आमिर खानच्या खासगी आयुष्याबद्दल भावाने केली पोलखोल, अभिनेत्याच्या पहिल्या पत्नीबद्दल आणि थेट गर्लफ्रेंडबद्दल खुलासा
बॉलिवूड अभिनेता आमिर खान हा मागील काही दिवसांपासून त्यांच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. किरण रावसोबतच्या घटस्फोटानंतर आमिर खान हा गाैरीला डेट करतोय. दोघे अनेकदा स्पॉट होताना दिसतात. आता आमिर खानच्या भावाने मोठे भाष्य केले आहे.

बॉलिवूड अभिनेता आमिर खान हा मागील काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत आहे. त्याच्या चित्रपटांना म्हणावे तेवढे धमाका करण्यास यश मिळत नाहीये. आता नुकताच आमिर खानचा भाऊ फैसल खान याने मोठा खुलासा केलाय. पहिल्यांदाच तो थेट आमिर खानच्या खासगी आयुष्यावर बोलताना दिसताय. फैजल खान याने आमिर खानची पहिली पत्नी रीना दत्ता आणि त्याच्या नात्यावर भाष्य केले. फैसल खान म्हणाला की, ज्यावेळी आमिर खान याच्याकडे काहीच नव्हते त्यावेळी रीना दत्ता त्याच्यासोबत होती.
आमिर खान याच्याकडे काहीच नव्हते त्यावेळी रीना दत्ताने त्याची साथ दिली. त्याच कारण फक्त एक होते की, ती आमिर खान याच्यावर पवित्र प्रेम करत. बाकी आमिर खान याच्यासोबत राहण्याचे तिच्याकडे दुसरे कोणतेही कारण अजिबात नव्हते. पुढे फैसल म्हणाला की, मुळात म्हणजे आमिर खान हा खूप जास्त चांगला व्यक्त आहे…पण त्याच्या आजुबाजूला राहणारी लोक नाही. तो लोक व्यवस्थित नाहीत.
आमिर खान खूप संवेदनशिल आणि समजूतदार व्यक्ती आहे. मला खूप दु:ख झाले होते, ज्यावेळी रीना आणि तो विभक्त झाले होते. रीना दत्ता खूप जास्त चांगलीच व्यक्ती आहे, मात्र आमचे काही बोलणे होत नाही. आमिर खानच्या दुसरी पत्नी किरण रावबद्दली फैसल खानने भाष्य केले. फैसल म्हणाले की, आमिरचे किरणसोबत लग्न झाले आणि तो बिझी झाला. त्यानंतर मी देखील कामात होतो. त्यामुळे माझे आणि किरणचे कधीही बोलणे झाले नाही.
आमिर खानची सध्याची गर्लफ्रेंड गाैरी हिच्याबद्दल बोलताना फैसल म्हणाले की, हा मी गाैरीला एक दोन वेळा भेटलो आहे. पण वाढदिवसामध्ये वगैरे, आमच्या जास्त काही बोलणे झाले नसल्याचे त्यांनी म्हटले. काही दिवसांपूर्वीच जोरदार चर्चा रंगताना दिसली की, आमिर खान हा तिसले लग्न गाैरी हिच्यासोबत करणार आहे. मात्र, आमिर खान आणि गाैरी यांनी त्यांच्या लग्नाबद्दल अजिबातच भाष्य केले नाहीये.
