AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमिताभ बच्चन यांचं सर्वात मोठं ब्लॉकबस्टर गाणं, 45 नाही… तब्बल 140 वर्ष जुनं, ऐकताच दिवसभर गुनगुनतात लोक

45 वर्षे नाही तर 140 वर्षे जुने आहे अमिताभ बच्चन यांचं सर्वात ब्लॉकबस्टर गाणं. ज्यावर आजही ठेका धरतात लाखो चाहते. एकदा ऐकलं तर दिवसभर गुनगुनतात गाणं.

अमिताभ बच्चन यांचं सर्वात मोठं ब्लॉकबस्टर गाणं, 45 नाही… तब्बल 140 वर्ष जुनं, ऐकताच दिवसभर गुनगुनतात लोक
Image Credit source: Social media
| Updated on: Apr 15, 2026 | 4:06 PM
Share

Amitabh Bachchan Big Hit Song: 70-80 च्या दशकात बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन यांच्या गाण्यांची जबरदस्त क्रेझ होती. त्या काळात त्यांच्या चित्रपटांचे गाणे प्रदर्शित झाले की ते सर्वत्र ऐकू येत असत. रेडिओ किंवा कॅसेट प्लेयरवर. विशेष म्हणजे, काही गाण्यांमध्ये अमिताभ बच्चन यांनी स्वतः आवाज दिला होता, ज्यामुळे त्या गाण्यांची लोकप्रियता आणखी वाढली होती.

‘खैके पान बनारस वाला’ आणि ‘कभी कभी’ यांसारखी अनेक गाणी आजही प्रेक्षकांच्या मनात ताजी आहेत. त्यांच्या गाण्यांमध्ये लोकसंगीताचा प्रभाव आणि हलका विनोद यांचा सुंदर मिलाफ पाहायला मिळतो. अशाच एका गाण्याने अनेक वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या मनावर अमिट छाप सोडली जी आजही कायम आहे.

हे गाणे म्हणजे मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है. सुमारे 45 वर्षांपूर्वी, म्हणजे 1981 मध्ये प्रदर्शित झालेल्या लावारिस या चित्रपटातील हे गाणे आजही तितकेच लोकप्रिय आहे. या गाण्याची खास बाब म्हणजे ते स्वतः अमिताभ बच्चन यांनी गायले होते.

अमिताभ यांचा साडी घालून डान्स

या गाण्याची मुळे जुन्या लोकगीतांमध्ये असल्याचे मानले जाते. चित्रपटात हे गाणे विनोदी आणि उपरोधिक शैलीत सादर करण्यात आले होते. विशेष म्हणजे, या गाण्यात अमिताभ बच्चन यांनी महिला वेश परिधान करून केलेली परफॉर्मन्स प्रेक्षकांसाठी आश्चर्याचा धक्का ठरला होता आणि तोच या गाण्याची खास ओळख बनला.

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर हे गाणे प्रचंड गाजले. रेडिओवर सतत वाजणारे हे गाणे कॅसेट दुकानांमध्येही मोठ्या प्रमाणात विकले जात होते. लग्नसमारंभ आणि विविध कार्यक्रमांमध्ये हे गाणे अनिवार्य झाले होते. आजही सोशल मीडिया आणि स्टेज शोमध्ये हे गाणे वारंवार ऐकायला मिळते.

4 कोटी बजेट अन् कमाई 25 कोटी

सोशल मीडियावर या गाण्याबद्दल एक दावा केला जातो की ते सुमारे 140 वर्षे जुने आहे आणि 1883 मध्येच त्याची रेकॉर्डिंग झाली होती. मात्र, हा दावा ऐतिहासिकदृष्ट्या चुकीचा ठरतो. कारण ग्रामोफोनचे पेटंट 1887 मध्ये झाले आणि भारतात पहिली ध्वनिमुद्रण 1902 च्या सुमारास झाले. मात्र, या गाण्याची प्रेरणा जुन्या लोकसंगीतातून घेतलेली असल्याचे मानले जाते.

‘लावारिस’ या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रकाश मेहरा यांनी केले होते. त्या काळात या चित्रपटाचे बजेट सुमारे 4 ते 5 कोटी रुपये होते तर त्याची कमाई 20 ते 25 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली होती.

Follow Us
नाशिक धर्मांतरण प्रकरणी अमित ठाकरे आक्रमक; म्हणाले, मी असतो तर...
नाशिक धर्मांतरण प्रकरणी अमित ठाकरे आक्रमक; म्हणाले, मी असतो तर....
TV9 चॅम्पियनशिप सीझन 2 साठी काऊंटडाऊन सुरू!
TV9 चॅम्पियनशिप सीझन 2 साठी काऊंटडाऊन सुरू!.
खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन
खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन.
राहुरी पोटनिवडणुकीच्या मतदानापूर्वीच राष्ट्रवादीला मोठा धक्का
राहुरी पोटनिवडणुकीच्या मतदानापूर्वीच राष्ट्रवादीला मोठा धक्का.
राज ठाकरे महापालिका आयुक्तांच्या भेटीसाठी मुंबई महानगरपालिकेत दाखल
राज ठाकरे महापालिका आयुक्तांच्या भेटीसाठी मुंबई महानगरपालिकेत दाखल.
ठाकरेंनी नकार दिला तर या महिला नेत्याला विधान परिषदेत जाण्याची संधी
ठाकरेंनी नकार दिला तर या महिला नेत्याला विधान परिषदेत जाण्याची संधी.
भाजपचं कॅरेक्टर, चरित्र, ढोंग काय आहे हे त्या प्रकरणात दिसतंय
भाजपचं कॅरेक्टर, चरित्र, ढोंग काय आहे हे त्या प्रकरणात दिसतंय.
संसदेत शाब्दिक चकमक; संजय राऊतांचे भाजपवर तीव्र शब्दांत टीकास्त्र
संसदेत शाब्दिक चकमक; संजय राऊतांचे भाजपवर तीव्र शब्दांत टीकास्त्र.
नाशिक धर्मांतर प्रकरणातील 7 जण अटकेत,मुख्य सूत्रधार निदा खान कुठे फरार
नाशिक धर्मांतर प्रकरणातील 7 जण अटकेत,मुख्य सूत्रधार निदा खान कुठे फरार.
नारी शक्ती विधेयकावर लोकसभेत घमासान; अरविंद सावंतांचा सरकारला सवाल
नारी शक्ती विधेयकावर लोकसभेत घमासान; अरविंद सावंतांचा सरकारला सवाल.