AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तुझेच मी गीत गात आहे’मध्ये साहेबरावांची होणार एण्ट्री; हा प्रसिद्ध अभिनेता साकारणार भूमिका

'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत नवनवीन ट्विस्ट पहायला मिळत आहेत. कथानकातील रंजक वळणांमुळे ही मालिका अधिकाधिक मनोरंजक होत आहे. आता या मालिकेत नव्या पात्राची एण्ट्री होणार आहे. या नव्या पात्रामुळे मालिकेत काय बदल होणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

'तुझेच मी गीत गात आहे'मध्ये साहेबरावांची होणार एण्ट्री; हा प्रसिद्ध अभिनेता साकारणार भूमिका
Tuzech Mi Geet Gaat AaheImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 22, 2023 | 8:04 PM

मुंबई : 22 नोव्हेंबर 2023 | छोट्या पडद्यावरील मालिकांच्या कथानकात अनेकदा रंजक वळणं आणली जातात. यामुळे प्रेक्षकांचाही मालिकेतील रस कायम राहतो. या रंजक वळणांसह मालिकांमध्ये नव्या पात्रांची एण्ट्री होत असते. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मालिका सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर आहे. वैदेहीप्रमाणे हुबेहुब दिसणारी मंजुळा वैदेही नसून मंजुळाच असल्याचं सत्य मोनिकासमोर येणार आहे. रागाच्या भरात टोकाची भूमिका घेणाऱ्या मोनिकाची समजूत काढायची कशी हा मोठा प्रश्न मल्हारसमोर आहे. मंजुळा, मोनिका आणि मल्हार यांचं नातं दिवसेंदिवस गुंतागुंतीचं होत असतानाच आता मालिकेत आणखी एका नव्या पात्राची एण्ट्री होणार आहे. साहेबराव असं या नव्या पात्राचं नाव असून मंजुळासोबत लग्न करण्याचं त्याचं स्वप्न होतं. मात्र मंजुळाला साहेबरावासोबत लग्न कधीच मान्य नव्हतं.

साहेबरावाने जबरदस्तीने मंजुळाशी साखरपुडा केला. मात्र मंजुळाने गावातून पळ काढून थेट मुंबई गाठली आणि तिचा योगायोगाने कामतांच्या घरात प्रवेश झाला. मात्र आता साहेबरावाला मंजुळा कामतांच्या घरी राहत असल्याचं समजलंय. त्यामुळे तिला मिळवण्यासाठी त्याचे पुन्हा प्रयत्न सुरु झाले आहेत. मंजुळाला मिळवण्यासाठी तो स्वराचं आय़ुष्यही पणाला लावणार आहे. साहेबरावाचा मनसुबा यशस्वी होणार का हे मालिकेच्या पुढील भागांमधून कळेलच. मात्र निरागस स्वराचं आयुष्य पुन्हा धोक्यात आल्यामुळे मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

अभिनेता अभिजीत केळकर साहेबरावांची भूमिका साकारणार असून साहेबराव या हटके नावाप्रमाणेच त्याचा लूकही हटके असणार आहे. अभिजीतने याआधी स्टार प्रवाह वाहिनीच्या ‘पुढचं पाऊल’ आणि ‘तुझ्या इश्काचा नादखुळा’ मालिकेतही लक्षवेधी भूमिका साकारली होती. ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत तो साकारत असलेला साहेबराव हा खलनायक नक्कीच वेगळ्या धाटणीच असेल. तुझेच मी गीत गात आहे ही मालिका रात्री 9 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

वाहत्या धबधब्या खाली सेल्फी काढायला गेला अन्.., थरारक व्हिडीओ
वाहत्या धबधब्या खाली सेल्फी काढायला गेला अन्.., थरारक व्हिडीओ.
मातोश्री बाहेर नितेश राणेंसाठी बॅनरबाजी, राजकीय वातावरण तापलं
मातोश्री बाहेर नितेश राणेंसाठी बॅनरबाजी, राजकीय वातावरण तापलं.
अमेरिकेच्या हल्लाआधीच युरेनियम सुरक्षितस्थळी ठेवलं; इराणचा दावा
अमेरिकेच्या हल्लाआधीच युरेनियम सुरक्षितस्थळी ठेवलं; इराणचा दावा.
मुख्यमंत्री फडणवीस यांची अबू आझमींवर सडकून टीका
मुख्यमंत्री फडणवीस यांची अबू आझमींवर सडकून टीका.
राऊतांच्या 'त्या' विधानावरून भास्कर जाधवांचा घरचा आहे
राऊतांच्या 'त्या' विधानावरून भास्कर जाधवांचा घरचा आहे.
मला मंत्रिपद का मिळायला नको? भास्कर जाधवांनी व्यक्त केली खदखद
मला मंत्रिपद का मिळायला नको? भास्कर जाधवांनी व्यक्त केली खदखद.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी!
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी!.
राजकोट किल्ला पर्यटकांसाठी बंद; मोठं कारण आलं समोर
राजकोट किल्ला पर्यटकांसाठी बंद; मोठं कारण आलं समोर.
युतीच्या चर्चा अन् संदीप देशपांडेंचा उद्धव ठाकरेंना टोला
युतीच्या चर्चा अन् संदीप देशपांडेंचा उद्धव ठाकरेंना टोला.
कुणाच्या तिजोरीतील पैसे लुटणार आहात? राऊतांचा अजित पवारांना टोला
कुणाच्या तिजोरीतील पैसे लुटणार आहात? राऊतांचा अजित पवारांना टोला.