AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमिर खान २७ वर्षांनंतर पु्न्हा गाणार, या कॉमेडी चित्रपटात आपला सूर लावणार

सुपरस्टार आमिर खान आता अभिनयासोबतच गायनाच्या क्षेत्रातही उतरत आहे. तो एका अनटायटल कॉमेडी चित्रपटातील दोन गाण्यांना आपला आवाज देणार आहे. आमिर खान याने 'आती क्या खंडाळा' या गाण्याद्वारे गायनाचा पहिला प्रयत्न केला होता.

आमिर खान २७ वर्षांनंतर पु्न्हा गाणार, या कॉमेडी चित्रपटात आपला सूर लावणार
| Updated on: Jul 13, 2025 | 10:44 PM
Share

सुपरस्टार अभिनेता आमिर खान त्याच्या चित्रपटासाठी खूपच मेहनत घेत असतो. मोजकेच चित्रपट करीत असतो. त्यामुळे त्याला ‘मिस्टर परफेक्टनिस्ट’ म्हटले जाते. त्याचा नुकताच ‘सितारे जमीन पर’ चित्रपट आला होता. आता २७ वर्षांनंतर अभिनेता आमिर गायनाचा प्रयत्न करीत आहे. त्याने एका कॉमेडी चित्रपटात आमीर आपला गायनाचा छंद जोपसणार आहे. याची माहीती त्याने स्वत:च दिली आहे.

आता सिंगिंगमध्ये नशीब आजमवणार आमिर

आमिरने अलिकडेच बॉलीवूड हंगामाशी बोलताना सांगितले की तो एका अजून नाव निश्चित न झालेल्या कॉमेडी चित्रपटासाठी अभिनयासह गायनाचा रोल करणार आहे. त्यासाठी त्याने गायनाचा सराव सुरु केला आहे आणि प्रशिक्षणही घेत आहे. आमिर राणी मुखर्जी सोबतच्या गुलाम चित्रपटात आती क्या खंडाला हे गाणे गाऊन धम्माल उडविली होती. आता २७ वर्षांनंतर आमीर पुन्हा आपला गायकीचा वापर स्वत:साठी वापर करणार आहे.आमिर म्हणाला की गुलाम साठी मी आती क्या खंडाला हे गीत सहज मजा म्हणून गायले होते.नशीबाने ते हिट झाले. आता गेल्याकाही वर्षांपासून एक प्रोफेशन सिंगर बनण्यासाठी मी ट्रेनिंग घेत आहे. हा चित्रपट बासु चटर्जी आणि ऋषिकेश मुखर्जी यांच्यापासून प्रेरणा घेतला चित्रपट आहे. असे हलके फुलके चित्रपट आजकल बनवणे आपण विसरत चाललो आहोत. या चित्रपटात कोणीही व्हिलन नसतो. किंवा त्यात कोणी मरत नाही. हा चित्रपट तुम्हाला चांगली फिलींग देईल असेही आमीर याने सांगितले.

कॉमेडी फिल्ममध्ये पाहूणा कलाकार

या कॉमेडी चित्रपटात माझी भूमिका लहान असणार आहे. परंतू या चित्रपटातील दोन गाणी मी गाणार आहे. त्याची ट्रेनिंग एक प्रसिद्ध लोकगायिका सुचेता भट्टाचार्य यांच्याकडून घेत असल्याचे आमीर याने सांगितले. जेव्हापासून मी आती क्या खंडाला गायले आहे. तेव्हापासून मी गायनाचे प्रशिक्षण घेत आहे. आणि माझ्या गुरु सुचेता भट्टाचार्य आहेत असेही तो म्हणाला.

अनेक प्रोजेक्ट सुरु काम सुरु

‘सितारे जमीन पर’ नंतर आमिर खानकडे अनेक प्रोजेक्ट्स आहेत. आता तो रजनीकांतच्या ‘कुली’ चित्रपटातही दिसणार आहे, ज्यामध्ये देखील तो एक छोटी भूमिका साकारणार आहे. त्यानंतर आमिर राजकुमार हिरानी यांच्यासोबत दादासाहेब फाळके यांच्या बायोपिकमध्येही काम करणार आहे. साऊथचे दिग्दर्शक लोकेश कनागराज यांच्यासोबतही त्याच्या प्रोजेक्ट सुरु असून हा एक सुपरहिरो टाईपचा चित्रपट असेल.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.