TMKOC: ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मधील सोढीनंतर अब्दुल गायब, चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: मालिकेतील रोशन सिंग सोढीनंतर अब्दुल गायब नक्की कुठे गेलाय अब्दुल? टप्पूसेना आणि चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण... सध्या सर्वत्र गायब असलेल्या अब्दुल याची चर्चा...

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिका गेल्या अनेक वर्षांपासून चाहत्यांचं मनोरंजन करत आहे. आजही मालिकेची आणि मालिकेतील कलाकारांची चर्चा सोशल मीडियावर रंगलेली असते. मालिकेतील प्रत्येक कलाकार देखील घरा-घरात पोहोचला आहे. गेल्या 15 वर्षांपासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. दरम्यान, मालिकेत रोशन सिंग सोढी भूमिका साकारणारा अभिनेता गुरुचरण सिंग गायब झाला होता. त्यामुळे सर्वत्र खळबळ माजली होती. आता नुकताच प्रसारित झालेल्या एका एपिसोडमध्ये अब्दुल अचानक गोकुळधाम सोसायटीतून गायब झाला. त्यामुळे चाहत्यांची चिंता वाढली आहे.
नुकताच झालेल्या एपिसोडमध्ये अब्दुल गायब झाल्यानंतर सोसायटीमधील प्रत्येक जण अब्दुलला शोधण्यासाठी बाहेर पडतो. टप्पूसेना यांनी देखील अब्दुलला शोधण्याचे प्रयत्न केले. अब्दुल गायब झाल्यानंतर एका व्यक्ती सोसायटीमध्ये येतो आणि म्हणते अब्दुलने माझे 50 हजार रुपये घेतले असून अद्याप परत केलेले नाहीत. हे ऐकूव सेक्रेटरी भिडे देखील थक्क होतो आणि पोलिसांची मदत घ्यावी असा विचार करतो…
अखेर हरवलेल्या अब्दुलचा शोध चहाच्या टपरीपासून सुरु होतो. चहावाला म्हणतो, अब्दुल येथे आलाच नाही. पुढे जादूगर चावीवाल्याकडे देखील अब्दुलची विचारणा केली जाते. भिडे फोन करून चावीवाल्याला विचारतो. पण चावीवाल्याला देखील अब्दुल याच्याबद्दल काहीही माहिती नसतं.
खास असणार आहे येणारा एपिसोड…
चहाच्या टपरीवर आणि चावीवाल्याकडे देखील अब्दुल याची माहिती न मिळाल्यानंतर, भिडे, अब्दुलच्या गावी फोन करतो. पण अब्दुल गावी देखील नसतो. त्यानंतर टप्पू सेना गुप्ता चाटवाल्याकडे जाते. पण तरी देखील अब्दुल याच्याबद्दल कोणतीही माहिती मिळत नाही. अखेर त्रस्त टप्पूसेना अब्दुल याच्या घरी जाण्याचा निर्णय घेते. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अब्दुल याची चर्चा रंगली आहे.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेबद्दल सांगायचं झालं तर, मालिका प्रेक्षकांना पोट धरुन हसवण्याचं काम करते. मालिकेचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. गोकुळधाम सोसायटीमधील एकता आणि टप्पूसेनेच्या मस्तीमुळे मालिकेला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं.