AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खान कुटुंबात होणार आणखी एक घटस्फोट, सलमान खान याच्या बहिणीचा मोडणार संसार? मोठं सत्य समोर

Salman Khan | लग्नाच्या 10 वर्षांनंतर मोडणार सलमान खान याची बहीण अर्पिता खान हिचा संसार? खान कुटुंबात होणार आणखी एक घटस्फोट?, अर्पिता खान हिचा पती आणि अभिनेता आयुष शर्मा याचं मोठं वक्तव्य..., खान कुटुंबातील मोठं रहस्य समोर...

खान कुटुंबात होणार आणखी एक घटस्फोट, सलमान खान याच्या बहिणीचा मोडणार संसार? मोठं सत्य समोर
| Updated on: May 10, 2024 | 12:35 PM
Share

अभिनेता सलमान खान याची बहीण अर्पिता खान आणि अभिनेता आयुष शर्मा यांनी 2014 मध्ये मोठ्या थाटात लग्न केलं. दोघांच्या लग्नात बॉलिवूडच्या प्रसिद्ध सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. अर्पिता आणि आयुष यांच्या लग्नाना 10 वर्ष झाली आहे. आता दहा वर्षांनंतर आयुष आणि अर्पिता यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. अशात खान कुटुंबात आणखी एक घटस्फोट होणार का? सलमान खान याच्या बहिणीचा संसार मोडणार का? अशा अनेक चर्चा चाहत्यांमध्ये सध्या सुरु आहेत. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत आयुष याने घटस्फोटावर मोठं वक्तव्य केलं आहे.

आयुष शर्मा म्हणाला, ‘एकदा एका पापाराझीने मला विचारलं अर्पिता हिच्यासोबत तुझं घटस्फोट होत आहे का?‘ यावर हैराण झालेला आयुष म्हणाला. ‘मी माझ्या मुलासोबत दोसा खाण्यासाठी बाहेर निघालो होतो. तेव्हा एका पापाराझी माझ्याजवळ आला आणि म्हणाला, तू अर्पिता खान हिला घटस्फोट दिणार आहेस का?’

‘माझ्या आणि अर्पिता बद्दल रंगणारी चर्चा ऐकून मी हैराण झालो. घरी आलो आणि मी अर्पिताला विचारलं, तू मला घटस्फोट देणार आहेस का? यावर आम्ही एकत्र बसून प्रचंड हसलो.’ असं म्हणत आयुष याने रंगणाऱ्या सर्व चर्चांना पूर्ण विराम दिला. पुढे पत्नी अर्पिता हिचं कौतुक करत अभिनेता म्हणाला, ‘अर्पिता कायम मझी साथ देते आणि ती माझ्यावर टीका देखील करत असते. अर्पिता हिला सत्य घटनांवर आधारित सिनेमे अधिक आवडतात.’ आयुष शर्मा याचा नुकताच ‘रुसलान’ सिनेमा प्रदर्शित झाला.

बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर आयुष याने पहिल्यांदा सलमान खान याच्यासोबत काम केलं नाही. सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान अभिनेत्याने अनेक गोष्टींचा खुलासा केला.. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आयुष शर्मा याची चर्चा रंगली आहे.

आयुष शर्मा – अर्पिता शर्मा

2014 मध्ये अर्पिता आणि आयुष यांचं मोठ्या थाटात लग्न झालं. दोघांच्या लग्नात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. आज दोघे आनंदी वैवाहिक आयुष्य जगत आहेत. दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी देखील आहे. अर्पिता कायम पती आणि दोन मुलांसोबत फोटो – व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. अर्पिता हिच्या प्रत्येक पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.