AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

72 Hoorain Review |धर्माच्या नावाखाली दहशतवाद पसरवणाऱ्यांना आरसा दाखवणारा चित्रपट; वाचा रिव्ह्यू..

आता राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक संजय पूरण सिंह चौहान यांनी '72 हुरें' या चित्रपटातून या सर्व गोष्टींवर प्रकाश टाकला आहे. धर्माच्या नावाखाली अधर्म करणाऱ्यांना त्यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून आरसा दाखवला आहे.

72 Hoorain Review |धर्माच्या नावाखाली दहशतवाद पसरवणाऱ्यांना आरसा दाखवणारा चित्रपट; वाचा रिव्ह्यू..
72 Hoorain Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 07, 2023 | 10:48 AM
Share

मुंबई : एका शायरने म्हटलंय की, ‘वो मंदिर भी उडाता है, वो मस्जिद भी उडाता है, फिर भी बडे फक्र से वो खुद को जिहादी कहलाता है.’ जेव्हा जेव्हा भारताने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला, तेव्हा त्या देशाने पाठित खंजीर खुपसल्याच्या घटनांना इतिहास साक्षीदार आहे. हे करताना शेजारच्या देशाने अनेकदा दहशवादाचा मार्ग निवडल्याचंही संपूर्ण जगाला माहीत आहे. धर्माच्या नावाखाली लोकांना फसवणं, त्यांना स्वर्गातील पऱ्यांची सोनेरी स्वप्नं दाखवून दहशतवादाच्या जाळ्यात अडकवणं आणि या सापळ्यात अडकलेल्या लोकांच्या माध्यमातून भारतावर दहशतवादी हल्ले घडवून आणणं, ही आपल्या शेजारील देशासाठी काही नवीन गोष्ट नाही. आता राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक संजय पूरण सिंह चौहान यांनी ’72 हुरें’ या चित्रपटातून या सर्व गोष्टींवर प्रकाश टाकला आहे. धर्माच्या नावाखाली अधर्म करणाऱ्यांना त्यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून आरसा दाखवला आहे.

कथा – ही कथा हकीम (पवन मल्होत्रा) आणि साकिब (आमिर बशीर) यांची आहे. चित्रपटाच्या कथेची सुरुवातच अमेरिकेच्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या हाताला लटकवलेल्या हकीमच्या मृतदेहापासून होते. एका मौलानाने सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवून हे दोघं जन्नत आणि 72 हुरेंच्या स्वप्नासाठी पाकिस्तानातून भारतात येतात. धर्म आणि जिहादबद्दल बोलणाऱ्या हकीमचा हेतू काही योग्य नाही हे समजायला जास्त वेळ लागत नाही. मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियावर अल्लाहचं नाव घेऊन हे दोघं आत्मघातकी बॉम्बस्फोट घडवून आणतात. मृत्यूनंतर हकीम आणि साकिबचा 72 हुरेंना मिळवण्याचा प्रवास सुरू होते. त्यांची आत्मा जन्नतपर्यंत पोहोचते का, त्यांना 72 हुरें भेटतात का, मौलवींनी सांगितल्यानुसार दहशतवाद्यांना घेऊन जाण्यासाठी खरंच अल्लाहचे दूत येतात का, या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला या चित्रपटात मिळणार आहेत.

लेखन आणि दिग्दर्शन – या चित्रपटासाठी लेखक आणि दिग्दर्शकांनी खूप संशोधन आणि मेहनत केली आहे, हे चित्रपट पाहताना स्पष्ट जाणवतं. अनिल पांडे लिखित या चित्रपटाच्या कथेने कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत याची पुरेपूर काळजी घेतली आहे. पण धर्माच्या नावाखाली लोकांची दिशाभूल करणाऱ्यांना यातून चांगला धडा मिळू शकेल. दिग्दर्शक संजय पूरण सिंह चौहान यांनी त्यांच्या व्यंगात्मक शैलीत निष्पापांचं ब्रेनवॉश करणाऱ्यांबद्दल अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या पाहून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल. दमदार स्क्रीनप्ले आणि प्रभावी संवाद या चित्रपटाच्या जमेच्या बाजू ठरतात. दिग्दर्शकांनी अत्यंत संवेदनशील विषय जबाबदारीने आणि गांभीर्याने मांडला आहे.

अभिनय- या चित्रपटात अभिनेता पवन मल्होत्रा आणि आमिर बशीर यांनी दहशतवाद्यांच्या भूमिका साकारल्या आहेत. या दोघांनीही त्यांच्या करिअरची सुरुवात रंगभूमीपासून केली आहे. त्यामुळे मोठ्या पडद्यावर दोघांचं अभिनय संपूर्ण 101 मिनिटांपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवतं. पात्रांची देहबोली आणि अभिव्यक्तीमध्ये हळूहळू होणारा बदल या दोघांनी अचूकरित्या अभिनयात उतरवला आहे.

सिनेमॅटोग्राफी आणि तांत्रिक बाबी – हा संपूर्ण चित्रपट मोनोक्रॉमिक अंदाजात सादर केला आहे. त्यामुळे फक्त जिथे आवश्यक आहेत तिथेच रंग आणि वीएफएक्सचा वापर केला आहे. बहुतांश चित्रपट ब्लॅक अँड व्हाइटमध्येच पाहायला मिळतो. काही ठराविक सीन्स सोडल्यास कॅमेरा अँगल आणि चित्रीकरण अचूक आहे. एखाद्या चित्रपटाला प्रभावी बनवण्याचं काम हे एडिटरचं असतं असं म्हणतात आणि ’72 हुरें’ या चित्रपटाच्या एडिटरने ते काम यशस्वीरित्या पार पाडलं आहे. मात्र या चित्रपटाचं पार्श्वसंगीत आणखी प्रभावी होऊ शकलं असतं.

का पहावा? – ‘जिहादमध्ये सहभागी होऊन अल्लाहचे खास सेवक बना’ असं म्हणून जाळ्यात फसणाऱ्या त्या प्रत्येक व्यक्तीला हा चित्रपट योग्य धडा शिकवतो. निरपराध लोकांना मारून स्वर्ग मिळत नाही किंवा स्वर्गातील 72 हुरेंही भेटत नाहीत. कारण कोणताच धर्म लोकांना द्वेष करायला शिकवत नाही, असा संदेश या चित्रपटातून मिळतो.

चित्रपटातील खटकणाऱ्या गोष्टी- हा चित्रपट कथेच्या बाबतीत प्रभावी असला तरी ज्या तरुणांच्या दृष्टीने हा चित्रपट बनवण्यात आला आहे, त्यांना ब्लॅक अँड व्हाइट शैलीत चित्रपट पाहणं कंटाळवाणं वाटू शकतं. त्याचप्रमाणे फक्त मनोरंजन म्हणून तुम्ही हा चित्रपट पाहण्याचा विचार करत असाल, तर हा चित्रपट तुमच्यासाठी नाही.

साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.