छत्रपती संभाजीनगरात शिंदें पिछाडीवर, पण मंत्री शिरसाट जोमात, दोन्ही मुलांचा दणक्यात विजय!
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत भाजप आघाडीवर असल्याचे चित्र आहे. तर शिवसेना हा पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आहे. काय आहे एकूण चित्र ते पाहा....

राज्यात आज महानगरपालिका निवडणुकीच्या निकालाची आकडेवारी समोर येत आहे. या निवडणुकीसाठी राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान करण्यात आले. आज सकाळी आठ वाजल्यापासून या निवडणुकीच्या निकालासाठी मतमोजणी सुरु झाली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीतील पक्ष स्वबळावर लढताना दिसले. आतापर्यंत समोर आलेली आकडेवारी पाहाता छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आघाडीवर आसल्याचे पाहायला मिळते. पण शिवसेना मंत्री संजय शिरसाट यांची दोन्ही मुले निवडून आली आहेत.
संजय शिरसाट यांची दोन्ही मुले विजयी
Municipal Election 2026
Mumbai Municipal Election Results 2026 : देवेंद्र फडणवीस यांचा थेट अमित साटम यांना फोन...
Pune Nagarsevak Election Results 2026 : तानाजी सावंत यांना धक्का, थेट मुलाचाच...
Mumbai Election Result 2026 : मतमोजणीला 5 तास, मुंबईत आतापर्यंत कोण-कोण जिंकले त्या उमेदवारांची यादी
Mumbai Ward 202, 203 Election Result 2026 : वार्ड क्रमांक 202, 203 चा निकाल काय?
Pune Election Result : पुण्यातील बहुचर्चीत असलेल्या प्रभाग क्रमांक 9 ची मत मोजणी थोड्यावेळात होणार सुरु
Pune Election Result 2026 : रविंद्र धंगेकर यांच्या पत्नी आघाडीवर की पिछाडीवर ?
छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाठ यांची मुलगी हर्षदा शिरसाट विजयी झाल्या आहेत. प्रभाग क्रमांक 18 ड मधून शिवसेनेच्या हर्षदा शिरसाट निवडणूक लढल्या. छत्रपती संभाजीनगर मध्ये हर्षदा शिरसाठ यांच्या विजयाचा जोरदार जल्लोष सुरू आहे. तर संजय शिरसाट यांचे पूत्र सिद्धांत शिरसाट यांचा देखील विजय झाला आहे.
काय आहे छत्रपती संभाजीनगरची आकडेवारी
समोर आलेल्या आकडेवारीनुसार, छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप 32 जागांवर आघाडीवर आहे. तर शिंदेची शिवसेना 24 जागांवर आघाडीवर आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना 10 जागांवर आघाडीवर आहे. एमआयएम 17 जागांवर, काँग्रेस 2 जागांवर, अजित पवार यांची राष्ट्रवादी 2 जागांवर आघाडीवर आहेत. तर वंचित बहुजन आघाडी 4 जागांवर आघाडीवर आहे.
काय आहे मुंबई महानगरपालिकेची आकडेवारी
देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असणाऱ्या मुंबई महापालिकेजच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबईतील 227 जागांपैकी 127 जागांवार भाजप आणि शिवसेनेची आघाडी पाहायला मिळत आहे. भाजपाची जवळपास 96 जागांवर आघाडी पाहायला मिळत आहे.
