AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunny Deol | सनी देओल याच्या मदतीला धावून आला अक्षय कुमार? खिलाडी कुमार फेडणार कर्ज, वाचा यामागील सत्य काय

बाॅलिवूड अभिनेता सनी देओल याचा चित्रपट गदर 2 हा धमाका करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड हे आपल्या नावावर केले आहेत. गदर 2 साठी सनी देओल याच्या अभिनयाचे काैतुक देखील केले जात आहे. मात्र, गदर 2 हा सध्या त्याच्या पर्सनल लाईफमुळेही जोरदार चर्चेत आलाय.

Sunny Deol | सनी देओल याच्या मदतीला धावून आला अक्षय कुमार? खिलाडी कुमार फेडणार कर्ज, वाचा यामागील सत्य काय
| Updated on: Aug 21, 2023 | 4:32 PM
Share

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) हा त्याच्या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. सनी देओल याचा गदर 2 हा चित्रपट धमाका करताना दिसत आहे. या चित्रपटाने मोठी कामगिरी बाॅक्स आॅफिसवर करण्यास सुरूवात केलीये. सनी देओलचा गदर 2 (Gadar 2) हा चित्रपट लवकरच 500 कोटींच्या कमाईच्या क्लबमध्ये सहभागी होईल. विशेष म्हणजे गदर 2 चित्रपटासाठी सनी देओल याच्या अभिनयाचे जोरदार काैतुक होताना दिसत आहे. गदर 2 चित्रपटाची चाहत्यांमध्ये इतकी जास्त क्रेझ आहे की, चित्रपट बघण्यासाठी चाहत्यांच्या थिएटरबाहेर मोठ्या रांगा लागल्या आहेत.

सनी देओल याचा चित्रपट धमाका करत असतानाच त्याच्या पर्सनल लाईफमध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. सनी देओल यांच्या मुंबईतील जुहू येथील बंगल्याच्या लिलावाची नोटीस पाठवण्यात आली. मात्र, बँकेने ती नोटीस परत घेतलीये. बँक ऑफ बरोडाने ही नोटीस सनी देओल याला पाठवली होती.

सनी देओल याच्या जुहू येथील बंगल्याचा 25 ऑगस्ट रोजी लिलाव होणार होता. 56 कोटी रुपये वसूल करण्यासाठी सनी देओल याचा बंगला बँक ऑफ बरोडाने ब्लॉकवर ठेवला होता. सनी देओल हा बँक ऑफ बरोडाचा 55.99 कोटी रुपयांच्या कर्जाचा थकबाकीदार आहे. तांत्रिक कारणांमुळे बँकने बंगल्याच्या विक्री लिलावाची नोटीस मागे घेतली आहे.

यादरम्यान अनेक चर्चा सुरू झाल्या. अनेक रिपोर्टमध्ये सांगण्यात आले की, अक्षय कुमार हा सनी देओल याच्या मदतीला धावून आलाय आणि सनी देओल याचे बँक ऑफ बरोडाचे कर्ज अक्षय कुमार हा देणार आहे. इतकेच नाही तर सनी देओल हा एका विशिष्ट तारखेपर्यंत अक्षय कुमार याचे हे सर्व पैसे वापस करणार आहे.

यानंतर चाहत्यांनी सनी देओल याच्या मदतीला अक्षय कुमार हा धावून आल्याचे कळताच, त्याचे काैतुक करण्यास सुरूवात केली. इतकेच नाही तर अक्षय कुमार याने बँक अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचे देखील सांगितले जात होते. यामुळे बँकेने नोटीस परत घेतल्याचे बोलले जात होते. मात्र, यासंदर्भात सत्यसमोर आले आहे.

सनी देओल याच्या टिमकडून हे स्पष्ट करण्यात आले की, अक्षय कुमार याने अशी कोणत्याही प्रकारची मदत सनी देओल याला केली नाहीये. या फक्त आणि फक्त अफवा असल्याचे सनी देओल याच्या टिमकडून स्पष्ट करण्यात आले. बँक ऑफ बरोडाने देखील तांत्रिक कारण नोटीस वापस घेण्याचे दिले आहे. आता यावर पुढे काय काय घडामोडी घडतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.