त्या' व्हिडीओवरून ट्रोल; आमिरची कन्या नेटकऱ्यांवर भडकली

चित्रपटसृष्टीपासून अलिप्त असलेली अभिनेता आमीर खानची मुलगी इरा खान सध्या सोशल मीडियावर खूप ट्रोल होत आहे.

त्या' व्हिडीओवरून ट्रोल; आमिरची कन्या नेटकऱ्यांवर भडकली

मुंबई : चित्रपटसृष्टीपासून अलिप्त असलेली अभिनेता आमीर खानची मुलगी इरा खान सध्या सोशल मीडियावर खूप ट्रोल होत आहे. काही दिवसांपूर्वी नैराश्यावरचा एक व्हिडिओ इराने सोशल मीडियावर शेअर केला होता. इराच्या या व्हिडीओवर अश्लील कमेंट्स, गलिच्छ भाषा वापरण्यात आलीय. त्यामुळे इरा नेटकऱ्यांवर चांगलीच भडकली आहे. (Aamir Khan daughter Ira warning to trolls)

इराने या नेटकऱ्यांना अत्यंत तिखट भाषेत झापले आहे. माझ्या मानसिक आरोग्याच्या व्हिडीओवर द्वेष पसरवणारी भाषा करून, अश्लील कमेंट्स, गलिच्छ भाषा वापरत असाल तर तुमच्या त्या कमेंट मी काढून टाकेल. त्यानंतरही तुमचे ट्रोलिंग सुरूच राहिले तर तुम्हाला मी ब्लॉक करून टाकेल, असा इशारा इराने ट्रोल करणाऱ्यांना दिला आहे.

व्हिडिओमध्ये काय होते?

इराने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेर केला होता. इरा त्यामध्ये मानसिक आरोग्याबद्दल बोलताना दिसत आहे. मी उदास आहे. चार वर्षांपासून मानसिक तणावाखाली आहे. डॉक्टरांना दाखवीत आहे. पण सध्या मी सध्या बरी आहे. बर्‍याच काळापासून मला मानसिक आरोग्यावर काहीतरी करण्याची इच्छा होती. पण काय करावे हे समजू शकले नाही. पण आता मला सर्वांना आपल्या आयुष्याच्या प्रवासात घेऊन जायचे आहे. जिथे मी मानसिक तणावाविरूद्ध लढा देत आहे, असं तिने या व्हिडीओत म्हटलं होतं. इराच्या त्याच व्हिडीओला बर्‍याच प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. बऱ्याच लोकांनी तिला ट्रोलही केले आहे. पण आता त्याच ट्रोलिंगला इराने चोख प्रत्युत्तर दिले आहे.

संबंधित बातम्या : 

श्रीदेवीवर माझं प्रेम होतं, पण… : आमीर खान   

#MeToo च्या आरोपीसोबत काम न करण्याच्या निर्णयावर यूटर्न, तनुश्रीचा आमीरवर निशाणा  

सोनू सूदने स्वत:च्या हिंमतीवर काम केले, आमच्यावेळी आमीर खान काम करायचे : फडणवीस

(Aamir Khan daughter Ira warning to trolls)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *