AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salman Khan : सलमानच्या फार्महाऊसवरून 24 वर्षांची तरूणी पोलिसांच्या ताब्यात, कारण..

बॉलिवूडमधील कलाकारांचे लाखो फॅन्स, चाहते असतात. मात्र काहीवेळेस त्यांचं प्रेम हे तापदायक ठरतं. असंच काहीस यावेळी सलमान खान याच्यासोबत झालं. दिल्लीतील एक 24 वर्षांची फॅन सलमानच्या पनवेल येथील फार्महाऊसवर पोहोचली. तिला तेथून पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यामागचं कारण ऐकाल तर..

Salman Khan : सलमानच्या फार्महाऊसवरून 24 वर्षांची तरूणी पोलिसांच्या ताब्यात, कारण..
| Updated on: Jun 03, 2024 | 11:53 AM
Share

सलमान खानचे पनवेलचे फार्महाऊस बरंच फेमस आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून हे फार्महाऊस कोणत्या ना कोणत्या कारणामुळे बरंच चर्चेत आलं आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगरच्या गुंडानी तेथे रेकी रून सलमानवर हल्ल्याचा कट आखला होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली. आता हे फार्महाऊस पुन्हा चर्चेत आलं आहे. कारण या फार्म हाऊसबाहेरून एका 24 वर्षीय तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची बातमी समोर आली आहे. यामुळे न सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. मात्र ती मुलगी कोण होती, त्यामुळे सलमानच्या जीवाला धोका आहे का असे अनेक प्रश्न सध्या लोकांना पडले आहेत.

खरंतर दिल्लीतील या 24 वर्षांच्या तरूणाने सलमान खानच्या पनवेल फार्महाउस बाहेर मोठा गोंधळ माजवला. त्या तरूणीच्या सांगण्यानुसार, ती सलमानची मोठी चाहती आहे. सलमानशी लग्न करायचं आहे असं सांगत ती चरूणी फार्महाऊसवर पोहोचली आणि त्याची भेट घेण्याचा हट्ट करू लागली. मात्र आसपासच्या लोकांनी तिचा हा गोंधळ फोनमध्ये रेकॉर्ड केला आणि लागलीच या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिली.

फार्महाऊसवर सलमान होता का ?

दरम्यान ही घटना घडली तेव्हा दंबग स्टार काही त्याच्या पनवेलच्या फार्महाऊसवर नव्हता. रिपोर्ट्सनुसार, या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून त्यामध्ये भावूक झालेली ती तरूणी सलमानशी लग्न करण्याची इच्छा वारंवार व्यक्त करत होती. अखेर पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं आणि काऊन्सिलिंगसाठी तिला न्यू पनवेल येथील एका एनजीओमध्ये पाठवण्यात आलं.

त्या एनजीओच्या संस्थापकांच्या सांगण्यानुसार, त्या तरूणीची स्थिती गंभीर आहे. ती सलमान खानच्या पडद्यावरील प्रतिमेच्या प्रेमात आकंठ बुडाली आहे. तिला मानसिक उपचारांसाठी कळंबोलीतील एमजीएम रुग्णालयात गदाखल करण्यात आले. त्यानंतर दिल्लीतील तिच्या कुटुंबियांशी संपर्क साधून या घटनेची माहिती देण्यात आली. उपचारांनंतर तिला घरी पाठवण्यात येईल.

सलमानच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी आणखी एकाला अटक

सलमान खान याच्या मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंटवर एप्रिल महिन्यात दोन तरुणांनी गोळीबार केला होता. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला होता. हल्ल्यानंतर पोलिसांनी तपास करत आरोपींना गुजरामधून अटक केली होती. एवढं सगळं होऊनही लॉरेन्स बिश्नोई गँगच्या कुरापत्या काही केल्या संपताना दिसत नाहीय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लॉरेन्स बिश्नोई टोळीने सलमान खानच्या विरोधात आणखी एक नवा कट रचला होता. पण हा कट उधळून लावण्यात पोलिसांना यश आलं. पोलिसांनी सलमान खान विरोधाताली नव्या कटाप्रकरणी लॉरेन्स बिश्नोई गँगच्या आणखी एका आरोपीला अटक केली आहे. याआधी नवी मुंबई पोलिसांनी पनवेल येथून चार आरोपींना अटक केली होती.

नवी मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खानच्या हत्येसाठी लॉरेन्स बिश्नोई टोळीने रचलेल्या नवीन कटप्रकरणी आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. नवी मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हरियाणा पोलिसांनी ही अटक केली आहे. हरियाणा पोलिसांनी दीपक उर्फ ​​जॉनी वाल्मिकी (वय ३०) नावाच्या आरोपीला भिवानी येथून अटक केली. लॉरेन्स बिश्नोई टोळीने रचलेल्या नव्या कटानुसार, 70 ते 80 जण सलमान खानच्या पनवेल येथील फॉर्म हाऊसची रेकी करत होते. हे सर्व आरोपी सलमान खानच्या कारवर हल्ला करण्याच्या तयारीत होते. याच प्रकरणी मुंबई पोलिसांनी 4 आरोपींना अटक केल्याची माहिती समोर आली होती. या आरोपींच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर येत आहे. अटकेतील सर्व चारही आरोपी हे थेट लॉरेन्स बिश्नोईच्या संपर्कात होते. तसेच या आरोपींनी सलमानवर हल्ला करण्यासाठी थेट पाकिस्तानातून AK-47 मागवली होती.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.