2019मध्ये राज्यात राष्ट्रपती राजवट आणण्यात शरद पवार यांचा हात; दीपक केसरकर यांचा गौप्यस्फोट

शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांना मशाल गीतातून जय भवानी शब्द काढायला निवडणूक आयोगाने सांगितलं आहे. आता उद्धव ठाकरे यांच्याकडे हिंदुत्वाच्या गमजा मारायला काय राहील? असा सवाल करतानाच आमची हिंदूची व्याख्या धर्मावर आधारीत नाही, असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.

2019मध्ये राज्यात राष्ट्रपती राजवट आणण्यात शरद पवार यांचा हात; दीपक केसरकर यांचा गौप्यस्फोट
sharad pawarImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 21, 2024 | 6:32 PM

राज्याचे मंत्री आणि शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. 2019मध्ये राज्यात काठावर सरकार आलं होतं. तेव्हा राज्यात राष्ट्रपती राजवट आणण्यात शरद पवार यांचा हात होता, असा गौप्यस्फोट दीपक केसरकर यांनी केला आहे. एक प्रादेशिक पक्ष कमी झाल्याशिवाय दुसरा प्रादेशिक पक्ष वाढत नाही, हे समीकरण शरद पवारांनी महाराष्ट्रात राबवलं. मात्र उद्धव ठाकरे त्यांची लाचारी करतात हे योग्य नाही, असा हल्ला दीपक केसरकर यांनी चढवला आहे.

दीपक केसरकर हे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. 2014मध्ये मागितला नसताना देखील शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला आणि शिवसेनेची ताकद संपवली. 2017 मध्ये भाजप सोबत सरकार स्थापन करण्याची बोलणी केली, यावेळी मोदींनी राष्ट्रवादी सरकारमध्ये आली तरी चालले, मात्र शिवसेना आमच्या सोबत सरकारमध्ये राहील, असं म्हटलं होतं. याला मोदी म्हणतात. मात्र शरद पवारांनी शिवसेना सत्तेत असेल तर आम्ही सत्तेत सहभागी होणार नाही, असं सांगितलं होतं. शरद पवार एवढा द्वेष शिवसेनेचा करत होते. त्यामुळे शिवसेना फोडली गेली, असा दावा दीपक केसरकर यांनी केला.

ते प्रती मुख्यमंत्री म्हणून वावरत होते

कोकणात ज्या ज्या नेत्यांची सत्ता येते, त्या त्या नेत्यांना मंत्रिपद मिळतात. नारायण राणे यांना कोकणातील प्रतिनिधी म्हणून मानाचे स्थान दिल्लीमध्ये मिळालं. मात्र आमच्या खासदारांना कोणी ओळखत नाही. ते प्रती मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात वावरत होते, असा टोला केसरकर यांनी ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांना लगावला. कोकणातील जो जो खासदार होतो, तो केंद्रात मंत्री होतो. नारायण राणे निवडून आल्यानंतर केंद्रात मंत्री होतील. राणेंना कोकणचा वाघ म्हणून ओळखलं जातं. नारायण राणे यांची कोकणचा नेता म्हणून प्रतिमा आहे, अशी स्तुती सुमनंही दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांच्यावर उधळली.

राणेंची महाराष्ट्रावर पकड

महाराष्ट्रात शिवसेना सोडून गेलेलं नेते पुन्हा आमदार झाले नाहीत. मात्र नारायण राणे यांनी स्वतःसह 11 आमदारांचे राजीनामे देऊन त्यांना पुन्हा निवडून आणून दाखवले. यातून राणेंची कोकणावर आणि महाराष्ट्रावर किती पकड आहे हे दाखवून दिलं. नारायण राणे हे एक आक्रमक नेतृत्व आहे. त्यांच्यावर व्यक्तिगत पातळीवर टीका करायची आणि त्यांना राग आला की त्यांच्या तोंडून चुकीचं वाक्य निघालं की त्यांचं भांडवल करायचं ही विरोधकांची रणनीती आहे, असंही ते म्हणाले.

गमजा मारायला काय राहील?

जय भवानी शब्द मशालगीत मधून वगळण्याची निवडणूक आयोगाने उबाठाला नोटीस दिली, यावर उद्धव ठाकरे यांनी कारवाई केली तरी चालले परंतु वगळणार नाही अशी भूमिका घेतली आहे. यावर दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हिंदुत्त्वाच्या गमजा मारायला उद्धव ठाकरे यांच्याकडे काय राहील? आमची हिंदूंची व्याख्या धर्मावर आधारित नाही. देशात विकासाची लाट असताना राज्यात केवळ भावनिक साद घालण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं केसरकर म्हणाले.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.