AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ये रिश्ता क्या कहलाता हैं! आमिर खान होणारी पत्नी गौरी आणि दोन Ex-Wifeसोबत एकाच कारमध्ये, Video Viral

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये बॉलिवूड अभिनेता आमिर खान होणारी पत्नी गौरी आणि दोन्ही एक्स व्हाईफसोबत एकाच कारमधून प्रवास करताना दिसत आहे.

ये रिश्ता क्या कहलाता हैं! आमिर खान होणारी पत्नी गौरी आणि दोन Ex-Wifeसोबत एकाच कारमध्ये, Video Viral
आमिर खान Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 17, 2026 | 4:53 PM
Share

बॉलिवूड अभिनेता आमिर खान हा सतत चर्चेत असतो. पण गेल्या काही दिवसांपासून तो कोणत्याही नव्या चित्रपटामुळे नव्हे, तर त्याच्या तिसऱ्या लग्नाच्या चर्चेमुळे तुफान चर्चेत आहे. रीना दत्ता आणि किरण राव यांना घटस्फोट दिल्यानंतर आमिर पुन्हा एकदा नवा संसार थाटण्यासाठी सज्ज झाला आहे. गेल्या वर्षी त्याच्या ६०व्या वाढदिवशी त्याने गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटची सर्वांना ओळख करून दिली होती. आता तो गौरीशी लग्न करणार असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, सोशल मीडियावर आमिर खानचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आमिर खान एकाच गाडीत एक्स पत्नी आणि होणाऱ्या पत्नीसोबत दिसत आहे.

एकाच कारमध्ये आमिर, किरण आणि गौरी

नुकतेच आमिर खानच्या ‘लगान’ चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या ग्रँड सेलिब्रेशनमध्ये ही अनोखी घटना घडली. कार्यक्रमानंतरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आमिर खान ड्रायव्हरच्या शेजारच्या सीटवर बसलेला दिसत आहे, तर मागच्या सीटवर त्याची पूर्व पत्नी रीना दत्ता, किरण राव आणि होणारी पत्नी गौरी स्प्रॅट एकत्र बसून हसत-गप्पा मारताना दिसत आहेत. त्यांच्यासोबत किरण आणि आमिरचा मुलगा आझादही उपस्थित होता. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

कोण आहे गौरी स्प्रॅट?

गौरी स्प्रॅट मूळची बंगळुरूची आहे. तिची आई रीटा स्प्रॅट यांचा तिथे मोठा सलून व्यवसाय आहे. गौरीच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, तिने ‘ब्लू माउंटन स्कूल’मधून शिक्षण घेतले आहे आणि २००४ मध्ये ‘युनिव्हर्सिटी ऑफ द आर्ट्स लंडन’मधून फॅशन स्टायलिंग आणि फोटोग्राफीचा कोर्स पूर्ण केला आहे. सध्या ती मुंबईत ‘बी ब्लंट’ नावाचे नामांकित सलून चालवते. रिपोर्ट्सनुसार, गौरीला ७ वर्षांचा एक मुलगाही आहे. गेल्या काही महिन्यांत आमिर आणि गौरी चीनमधील ‘मकाऊ इंटरनॅशनल कॉमेडी फेस्टिव्हल’सह अनेक मोठ्या कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले होते.

आमिरची वैवाहिक जीवनाची कहाणी

आमिर खानचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहे. १९८६ मध्ये त्याने रीना दत्तासोबत पळून लग्न केले होते. त्यांना जुनैद आणि इरा ही दोन मुले आहेत. १६ वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर २००२ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर २००५ मध्ये किरण रावशी दुसरे लग्न केले. मात्र २०२१ मध्ये दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. दोन्ही घटस्फोटानंतरही आमिरने आपल्या एक्स पत्नींशी असलेले नाते आणि आदर कायम ठेवला आहे. मुलांच्या संगोपनापासून ते कौटुंबिक कार्यक्रमांपर्यंत ते सर्वजण नेहमी एकत्र दिसतात. आता गौरी स्प्रॅटच्या येण्याने या अनोख्या कुटुंबात एक नवा अध्याय सुरू होणार आहे.

Follow Us
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल