AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्ही ब्रश का करत नाही? आतंकवादीच्या कमेंटवर समय रैनाचा सुनील पालवर पलटवार, नेमकं काय घडलं?

तुम्ही ब्रश का करत नाही? आतंकवादीच्या टीकेवर समय रैनाचा सुनील पालवर पलटवार. कपिल शर्मा शोमध्ये नेमकं काय घडलं?

तुम्ही ब्रश का करत नाही? आतंकवादीच्या कमेंटवर समय रैनाचा सुनील पालवर पलटवार, नेमकं काय घडलं?
| Updated on: May 03, 2026 | 11:09 AM
Share

वर्ल्ड लाफ्टर डे निमित्त प्रसारित झालेल्या The Great Indian Kapil Show च्या विशेष भागाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. हा भाग केवळ कॉमेडीपुरता मर्यादित न राहता, जुन्या वाद-विवाद, टोलेबाजी आणि भन्नाट जोक्समुळे विशेष चर्चेत राहिला.

या भागात समय रैना आणि रणवीर अलाहाबादिया हे गेस्ट म्हणून सहभागी झाले होते. त्यामुळे आधीपासूनच हा एपिसोड चर्चेत होता. मात्र, अनुभवी कॉमेडियन सुनील पाल यांच्या एंट्रीनंतर कार्यक्रमाला वेगळंच वळण मिळालं.

कपिल शर्माचा मजेशीर टोला

शोचे होस्ट कपिल शर्माने सुनील पालची एंट्री होताच वातावरण हलकंफुलकं केलं. त्याने जुन्या वक्तव्याचा उल्लेख करत मजेत विचारलं की, तुम्ही समय रैनाला कॉमेडीचा दहशतवादी का म्हणता? त्याने असं काय केलं की तुम्हाला असं वाटतं?

यावर प्रतिक्रिया देताना सुनील पाल म्हणाला की, जर तो खरंच तोंडातून ग्रेनेड फेकला असता तर चाललं असतं, पण तो जे बोलतो ते सहन होत नाही. जे समाजाला पटत नाही, ते स्वीकारलं जात नाही आणि जे स्वीकारलं जात नाही ते दहशतवादीच ठरतं.

समय रैनाचा पलटवार

सुनील पालच्या या वक्तव्यावर समय रैनाने ही आपल्या खास शैलीत उत्तर दिलं. त्याने हलक्या-फुलक्या अंदाजात विचारलं तुम्हाला माझ्याबद्दल इतकी अडचण आहे, तर नेमकं काय सांगू? मी काय तोंडातून ग्रेनेड फेकतो असं म्हणू का?

त्यानंतर त्याने विनोद करत सुनील पालला विचारलं, सर, तुम्ही दात का घासत नाही? यावर सुनील पालने मजेशीर उत्तर देत म्हटलं, ब्रश करण्याचा जमाना गेला, मी इथे पॉलिश करूनच आलोय.

वातावरण शांत करत दिला संदेश

या टोलेबाजीनंतर समय रैनाने वातावरण शांत करत एक गंभीर संदेश दिला. त्याने सांगितलं की, जर कोणी सतत दुसऱ्यांबद्दल वाईट बोलत असेल तर तो स्वतः काहीतरी समस्येतून जात असतो. त्यामुळे मला कधी वाईट वाटत नाही उलट तो माझ्याबद्दल बोलतोय हेच माझ्यासाठी चांगलं आहे.

या एपिसोडमधील विनोद, टोलेबाजी आणि प्रामाणिक संवादामुळे प्रेक्षकांनी याला मोठी पसंती दिली. सोशल मीडियावरही या भागाची जोरदार चर्चा झाली असून हा सीजनमधील सर्वात लोकप्रिय एपिसोड मानला जात आहे.

Follow Us
6 खासदारांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंचा मोठा निर्णय; आराखडा तयार आता फक्त.
Uddhav Thackeray | विश्वासू खासदारांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंचा मोठा निर्णय; आराखडा तयार आता फक्त...
रेवती सुळेंच्या लग्नाला शरद पवार व्हीलचेअरवरून हजर, सुनेत्रा पवारांचीह
रेवती सुळेंच्या लग्नाला शरद पवार व्हीलचेअरवरून हजर, सुनेत्रा पवारांचीही उपस्थिती
कल्याणमध्ये जमीन घोटाळ्याने खळबळ; माजी नगरसेवकांसह 7 जणांवर गुन्हा
kalyan | कल्याणमध्ये जमीन घोटाळ्याने खळबळ; माजी नगरसेवकांसह 7 जणांवर गुन्हा
भर मंचावर झाला मोठा घोळ! कोल्हापूरच्या कार्यक्रमात शिंदेंचं नाव...
भर मंचावर झाला मोठा घोळ! कोल्हापूरच्या कार्यक्रमात शिंदेंचं नाव... मुख्यमंत्र्यांनी सूत्रसंचालकाला मध्येच अडवलं अन्...
6 बंडखोर खासदारांविरोधात ठाकरेंचा मास्टरप्लॅन! थेट मतदारसंघात उतरणार
Uddhav Thackeray | 6 बंडखोर खासदारांविरोधात उद्धव ठाकरेंचा मास्टरप्लॅन! थेट मतदारसंघात उतरणार
ओमराजे निर्णय घेण्याआधीच शिंदेंचे खासदार... शिंदेच्या कार्यकर्त्यांचा
ओमराजे निर्णय घेण्याआधीच शिंदेंचे खासदार... शिंदेच्या कार्यकर्त्यांचा घराबाहेर गराडा; पुण्यातील राजकीय हालचालींना वेग
परभणीच्या हनुमान मंदिरात मोठी दुर्घटना, बांधकाम सुरु असताना छत कोसळला
Parbhani| परभणीच्या हनुमान मंदिरात मोठी दुर्घटना, बांधकाम सुरु असताना छत कोसळला, अनेकजण जखमी
शिंदे गट नाही, आता एकच शिवसेना!; अमित शाहांच्या विधानाने चर्चांना उधाण
Amit Shah | शिंदे गट नाही, आता एकच शिवसेना!; अमित शाहांच्या विधानाने चर्चांना उधाण
शिंदेंच्या शिवसेनेत जाणार? ओमराजेंचं मोठं विधान, 2 दिवसांत अंतिम...
Omraje Nimbalkar | शिंदेंच्या शिवसेनेत जाणार? ओमराजेंचं मोठं विधान, 2 दिवसांत अंतिम निर्णय घेणार!
शिंदेंच्या सेनेतील बडा नेता ओमराजेंच्या भेटीला; पुण्याच्या निवासस्थानी
शिंदेंच्या सेनेतील बडा नेता ओमराजेंच्या भेटीला; पुण्याच्या निवासस्थानी... राजकारणातील घडामोडींना वेग