आमिर खानच्या सावत्र भावाची दुर्दशा, खिशात दमडी नाही, राहायला घर नाही, पूर्व पत्नीचा मोठा खुलासा
अभिनेता आमिर खान याच्याकडे आज गडगंज संपत्ती आहे. पण त्याच्या सावत्र भावाच्या खिशात दमडी देखील नाही. राहायला घर नाही... आमिर याच्या सावत्र भावाचं नाव हैदर अली खान असं आहे... तर नुकताच झालेल्या एका मुलाखतीत त्याच्या पूर्व पत्नीने मोठा खुलासा केला आहे.

अभिनेता आमिर खान याच्याकडे आज अफाट संपत्ती आहे. पण त्याच्या भावाच्या खिशात दमडी देखील नसल्याचा खुलासा हैदर अली खान याच्या पूर्व पत्नीने केला आहे. हैदर हा अमिर याच्या वडिलांच्या दुसऱ्या पत्नीचा मुलगा आहे. हैदर सध्या अत्यंत हालाखीचं आयुष्य जगत आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री ईवा हिने पूर्व पतीच्या आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे.
ईवा हिच्या म्हणण्यानुसार, त्यांचं वैवाहित आयुष्य अत्यंत वाईट असलं तरी, पूर्व पतीच्या आयुष्याबद्दल तिला वाईट वाटतं कारण सध्या हैदर याचा वाईट काळ सुरु आहे. सांगायचं झालं तर, ईवा आणि हैदर यांनी गुपचूप लग्न केलं होतं. पण हे लग्न फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
पूर्व पती हैदर याच्याबद्दल मोठा खुलासा करत ईवा म्हणाली, ‘आज हैदर याची परिस्थिती काही चांगली, त्याच्याकडे राहण्यासाठी घर नाही आणि खाण्यासाठी देखील त्याला प्रचंड संघर्ष करावा लागत आहे. आज त्याच्या खिशात दमडी नाही. कधी कोणी त्याला चाळीत राहायला देतं, तर कधी कोणता मित्र मदतीसाठी येतो. हे पाहिल्यानंतर मला प्रचंड दुःख होतं. पुर्वी जे झालं तर झालं, पण कधीकाळी तो माझा पती होता, त्यामुळे वाईट वाटतं…’
पुढे ईवा ग्रोवर म्हणाली, ‘हैदर याला अशा लोकांनी घेरलं आहे, ते त्याला कायम दारु पाजतात. त्याची काळजी घेण्यासाठी कोणी नाही. मी फक्त एवढीच प्रर्थना करते की, जेव्हा केव्हा त्याची वेळ येईल. त्याला शांती मिळूदे कारण त्याने आयुष्यात अनेक संकटांचा सामना केला आहे.’
खान कुटुंबियांबद्दल सांगायचं झालं तर, आमिर याचे वडील ताहिर हुसैन यांनी दोन लग्न केली. त्यांचे पहिले लग्न झीनत हुसेन यांच्याशी झाले होते आणि त्यांना चार मुले होती: आमीर खान, फैसल खान, फरहत खान आणि निखत खान. त्यांचे दुसरे लग्न शहनाज हुसेन यांच्याशी झाले होते आणि त्यांना हैदर नावाचा मुलगा होता.