AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TV9 Final Opinion Poll: 44.3 टक्के लोकांना मुख्यमंत्री योगींचे काम आवडले तर 37.8 टक्के लोकांची अखिलेश यांना सहमती

TV9 Bharatvarsh आणि Polstrat ने उत्तर प्रदेशातील जनमत चाचण्यांद्वारे जनतेचे मन जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. या ओपिनियन पोलचे निकाल समोर आले असून, त्यात लोकांचे मत दिसून येत आहे.

TV9 Final Opinion Poll: 44.3 टक्के लोकांना मुख्यमंत्री योगींचे काम आवडले तर 37.8 टक्के लोकांची अखिलेश यांना सहमती
44.3 टक्के लोकांना मुख्यमंत्री योगींचे काम आवडले तर 37.8 टक्के लोकांची अखिलेश यांना सहमती
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Feb 07, 2022 | 7:12 PM
Share

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 साठी उलटी गिनती सुरू झाली आहे. राज्यात 10 फेब्रुवारी ते 7 मार्च या कालावधीत 7 टप्प्यात निवडणुका होणार आहेत. 10 मार्च रोजी मतदानानंतर निकाल जाहीर होणार आहेत. अशा परिस्थितीत संपूर्ण देशाच्या नजरा यावेळी विधानसभा निवडणुकीकडे लागल्या आहेत. यावेळी उत्तर प्रदेशातील सत्तेची चावी कोणाकडे असेल? कोणाच्या कामावर जनता सर्वाधिक खूश आहे? अखिलेश यादव(Akhilesh Yadav) मुख्यमंत्री होऊ शकतील की मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ(Yogi Adityanath) पुन्हा एकदा विजयी होतील. या सर्व प्रश्नांवर जनमत समोर आले आहे. TV9 Bharatvarsh आणि Polstrat ने उत्तर प्रदेशातील जनमत चाचण्यांद्वारे जनतेचे मन जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. या ओपिनियन पोलचे निकाल समोर आले असून, त्यात लोकांचे मत दिसून येत आहे. (While 44.3 per cent people like the work of Chief Minister Yogi, 37.8 per cent people agree with Akhilesh in up)

ओपिनियन पोलनुसार, उत्तर प्रदेशचे लोक मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कामावर सर्वाधिक खूश आहेत. कोणाचे सर्वाधिक आवडले असे विचारले असता 44.3 टक्के लोकांनी मुख्यमंत्री योगींचे नाव घेतले तर 37.8 टक्के लोकांनी अखिलेश यादव यांच्या नावावर सहमती दर्शवली. तथापि, 13.9 टक्के लोक मायावतींच्या कार्याने प्रभावित झाले, तर केवळ 4 टक्के लोकांनी इतरांची नावे घेतली.

कोणाला किती जागा मिळण्याची शक्यता आहे?

टीव्ही9 भारतवर्ष आणि पोलस्ट्रेटच्या सर्वेक्षणानुसार, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजप विजयी होताना दिसत आहे. या निवडणुकीत भाजपला 205 ते 221 जागा मिळू शकतात, तर समाजवादी पक्षाला 144 ते 159 जागा मिळताना दिसत आहेत. याशिवाय 21-31 जागा बसपा आणि 2-7 जागा काँग्रेसच्या खात्यात जाऊ शकतात. त्याच वेळी, इतर केवळ 0-2 जागा जिंकताना दिसत आहेत.

तरुणांचा कुणाला पाठिंबा?

तरुणांच्या मतांबाबत भाजप आणि समाजवादी पक्षात कांटे की टक्कर होऊ शकते. 23 वर्षाखालील वयोगटातले 39.1 टक्के तरुण भाजपसोबत असल्याचे दिसतेय. तर, 38.6% तरुण समाजवादी पक्षाला आणि 15.3% तरुण बसपाला मतदान करू शकतात. ४.८ टक्के तरुण काँग्रेसच्या बाजूने असू शकतात. 2.2% तरुण इतर पक्षांसोबत जाऊ शकतात. (While 44.3 per cent people like the work of Chief Minister Yogi, 37.8 per cent people agree with Akhilesh in up)

संबंधित बातम्या

TV9 Final Opinion Poll: : उत्तर प्रदेशात कोणत्या टप्प्यात कोण बाजी मारणार? सात टप्प्यातील नेमकं चित्रं काय?; वाचा ‘टीव्ही9 ओपिनियन फायनल पोल’

TV9 Final Opinion Poll: यूपीत भाजपच नंबर वन, सपा दुसऱ्या क्रमांकावर, बसपा आणि काँग्रेसची सर्वात वाईट अवस्था; टीव्ही9चा ओपिनियन पोल काय सांगतो?

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली