AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डॉ. बाबर खरंच डॉक्टर आहेत का? वडिलांच्या निधनानंतर अभिनेत्रीचा संताप, राजेश टोपेंनाही सवाल

मी अनुभवाशिवाय बोलत नाही पण जे माझ्या डोळ्यासमोर घडले ते महाराष्ट्राच्या इतर ठिकाणी होत असणारच, असं म्हणत अभिनेत्री अश्विनी महांगडेने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनाही प्रश्न विचारला आहे. (Actress Ashvini Mahangade Father's Death)

डॉ. बाबर खरंच डॉक्टर आहेत का? वडिलांच्या निधनानंतर अभिनेत्रीचा संताप, राजेश टोपेंनाही सवाल
अभिनेत्री अश्विनी महांगडे
| Edited By: | Updated on: Jun 03, 2021 | 2:43 PM
Share

मुंबई : स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अनघाची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री अश्विनी महांगडे (Ashvini Mahangade) हिच्यावर नुकताच दुःखद प्रसंग ओढावला. कोरोनाशी झुंज देताना अश्विनीचे वडील प्रदीपकुमार सदाशिव महांगडे यांचे  निधन झाले. मात्र साताऱ्यातील वाईमधील ज्या बाबर हॉस्पिटलमध्ये अश्विनीच्या वडिलांवर उपचार करण्यात आले, ते हॉस्पिटल आणि डॉक्टर बोगस असल्याचं तिच्यासमोर आलं आहे. त्यामुळे माझ्यासारखे पोरके व्हायचे नसेल तर कृपया आपल्या नातेवाईकांना बाबर हॉस्पिटल, वाई मध्ये उपचारासाठी पाठवू नका, अशी विनवणी अश्विनीने सोशल मीडियावरुन केली आहे. (Aai Kuthe Kay Karte Anagha Marathi TV Actress Ashvini Mahangade Facebook post after Father’s Death)

राजेश टोपेंना सवाल

ज्या खाजगी हॉस्पिटलला तुम्ही कोरोना सेंटर म्हणून पत्र देता, त्या हॉस्पिटलचा मृत्यू दर वाढतोय हे गृहीतच धरता का? मी अनुभवाशिवाय बोलत नाही पण जे माझ्या डोळ्यासमोर घडले ते महाराष्ट्राच्या इतर ठिकाणी होत असणारच, असा थेट सवाल अश्विनीने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना विचारला आहे.

बाबर यांच्या डॉक्टरकीवर प्रश्नचिन्ह

डॉ. बाबर खरंच डॉक्टर आहेत का? तसेही वाई तालुक्याला कोणीही स्वतःला डॉक्टर बोलवून घेण्याचा शाप आहेच म्हणा. सकाळपासून डॉ. बाबर यांच्या डॉक्टर नसण्याचे बरेच पुरावे मेसेज स्वरुपात मला मिळाले. इतक्या लोकांना हाच अनुभव असूनही यांचे दुकान हो दुकानच अजून सुरूच आहे. लोक काही दिवसांनी माझी पोस्ट सुद्धा विसरतील कदाचित आणि यांचे माणसं मारण्याचे यंत्र राजरोसपणे सुरूच राहील का? असा प्रश्नही अश्विनीने विचारला आहे.

अश्विनीची उद्विग्नता

माझ्या बऱ्याच जवळच्या पोलीस आणि वकिलांनी हेच सांगितले की केस करा. पण मला माहित आहे आज त्यांच्या लेटर पॅड वर लिहून पुरावे देऊन कायद्याच्या कचाट्यातून कसे बाहेर पडायचे हे यांना नवीन नाही. नाना उपचारासाठी दाखल झाल्यापासून त्यांच्यावर काय उपचार झाला? यातले आम्हाला काहीच माहीत नाही. ना आमच्यापैकी कोणी नानांना आत जाऊन भेटले. हे डॉक्टर नेमका काय उपचार करत आहेत हे सांगण्यासाठी ते बांधील नाहीत का? म्हणजे फक्त बिल भरण्यासाठी नातेवाईक गरजेचे आहेत. पण आपण प्रश्न विचारला तर या डॉक्टरांचा इगो दुखावतो की यांना काय अक्कल आहे की हे आम्हाला प्रश्न विचारतात? अशा शब्दात अश्विनीने उद्विग्नता व्यक्त केली आहे. (Actress Ashvini Mahangade Father’s Death)

अश्विनीची फेसबुक पोस्ट :

अश्विनी महांगडेची कारकीर्द

छोट्या पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कन्येची अर्थात ‘राणू अक्कां’ची भूमिका अभिनेत्री अश्विनी महांगडेने साकारली आहे. रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान नावाने सेवाभावी संस्थाही ती चालवते. या संस्थेअंतर्गत आजवर तिने अनेक उपक्रम राबवले आहेत. अश्विनीने आपल्या संस्थेमार्फत महाराष्ट्रभर विनामूल्य जेवणाची व्यवस्था सुरु केली आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्येही तिने नागरिकांना मदत केली होती.

संबंधित बातम्या :

कुणाला जेवणाचे डबे, तर कुणाला औषध, ‘लॉकडाऊन’मध्ये ‘आई कुठे काय करते’ची अभिनेत्री करतेय रुग्णांची मदत!

‘स्वराज्य रक्षक संभाजी’मधील अभिनेत्रीचं हॉटेल, 40 रुपयांत भरपेट जेवण

कोरोनाने घात केला, माझा आधारवड हरपला, ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीच्या वडिलांचे निधन

(Aai Kuthe Kay Karte Anagha Marathi TV Actress Ashvini Mahangade Facebook post after Father’s Death)

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.