AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘हाऊस अरेस्ट’ फेम एजाज खानवर बलात्काराचा आरोप; अभिनेत्रीच्या घरी जाऊन..

अभिनेता एजाज खानवर एका अभिनेत्रीने बलात्काराचा आरोप केला आहे. याप्रकरणी त्याच्याविरोधात एफआयआर दाखल असून अटकपूर्व जामिनासाठी एजाजने हायकोर्टात धाव घेतली आहे. लग्नाचं आमिष दाखवून एजाजने बळजबरी केल्याचा आरोप अभिनेत्रीने केला आहे.

'हाऊस अरेस्ट' फेम एजाज खानवर बलात्काराचा आरोप; अभिनेत्रीच्या घरी जाऊन..
Ajaz Khan Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 03, 2025 | 11:17 AM
Share

अभिनेता एजाज खानने बलात्कार प्रकरणात अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यासाठी त्याने न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. तर सत्र न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. लग्नाचं आमिष दाखवून आणि ‘हाऊस अरेस्ट’ या शोमध्ये भूमिका देण्याचं आश्वासन देऊन एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप एजाजवर करण्यात आला आहे. मुंबईतील चारकोप पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल आहे. हा अभिनेता एजाज शफी मोहम्मद गुलिवाला या नावानेही ओळखला जातो. दरम्यान एजाजच्या अटकपूर्व जामिनावर आता थेट उन्हाळी सुट्टीनंतर सुनावणी होणार आहे. सोमवारी त्याचे वकील कोर्टात उपस्थित न राहिल्याने उन्हाळी सुट्टीनंतरची पुढची तारीख कोर्टाकडून देण्यात आली आहे.

एजाज खानच्या वतीने वकील अशोक सरावगी यांनी दाखल केलेल्या याचिकेत असं म्हटलंय, ‘ही एफआयआर कायद्यानुसार चुकीची आणि बेकायदेशीर आहे. एजाजला कोणत्याही प्रकारच्या पोलीस कोठडीची आवश्यकता नाही. त्यामुळे त्याला अटकपूर्व जामीन मिळावा.’ महिलेच्या तक्रारीनुसार एजाजने तिला त्याच्या शोमध्ये होस्टची (सूत्रसंचालक) भूमिका देण्यासाठी फोन केला होता. शूटिंगदरम्यान त्याने आधी लग्नाचा प्रस्ताव ठेवला आणि नंतर महिलेवर बलात्कार केला.

तक्रारदार अभिनेत्री असून एजाजने त्याच्या सेलिब्रिटी आणि शो होस्ट असण्याचा फायदा घेत तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले, असं तिने म्हटलंय. एफआयआरमध्ये असाही आरोप आहे की लग्न, आर्थिक मदत आणि करिअरमध्ये प्रगतीची खोटी आश्वासनं देऊन एजाजने तिच्या संमतीशिवाय तिच्याशी अनेकदा बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. या तक्रारीत तिने स्पष्टपणे म्हटलंय की 4 एप्रिल 2025 रोजी दुपारी 2.15 वाजता एजाजने तिला जोगेश्वरी इथल्या त्याच्या घरी बोलावलं आणि तिथे तिचं लैंगिक शोषण केलं. त्यानंतर 24 एप्रिल 2025 रोजी दुपारी 3.15 वाजता तो पीडितेच्या घरी आला आणि लग्नाचं आमिष दाखवून पुन्हा तेच कृत्य केलं. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी एजाजविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

यापूर्वी दिंडोशी सत्र न्यायालयाने एजाजचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. पीडितेला माहीत होतं की एजाज विवाहित आहे आणि दोघांमधील संबंध संमतीने होते, असं त्याच्या वकिलाने न्यायालयाला सांगितलं होतं. तर आरोपीचा गुन्हेगारी रेकॉर्ड आहे आणि पुरावे (मोबाइल, व्हॉट्सॲप चॅट्स, कॉल रेकॉर्डिंग, व्हॉइस नमुने) गोळा करण्यासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता आहे, असं तपास यंत्रणांनी म्हटलंय. जर अटकपूर्व जामीन मंजूर झाला तर आरोपी पुराव्यांशी छेडछाड करण्याची किंवा साक्षीदारांना प्रभावित करण्याची शक्यता नाकारता येत नाही, असंही पोलिसांनी म्हटलंय.

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.