AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आदित्य धरला मोठा झटका, ‘धुरंधर 2’ याठिकाणी लीक, कमाईला लागणार मोठा फटका

दिग्दर्शक आदित्य धर याला मोठा झटका बसला आहे. कारण बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत असलेला सिनेमा लीक झालाय. याच कारणामुळे सिनेमाच्या कमाईला मोठा फटका लागणार आहे... सध्या सर्वत्र 'धुरंधर 2' सिनेमाची चर्चा रंगली आहे.

आदित्य धरला मोठा झटका, 'धुरंधर 2' याठिकाणी लीक, कमाईला लागणार मोठा फटका
Dhurandhar 2
| Updated on: Mar 31, 2026 | 11:22 AM
Share

अभिनेता रणवीर सिंग स्टारर आणि दिग्दर्शक आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर 2’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करताना दिसत आहे. फक्त भारतातच नाही तर, परदेशात देखील ‘धुरंधर 2’ सिनेमाचा बोलबाला पाहायला मिळत आहे. सिनमाने आतापर्यंत 1300 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवर सिनेमा मोठी मजल मारत असताना आदित्य धर याला मोठा झटका बसला आहे. कारण ‘धुरंधर 2’ सिनेमा युट्यूबवर लीक झाला आहे. ज्यामुळे प्रेक्षकांची खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अनेकांनी आदित्य याला अर्लट केलं असून सक्त कारवाई करण्यास सांगितली आहे…

मीडिया रिपोर्टनुसार, सांगितलं जात आहे की, एका युट्यूब चॅलने जवळपास 3 तास 49 मिनिटांचा पूर्ण सिनेमा अपलोड केला आहे. ज्यामुळे त्याच्या बॉक्स ऑफिसवर होत असलेल्या कमाईवर त्याचा परिणाम दिसू शकतो… या घटनेनंतर प्रेक्षकांनी उघडपणे आपला संताप व्यक्त केला असून सिनेमाचे दिग्दर्शक आदित्य धर यांना टॅग करून तात्काळ कारवाईची मागणी केली.

एका नेटकऱ्याने एके एक्सवर पोस्ट करत आदित्य याला याबद्दल माहिती दिली. नेटकरी पोस्ट करत म्हणाला, ‘आदित्य धर, यामी गौतम ‘धुरंधर 2′ सिनेमा यूट्यूबवर लीक झाला आहे. कृपया याबद्दल युट्यूबवर तक्रार दाखल करा.. मला असं वाटतं सिनेमाने कमीत कमी 3000 कोटी रुपयांची केली पाहिजे… मला सिनेमाची सिनेमाटोग्राफी आणि कथा खूप आवडली. शेवटच्या दृश्यात तर माझ्या डोळ्यात पाणीही आले.” सोशल मीडियावर चाहत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर, “धुरंधर २” यूट्यूबवरून तात्काळ काढून टाकण्यात आला.’

‘धुरंधर 2’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, 19 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या सिनेमाने पहिल्यात दिवशी 100 कोटींचा गल्ला पार केला. ‘धुरंधर 2’ ने अनेक प्रसिद्ध आणि दिग्गज अभिनेत्यांच्या हीट सिनेमांना मागे टाकलं आहे… सिनेमातील कलाकारांबद्दल सांगायचं झाल्यास, अर्जुन रामपाल मेजर इक्बालच्या भूमिकेत परतला आहे, तर संजय दत्त पोलीस एसपी चौधरी अस्लम याची भूमिका पुन्हा साकारत आहे. याशिवाय, आर. माधवन अजय सन्यालच्या भूमिकेत आहे आणि राकेश बेदी जमीला जमालीची भूमिका पुन्हा साकारत आहेत. नवीन आणि जुन्या कलाकारांच्या या मिश्रणामुळे सिनेमा अधिकच प्रभावी ठरत आहे.

Follow Us
पुणे दारूकांडानंतर संतापाचा स्फोट! युवक काँग्रेस, गुलाबो गँग अन्.....
पुणे दारूकांडानंतर संतापाचा स्फोट! युवक काँग्रेस, गुलाबो गँग अन्......
मराठा आरक्षणाबाबत विखे पाटील ॲक्शन मोडमध्ये, त्या अधिकाऱ्याला बजावली..
मराठा आरक्षणाबाबत विखे पाटील ॲक्शन मोडमध्ये, त्या अधिकाऱ्याला बजावली...
सावलीत बसा... अभ्यासक आल्यावर निर्णय घ्या, पाटलांची जरांगेंना विनंती
सावलीत बसा... अभ्यासक आल्यावर निर्णय घ्या, पाटलांची जरांगेंना विनंती.
7 वर्षे हे नेटवर्क कोणाच्या आशीर्वादाने? संजय राऊतांचा खळबळजनक सवाल
7 वर्षे हे नेटवर्क कोणाच्या आशीर्वादाने? संजय राऊतांचा खळबळजनक सवाल.
मनोज जरांगेंनंतर ओबीसी समाजाचं वादळ येणार, नेमकी भानगड काय?
मनोज जरांगेंनंतर ओबीसी समाजाचं वादळ येणार, नेमकी भानगड काय?.
...तर उद्रेक होऊ शकतो, शाहू महाराजांनी दिला थेट इशारा, मराठा आंदोलनाबा
...तर उद्रेक होऊ शकतो, शाहू महाराजांनी दिला थेट इशारा, मराठा आंदोलनाबा.
जरांगे पाटलांच्या उपोषणावर, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
जरांगे पाटलांच्या उपोषणावर, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया.
प्रकरण पेटलंच! मी चर्चेला तयार, मात्र आता चर्चादेखील रखरखत्या उन्हातच.
प्रकरण पेटलंच! मी चर्चेला तयार, मात्र आता चर्चादेखील रखरखत्या उन्हातच..
प्रदर्शनाच्या बहाण्याने विद्यार्थिनीला नेलं अन्...! शिक्षकाचा घृणास्पद
प्रदर्शनाच्या बहाण्याने विद्यार्थिनीला नेलं अन्...! शिक्षकाचा घृणास्पद.
समाजासाठी मरायला तयार आहे… डोळ्यात अश्रू, कंठ दाटला... जरांगे रडले
समाजासाठी मरायला तयार आहे… डोळ्यात अश्रू, कंठ दाटला... जरांगे रडले.