AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mamata Banerjee Attacked: ममता बॅनर्जींच्या मान आणि पायाच्या हाडाला गंभीर दुखापत; प्रचाराला मुकणार?

सध्या त्यांच्यावर कोलकातामधील रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांचा डावा पाय संपूर्णपणे प्लॅस्टरमध्ये आहे. | Mamata Banerjee Attacked

Mamata Banerjee Attacked: ममता बॅनर्जींच्या मान आणि पायाच्या हाडाला गंभीर दुखापत; प्रचाराला मुकणार?
आता बंगालच्या राजकारणात काही मोठ्या घडामोडी पाहायला मिळणार का, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
| Updated on: Mar 11, 2021 | 12:12 PM
Share

कोलकाता: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांनी प्रचाराच्या रणांगणातून बाहेर राहावे लागण्याची शक्यता आहे. कारण, नंदीग्राम येथील हल्ल्यात ममता बॅनर्जी यांच्या हाडांना गंभीर इजा झाल्याचे समोर आले आहे. सध्या त्यांच्यावर कोलकातामधील रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांचा डावा पाय संपूर्णपणे प्लॅस्टरमध्ये आहे. या दुखापतीमुळे ममता बॅनर्जी यांच्यासारखा हुकमी एक्का प्रचारात न उतरल्यास तृणमूल काँग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. (Mamata’s tests detected injuries to her ankle, right shoulder, neck, says doctor)

ममता बॅनर्जी यांच्या दुखापतीची एक्स रे आणि एमआयआय चाचणी करण्यात आली होती. यामध्ये ममता बॅनर्जी यांच्या डाव्या पायाचा घोटा, उजवा खांदा, दंड आणि मानेच्या हाडाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती SSKM रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी ‘पीटीआय’ला दिली. ममता बॅनर्जी यांचा आवाज शांत करण्यासाठी झालेला हा काही पहिला प्रयत्न नाही. यापूर्वी शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी पुकारलेल्या ऐतिहासिक आंदोलनावेळी ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाला होता. मात्र, कोणत्याही हल्ल्यामुळे त्या मोडून पडल्या नाहीत. ममता बॅनर्जी या आजपर्यंत जनतेचा आवाज बुलंद करत आल्या, आहेत आणि राहतील, असे तृणमूल काँग्रेसच्यावतीने जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

ममता बॅनर्जी प्रचाराला मुकणार?

यंदाची पश्चिम बंगालची निवडणूक कधी नव्हे ती इतकी अटीतटीची होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा खंदा प्रतिस्पर्धी आणि भाजपच्या आक्रमक प्रचार यंत्रणेला थोपावण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून प्रचार करणे तृणमूल काँग्रेससाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

मात्र, ममता बॅनर्जी यांच्या दुखापतीचे एकूण स्वरुप पाहता त्या राज्यभरात फिरून किती प्रचारसभा घेऊ शकतील, याबाबत शंकाच आहे. गेल्या काही काळात भाजपने सुवेन्दू अधिकारी यांच्यासह तृणमूलचे अनेक प्रमुख नेते गळाला लावले आहेत. हे कडवे आव्हान परतवून लावण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी प्रत्यक्ष प्रचारसभा घेऊन कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य फुंकण्याची गरज आहे. मात्र, सध्याच्या घडीला तरी ही गोष्ट अवघड वाटत आहे.

संबंधित बातम्या :

VIDEO : बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या ताफ्यावर हल्ला, पायाला दुखापत, कोलकाताच्या रुग्णालयात उपचार

West Bengal Election 2021 : ‘स्वत:चं नाव विसरु शकते, पण नंदीग्राम नाही, विजय निश्चित’ उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ममतांचा दावा

Attack On CM Mamta Banerjee: ममता बॅनर्जींच्या पायाला प्लॅस्टर; निवडणूक आयोगाने मागवला अहवाल?

(Mamata’s tests detected injuries to her ankle, right shoulder, neck, says doctor)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.