AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: पहा बिचुकलेंची हिंमत; महेश मांजरेकरांची थेट ‘नोकरी’च काढली

महेश मांजरेकर आणि बिग बॉस मराठीबद्दल बिचुकलेंचं विधान

Video: पहा बिचुकलेंची हिंमत; महेश मांजरेकरांची थेट 'नोकरी'च काढली
Mahesh Manjrekar and Abhijit BichukleImage Credit source: Youtube
| Updated on: Sep 30, 2022 | 1:32 PM
Share

मुंबई- बिग बॉस मराठीचा चौथा सिझन (Bigg Boss Marathi 4) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या सिझनमध्ये कोणकोणते स्पर्धक सहभागी होणार याची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. बिग बॉस मराठी 4 सुरू होण्यापूर्वी सूत्रसंचालक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना अभिजीत बिचुकलेंसंदर्भात (Abhijit Bichukale) प्रश्न विचारला गेला. तेव्हा बिचुकले हे बिग बॉसच्या गेममध्ये सहभागी होत नसल्याची तक्रार त्यांनी केली. यावर आता बिचुकलेंनी प्रतिक्रिया दिली आहे. अभिजीत बिचुकलेंनी उत्तर देताना थेट महेश मांजरेकरांची ‘नोकरी’च काढली आहे.

काय म्हणाले बिचुकले?

“महेश मांजरेकरांना विचारावं लागेल की गेम म्हणजे नेमका कोणता गेम? गेम लावायचा की गेम करायचा? ते जसं मला सांगतील तसा मी गेम खेळू शकतो. पण सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, आमच्यासारखी हरहुन्नरी माणसं शोधून तिथे नेतात. जे शोधून नेतात ते एंडोमल कंपनीचं काम आहे. एंडोमल कंपनीने मला हिंदीमध्ये लाँच केलं. मला वाटतं, महेश मांजरेकर तिथे पैसे घेऊन नोकरी करतात. त्यामुळे त्यांच्या विधानाला किती महत्त्व द्यायचं,” असा खोचक सवाल त्यांनी केला.

बिग बॉसमधल्या निवडीविषयी ते पुढे म्हणाले, “आता एंडोमल कंपनीने मला एवढं मोठं केलंय, त्यामुळे जर ती कंपनी मला म्हणाली की साहेब तुम्ही बिग बॉसमध्ये पाहिजे, तर मी विचार करेन. बिग बॉसचा दुसरा सिझन कोणामुळे गाजला? मी किती टीआरपी दिला? मी साताऱ्यात नाव कमावलंय. छत्रपती उदयनराजेंना 20 वर्षांपासून मी विरोध करतोय. म्हणून मला नेलं होतं. त्यासाठी स्ट्राँग मानसिकता लागते. तुम्हाला ते कोंडून ठेवतात. अशा मानसिकतेचा माणूसच तिथे राहू शकतो.”

“मी बिग बॉस गाजवलं. माझ्यामुळे हा शो घराघरात गेला. याची जाण एंडोमल कंपनीला असेल तर महेश मांजरेकरांच्या कुठल्याही वक्तव्याला ती कंपनी तशी किंमत देणार नाही. भविष्यात कदाचित मी बिग बॉस मराठीचा अँकर असेन,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्याचसोबत जर एंडोमल कंपनीने विचारलं तर हिंदीतही भाग घेईन असं ते म्हणाले.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.