माधुरी दीक्षितच्या हातावर थुंकला होता आमिर खान, त्यानंतर तिने हॉकीस्टीकने…
आज १५ मे रोजी बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याविषयी काही खास गोष्टी...

मग तिला मोहिनी म्हणा किंवा धक-धक गर्ल, निशा म्हणा किंवा चंद्रमुखी… माधुरी दीक्षितने प्रत्येक भूमिकेला आपल्या अदांनी अमर केली आहे. आज ती ५८ वर्षांची झाली आहे, पण ९०च्या दशकाचा उल्लेख जेव्हा होतो तेव्हा माधुरीचं नाव येणार नाही, असे होऊच शकत नाही. त्या काळात तिचा प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर धूमाकूळ घालत होता. अभिनय असो की नृत्य, रोमान्स असो की अॅक्शन, माधुरी प्रत्येक भूमिकेत जीव ओतायची. माधुरीची व्यावसायिक कारकीर्द जितकी यशस्वी राहिली, तितकेच तिचे वैयक्तिक आयुष्यही नेहमी चर्चेत राहिले आहे. तिचं नाव संजय दत्त, अनिल कपूर यांच्यापासून ते क्रिकेटपटू अजय जडेजापर्यंत जोडलं गेलं. पण एकदा आमिर खानसोबतचा किस्सा विशेष गाजला.
अनिल कपूरसोबतच्या अफेअरच्या चर्चा, अभिनेत्याची पत्नी सेटवर पोहोचली
अनिल कपूर आणि माधुरी दीक्षितच्या जोडीला प्रेक्षकांनी खूप पसंत केलं. राम लखन, परिंदा आणि बेटा यांसारख्या चित्रपटांमध्ये या दोघांची केमिस्ट्री पडद्यावर कमाल करायची. याच दरम्यान त्यांच्या अफेअरच्या बातम्या माध्यमांमध्ये येऊ लागल्या. पण जेव्हा या बातम्या अनिलच्या पत्नीला कळल्या, तेव्हा ती आपल्या मुलांसह सेटवर पोहोचली. असं म्हणतात की जेव्हा माधुरीने अनिलला त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवताना पाहिलं, तेव्हा तिने ठरवलं की ती आता त्याच्यासोबत कधीच काम करणार नाही. पण काही वर्षांनंतर दोघे पुकारमध्ये एकत्र दिसले. त्यानंतर २०१९ मध्ये टोटल धमालमध्येही त्यांनी एकत्र काम केलं. वाचा: एकत्र फिरले, नूडल्स-आईस्क्रीम खाल्ले; शारीरिक संबंधानंतर बॉयफ्रेंडनेच जे केलं ते पाहून पोलिसांनाही बसला धक्का
क्रिकेटपटू अजय जडेजासोबतच्या प्रेमाच्या चर्चा
केवळ अभिनेत्यांबरोबरच नाही, तर माधुरीचं नाव क्रिकेटपटू अजय जडेजासोबतही जोडलं गेलं. अजय आणि माधुरीची पहिली भेट एका जाहिरात फोटोशूटदरम्यान झाली होती. त्यानंतर त्यांच्या अफेअरच्या बातम्या समोर येऊ लागल्या. पण याच दरम्यान १९९९ मध्ये अजयचं नाव मॅच फिक्सिंग वादात आलं. यामुळे केवळ त्याची कारकीर्दच संपृष्टात आली नाही, तर माधुरीच्या कुटुंबाने देखील त्याचा विषय स्वीकारला नाही. त्यांचं नातं संपुष्टात आलं.
देवदास चित्रपटादरम्यान माधुरी गरोदर होती
माधुरी दीक्षितचा देवदास चित्रपट २००२ मध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केला होता. यात माधुरी, ऐश्वर्या राय बच्चन, शाहरुख खान आणि जॅकी श्रॉफ दिसले होते. असं म्हणतात की या चित्रपटादरम्यान माधुरी गरोदर होती. चित्रपटातील ‘हमपे ये किसने हरा रंग डाला’ हे गाणंही माधुरीने गरोदरपणात शूट केलं होतं. या चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यान माधुरी पती डॉ. नेने यांच्यासोबत पोहोचली होती.
गायक सुरेश वाडकर यांनी नाकारला होता विवाहाचा प्रस्ताव
माधुरीचे वडील शंकर दीक्षित यांना माधुरीचं लवकरच लग्न करायचं होतं. यासाठी त्यांनी अनेक मुलं पाहिली. यात प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांचाही समावेश होता. माधुरीचे वडील यांना सुरेश आवडले, म्हणून त्यांनी लग्नासाठी पुढे बोलणी केली. जेव्हा माधुरीचा फोटो सुरेश यांना पाठवला, तेव्हा त्यांनी ‘मुलगी खूप सडपातळ आहे’ असं सांगत लग्नास नकार दिला. विशेष म्हणजे सुरेश माधुरीपेक्षा ११ वर्षांनी मोठे होते.
आमिर खान माधुरीच्या हातावर थुंकला, ती हॉकी घेऊन मारायला धावली
आमिर खान नेहमीच सेटवर मस्ती-मजाकासाठी प्रसिद्ध आहे. एकदा त्याने सांगितलं की तो लोकांचा हात पाहून त्यांचं भविष्य सांगण्यात माहिर आहे. जेव्हा ही गोष्ट माधुरी दीक्षितला कळली, तेव्हा ती लगेच आमिरकडे पोहोचली. त्यावेळी दोघे ‘दिल’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होते. माधुरीने मस्करीत आपला हात पुढे करत सांगितलं की आमिरने तिचा हात पाहून भविष्य सांगावं. तेव्हा आमिर खोडकरपणे तिच्या हातावर थुंकला. हे पाहून माधुरी चिडली आणि मस्करीतच हॉकी उचलून आमिरच्या मागे धावली.
