AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

33 वर्षांपूर्वीचा ब्लॉकबस्टर चित्रपट, 3 गाण्यांनी रचला होता इतिहास, एकामुळे रंगलेला प्रचंड वाद, पण आजही लोक त्याच गाण्याचे चाहते

33 वर्षे जुना ब्लॉकबस्टर चित्रपट ज्यामध्ये होती 10 गाणी, यामधील या गाण्यामुळे झाला होता मोठा वाद. मात्र, तेच गाणं आजही प्रचंड सुपरहिट. अनेक वेळा ऐकलं तरी भरत नाही मन.

33 वर्षांपूर्वीचा ब्लॉकबस्टर चित्रपट, 3 गाण्यांनी रचला होता इतिहास, एकामुळे रंगलेला प्रचंड वाद, पण आजही लोक त्याच गाण्याचे चाहते
Image Credit source: Social media
| Updated on: Apr 25, 2026 | 6:43 PM
Share

बॉलिवूडमध्ये अनेक अशा चित्रपटांचा खजिना आहे, ज्यांची गाणी आणि संगीत ऐकताच प्रेक्षक थेट जुन्या आठवणींमध्ये हरवून जातात. 90 च्या दशकात आलेल्या चित्रपटांनी संगीताच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अमिट ठसा उमटवला. अशाच एका सुपरहिट चित्रपटाची पुन्हा चर्चा रंगू लागली आहे. कोणतं आहे ते गाणं?

1993 साली प्रदर्शित झालेल्या ‘खलनायक’ या चित्रपटातील अँटी-हिरो ‘बल्लू बलराम’ हे पात्र आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. आता हे आयकॉनिक पात्र पुन्हा मोठ्या पडद्यावर परतणार असल्याची चर्चा आहे. अभिनेता संजय दत्त पुन्हा एकदा आपल्या खलनायकी अंदाजात दिसणार असून, दिग्दर्शक सुभाष घई यांनी या नव्या प्रोजेक्टची घोषणा करत पोस्टर शेअर केले आहे. हा चित्रपट मूळ ‘खलनायक’चा सिक्वेल असल्याचे सांगितले जात आहे.

स्टारकास्ट आणि दमदार कथा

6 ऑगस्ट 1993 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात संजय दत्त, माधुरी दीक्षित आणि जॅकी श्रॉफ यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. याशिवाय राखी गुलजार, अनुपम खेर आणि रम्या कृष्णन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या.

चित्रपटाची कथा ‘बल्लू’ या धोकादायक गुन्हेगारा भोवती फिरते, जो तुरुंगातून पळून जातो. त्याला पकडण्याची जबाबदारी इन्स्पेक्टर रामवर येते. परिस्थिती गंभीर होताच, रामची प्रेयसी ‘गंगा’ अंडरकव्हर डान्सर बनून बल्लूच्या जवळ जाते. मात्र त्याच्या मानवी बाजूने ती प्रभावित होते आणि कथा वेगळ्याच वळणावर जाते.

गाण्यांनी गाजवला इतिहास

या चित्रपटात एकूण 10 गाणी होती आणि त्यातील अनेक गाणी आजही सुपरहिट मानली जातात. विशेषत चोली के पीछे… आणि नायक नहीं खलनायक हूं मैं ही गाणी आजही प्रेक्षकांच्या ओठांवर आहेत. यूट्यूबवरही या गाण्यांना मोठा प्रतिसाद मिळत असून नायक नहीं खलनायक हूं मैं या गाण्याला 25 कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

सुमारे 3 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल 24 कोटींची कमाई करत मोठे यश मिळवले. या अॅक्शन-क्राईम थ्रिलर चित्रपटाला IMDb वर 7.1 रेटिंग मिळाली असून फिल्मफेअर पुरस्कारांमध्येही अनेक नामांकन मिळाले होते.

सुमारे 3 तास 10 मिनिटांचा हा चित्रपट आजही प्रेक्षकांना तितकाच आवडतो. दमदार कथा, संवाद आणि गाण्यांमुळे हा चित्रपट ‘कल्ट क्लासिक’ ठरला आहे. आजच्या नव्या पिढीलाही हा चित्रपट तितकाच आकर्षित करत असून तो Amazon Prime Video वर तसेच यूट्यूबवरही पाहता येतो.

Follow Us
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
Girish Mahajan | रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? गिरीश महाजनांचा मोठा दावा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
Gondia Rain | गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक शेतकरी चिंतेत
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
Mumbai | नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! 13 एप्रिलला अटक, आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड