आमिर खानच्या ऑनस्क्रीन लेकीचं गुपचूप लग्न, पतीसह पहिला फोटो शेअर करत म्हणाली…
Zaira Wasim Nikaah : दंगल चित्रपटातून पदार्पण केलेल्या, उत्तम अभिनयाची चुणूक दाखवलेल्या झायरा वसीमने लग्न केलं आहे. आता अभिनया क्षेत्राला रामराम केलेल्या आमिरच्या या लेकीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही खास फोटो आणि कॅप्शन लिहीत लग्नाची बातमी शेअर केली. त्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या आमिर खानच्या ‘दंगल’ चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर धूमाकूळ माजवला. यामधून अनेक अभिनेत्रींनी मोठ्या पडद्यावर पदार्पण केले, त्या आज यशस्वी अभिनेत्रीही ठरल्या आहेत. मात्र यातील एक अभिनेत्री झायरा वसीमने अवघ्या काही वर्षांतच 2019 साली धार्मिक कारण सांगत बॉलवूडला रामराम केला. मात्र तीच झायरा वसीम आता पुन्हा चर्चेत आली आहे. त्याचं कारण म्हणजे तिची इन्स्टाग्राम पोस्ट. झायराने एक फोटो आणइ कुबुल है अशी कॅप्शन लिहीत आपल्या लग्नाची बातमी सर्वांसोबत शेअर केली आहे. शुक्रवारी रात्री समोर आलेल्या या फोटोमुळे चाहत्यांना आश्चर्यांचा धक्का बसला आहे.
झायराने शेअर केले खास फोटो
झायराने तिच्या लग्नाचे दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये ती पेन धरून निकाहनामावर सही करताना दिसत आहे. तिने तिची मेहंदी आणि सुंदर पन्नाची अंगठी फ्लाँट केली आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये झायरा आणि तिचा पती दोघे मिळून चंद्र न्याहळताना दिसत आहेत. दोघांचाही हा फोटो पाठमोरा असून त्यांचे चेहरे मात्र दिसत नाहीयेत. त्यामुळे झायराचा पती कोण, हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे.
नववधून असलेल्या झायराने तिच्या लग्नात सोनेरी धाग्याची भरतकाम केलेली चमकदार लाल ओढणी डोक्यावरून घेतल्याचे दिसत आहे, तर तिच्या पतीने क्रीम रंगाची शेरवानी आणि त्याला मॅचिंग स्टोल खांद्यावरून घेतला होता. अतिशय गुप्तपणे झालेल्या या लग्नाचे फोटो शेअर करताना, झायराने कॅप्शनमध्ये फक्त लिहिलं, “कुबूल है x3.”
View this post on Instagram
झायराचे चित्रपट
झायरा वसीमने वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी आमिर खानच्या दंगल (2016) चित्रपटानून पदार्पण केलं, तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात तिने कुस्तीगीर गीता फोगटची लहानपणीची भूमिका साकारली. तिच्या दमदार अभिनयासाठी तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला. त्यानंतर तिने सिक्रेट सुपरस्टार (2017) मध्ये आणखी एक उत्तम भूमिका साकारली, ज्यामुळे बॉलिवूडमधील सर्वात प्रतिभावान तरुण प्रतिभांपैकी एक म्हणून तिचा दर्जा आणखी वाढला.
तर ‘द स्काय इज़ पिंक’ हा तिचा शेवटचा चित्रपट होता. ज्यामध्ये प्रियांका चोप्रा, फरहान अख्तर यांच्याही प्रमुख भूमिका होत्या. ऑक्टोबर 2019 मध्ये हा चित्रपट रिलीज झाला होता.
झायराने बॉलिवूड का सोडलं ?
मात्र, 2019 साली झायराने अभिनय करणं हे तिच्या धर्माशी विसंगत असल्याचे कारण देत चित्रपट सृष्टी सोडण्याचा निर्णय जाहीर केला. तिने एक इमोशनल नोट शेअर केली होती. “या क्षेत्राने मला खरोखरच खूप प्रेम, पाठिंबा आणि कौतुक दिले, परंतु यामुळे मला अज्ञानाच्या मार्गावर नेले गेले कारण मी शांतपणे आणि नकळतपणे श्रद्धेपासून दूर जात होते.” असं म्हणत तिने हा मार्ग सोडण्याचा निर्णय घेतल्याचं जाहीर केलं.
