग्रेसने दिलं होतं. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेले सुखपाल खैहरा यांना भुलत्थ येथून उमेदवारी देण्यात आली आहे. खैहरा हे आपमधून काँग्रेसमध्ये आले होते. ते भुलत्थ येथील आमदार आहेत.

आपचं मोठं आव्हान

पंजाबमध्ये एका टप्प्यात निवडणुका होणार आहेत. 14 फेब्रुवारी रोजी पंजाबमध्ये मतदान होणार आहे. 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत काँग्रेस समोर आपचं मोठं आव्हान राहणार आहे. चंदीगड महापालिका निवडणुकीत आम आदमी पार्टीने प्रचंड विजय मिळवला आहे. त्यामुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे. त्याशिवाय शिरोमणी अकाली दल, बसपा आणि भाजपाचंही काँग्रेसला आव्हान असणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

संबंधित बातम्या:

Punjab Assembly Election 2022 : मुख्यमंत्रिपदासाठी कुणाला पसंती? पहिल्या स्थानी चन्नी, सिद्धू कितव्या?

मनोहर पर्रीकरांच्या मुलाला या पक्षाची ऑफर; पण त्याची इच्छा असेल तर यावे

Delhi | विधानसभा निवडणुकांवर खलबतं, आरोग्य सचिवांशी चर्चेनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाची दिल्लीत बैठक

Published On - 6:14 pm, Sat, 15 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI