Fitness Freak : विकी कौशलचा नवा लूक, आगामी चित्रपटासाठी तयारी करत असल्याची चर्चा

अभिनेता विकी कौशल आपल्या अभिनयानं आणि फिटनेसनं चाहत्यांची नेहमी मनं जिंकतो. (A new look for Vicky Kaushal)

  • Updated On - 2:17 pm, Wed, 23 December 20
Fitness Freak : विकी कौशलचा नवा लूक, आगामी चित्रपटासाठी तयारी करत असल्याची चर्चा

मुंबई : अभिनेता विकी कौशल आपल्या अभिनयानं आणि फिटनेसनं चाहत्यांची नेहमी मनं जिंकतो, सोबतच आता तो आपल्या नवीन लूकनंही सर्वांना प्रभावित करतोय. विकी सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असतो. त्यानं नुकताच इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, या फोटोमध्ये त्यांचा लूक पूर्णपणे वेगळा दिसत आहे. ‘मला माहित आहे की आपण अधिक चांगलं काम करू शकतो, मला माहित आहे की आपण एक उत्तम माणूस आहोत.’ असं कॅप्शन देत त्यांनं एक फोटो शेअर केला आहे.

विक्कीनं त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवरही एक फोटो शेअर केला आहे, या फोटोमध्ये तो जिममध्ये जोरदार व्यायाम करताना दिसतोय. सोबतच त्यानं दुसरा फोटो इन्स्टाग्रामच्या फीडमध्ये पोस्ट केला आहे, या फोटोमध्ये त्याची बॉडी कमाल दिसत आहे. जीममधला हा फोटो आहे आणि या फोटोत तो त्याचे बायसेप्स दाखवतोय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

विक्की कौशलच्या या फोटोवर फक्त त्याचे चाहतेच नाही तर त्याचे स्टार मित्रही कमेंट करत आहेत. अभिनेता राजकुमार रावनं ‘रॉक सॉलिड ब्रदर’ अशी कमेंट केली आहे. तर विकीचा भाऊ सनी कौशलनं ‘हे डोला रे डोला रे डोला…’अशी मजेदार कमेंट केली आहे. तर काही चाहत्यांनी ‘जोश हाय आहे’ अशी कमेंट केली आहे.

विकी कौशलनं हा नवा लूक त्याच्या आगामी चित्रपटासाठी साकारला आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’चे दिग्दर्शक आदित्य धर विकी कौशलला त्यांच्या नव्या प्रोजेक्टमध्ये म्हणजेच ‘अमर अश्वत्थामा’ मध्ये कास्ट करत आहेत.

उरी या चित्रपटाच्या वेळी विकीचं वजन 90-95 किलो होतं. आता ‘अमर अश्वत्थामा’साठी त्याला 110-115 किलो वजन करण्यास सांगण्यात आलं असल्याची चर्चा आहे. विक्कीचा हा नवा लूक पाहता तो त्याच्या आगामी चित्रपटाच्या तयारीत व्यस्त असल्याचं दिसतंय .

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI