Rahul Gandhi: “केंद्र सरकारकडून राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड, श्रीमान 56″ घाबरले”, राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज मोदी सरकारवर चीनच्या सीमेवरील वादावरून सडकून टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या धोरणामुळे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड झाल्याचा आरोप केला.

Rahul Gandhi: केंद्र सरकारकडून राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड, श्रीमान 56 घाबरले, राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका
Rahul Gandhi
Follow us
| Updated on: Nov 12, 2021 | 3:09 PM

वर्धा: कोंग्रेस संघटनेचं प्रशिक्षण शिबीर आज वर्धा्यामध्ये सुरू होतय. या निमीत्त काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेसचे विचार तळागाळापर्यंत परत पोहवायची गरज आहे. काँग्रेसची विचारधारा संपूर्ण देशात पसरवण्याची, जनतेला समजवण्याची गरज आहे. कलम 370, आतंकवाद, राष्ट्रीयता वर जेव्हा चर्चा होते तेव्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना उत्तर द्यायला हवं. यामुळे आता कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. काँग्रेस पक्षाची विचारधारा, भाजपच्या विचारधारेमूळे संपत चालली आहे. काँग्रेस पक्षाची विचारधारा आम्ही परत जनतेपर्यंत पोहचवू ज्याने आज जो द्वेष पसरवला जात आहे तो बघायलाही मिळणार नाही, असं राहुल गांधी म्हणाले.  (Rahul gandhi slams BJP over Hindutva ideology. Slams for India-China conflict, says government is lying)

“भाजप समाजाला बदलवू पहात आहे”

राहुल गांधी म्हणाले, की आजकाल काँग्रेसचे लोक भाजपा आणि आरएसएस मध्ये जातात. मात्र, तिथे टिकत नाही कारण काँग्रेसची विचारधारा वेगळी आहे. काँग्रेसचे आयकॉन महात्मा गांधी आहेत, तर भाजपा चे आयकॉन सावरकर आहेत. उत्तरखंडमधले काँग्रेस नेते यशपाल आर्यंचं उदाहरण देत राहुल गांधी म्हणाले की, जेव्हा त्यांना परतन्याचं कारण विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले की भाजपमध्ये राहणं कठीण आहे, ते समाजाला बदलवू पहात आहे ते आमचा उपयोग करून घेतला जातो. त्यामूळे, काँग्रेस कार्यकर्ता जरी भाजपा, आरएसएसमध्ये गेले तरी तिथे टीकत नाहीत.

चीनच्या सीमेवरील वादावरून सडकून टीका

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज मोदी सरकारवर चीनच्या सीमेवरील वादावरून सडकून टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या धोरणामुळे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड झाल्याचा आरोप केला. “राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड झाली आहे कारण GOI कडे कोणतीही रणनीती नाही आणि श्रीमान 56” घाबरले आहेत. केंद्र सरकार खोटे बोलत आहे, मात्र आपल्या सीमेचे रक्षण करण्यासाठी आपले प्राण धोक्यात घालतायेत,” राहुल गांधी म्हणाले.

हे ही वाचा –

India China conflict: भारतीय हद्दीत कोणतेही अतिक्रमण नाही, चीन LAC वर गाव वसावत असल्याचा USAच्या अहवालावर वाद चुकीचा – बिपिन रावत

Salman Khurshid Book Controversy:”हिंदुत्वाची तुलना ISIS शी करणं चुकीचं”- गुलाम नबी आझाद

Uttar Pradesh: CM योगींचे भाषण ऐकून बदमाशाने जामीन घेण्यास दिला नकार; न्यायालयासमोर आत्मसमर्पण

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.